भारतातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीला आता ‘गुगल’ने धाव घेतली आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादकता वाढीसाठी मदत करणाऱ्या तंत्रज्ञानात ‘गुगल’ने गुंतवणूक केली आहे. त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांना वेळेवर कापूस पीक व्यवस्थापनाविषयी अचूक मार्गदर्शन मिळण्यात मदत होईल. पुढील टप्प्यात तांदूळ, गहू, मक्यासाठीही या तंत्रज्ञानाचा फायदा होणार आहे.
Googleने एका भारतीय कृषी AI स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. ‘गुगल’ने आपल्या “गुगल ऑर्ग” या समाजसेवी शाखेमार्फत ही नवी गुंतवणूक केली आहे. वाधवानी AI कंपनीच्या कॉटन एस (CottonAce) या शेतकरी ॲपसाठी गुगलने हा आर्थिक पतपुरवठा केला आहे.
मिल्किंग मशीनचा वापर करा व दुग्धव्यवसायात वाढ करा । milking machine।
‘कॉटन एस’ ॲप नऊ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध
‘कॉटन एस’मध्ये गुगलकडून 33 लाख अमेरिकी डॉलर्स म्हणजे तब्बल 27 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. हे शेतकरी ॲप नऊ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्याद्वारे शेतकर्यांना वेळेवर योग्य खते आणि कीटकनाशकांच्या वापरासह पीक लवचिकता तसेच कीड व्यवस्थापनाविषयी सल्ला दिला जाईल. त्यामुळे कापूस शेतकऱ्यांना मोठी मदत होईल.
पिकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्यरित्या वापर
कंपनीने याविषयी म्हटले आहे, की “वाधवानी AI”ला ‘AI फॉर ग्लोबल गोल कॉल’अंतर्गत Google.org कडून नवीन $3.3 दशलक्ष अनुदान प्राप्त झाले आहे. ‘कॉटन एस’ हे भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या डिजिटल प्रणालींमध्ये इमेज-वर्गीकृत AI तंत्रज्ञानाचा विस्तार समाकलित करते. भारतातील मुख्य अन्न पिकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्यरित्या वापर करण्यासाठी गुगलची गुंतवणूक नक्कीच उपयोगी पडेल.
नैसर्गिक भाषा प्रक्रिया तंत्राचा लाभ घेऊन, कॉटन एस प्रणाली देशभरातील कीटक आणि रोगांसाठी व्यवस्थापन सल्ला देईल. हे तंत्रज्ञान भारतातील कृषी परिसंस्थेतील भागधारकांना, शेतकऱ्यांना पीक नुकसान टाळण्यासाठी डेटा-आधारित निर्णय घेण्यास सक्षम करेल.
तांदूळ, गहू, मक्यासाठीही होणार तंत्रज्ञानाचा फायदा
वाधवानी एआय कंपनीचे सीईओ शेखर शिवसुब्रमण्यन यांनी कंपनीच्या उपक्रमाच्या उद्दिष्टांची रूपरेषा सांगितली. ते म्हणाले, की एआय तंत्रज्ञान वापरून भारतीय कृषी क्षेत्रातील कार्यक्षमता आणि उत्पादन वाढवण्याचे आमचे ध्येय आहे. कॉटन एस ॲपने आधीच शेतकऱ्यांच्या नफ्यात 20% वाढ केली आहे आणि कीटकनाशकावरील खर्च 25% कमी केला आहे. Google ची मदत आता तांदूळ, गहू आणि मका यासारख्या मुख्य पिकांचे संरक्षण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा विस्तार करण्यास मदत करेल.
झटका मशीनचा वापर करा व वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करा ।Jhataka Machine।
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇
- जळगावात 3 ते 6 नोव्हेंबर दरम्यान अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे आयोजन
- योग क्रांतीनंतर पतंजली आता देशात घडवून आणणार ग्रामविकास क्रांती