• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

APMC : खासगी बाजारसमित्यांची भाजपने आणलेली व्यवस्था कर्नाटकातील नवे काँग्रेस सरकार बदलणार!

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2023
in हॅपनिंग
0
APMC
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : खासगी बाजारासमित्यांची भाजपने आणलेली व्यवस्था कर्नाटकातील नवे काँग्रेस सरकार बदलणार आहे. गेल्यावेळी भाजपने सत्तेत येताच APMC कायद्यात बदल करून खासगी व्यक्ती, व्यापारी यांना रान मोकळे करून दिले होते. त्यातून शेतकऱ्यांची पिळवणूक, अडवणूक व लूट होत असल्याच्याही तक्रारी होत्या. आता पूर्वीप्रमाणेच सरकारी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातच शेतमाल खरेदी-विक्री व्यवस्था निर्माण केली जाणार आहे. खासगी व्यक्ती, व्यापाऱ्यांना शेतमाल खरेदी-विक्री आवार म्हणजे खासगी बाजारपेठ यापुढे उभारता येणार नाही. आगामी अधिवेशनात बाजार समिती कायद्यातील ही दुरुस्ती केली जाणार आहे.

कर्नाटकचे कृषी-पणन मंत्री शिवानंद पाटील यांनी गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांना ही माहिती दिली. नवे काँग्रेस सरकार कर्नाटकात कृषी बाजारांबाबत हे नवीन विधेयक आणणार आहे. येत्या विधानसभेच्या अधिवेशनात ते सादर केले जाईल. कर्नाटक मंत्रिमंडळाने कालच्या बैठकीत कृषी बाजारासंदर्भात (एपीएमसी) नवीन विधेयक आणण्याचा निर्णय घेतला. कर्नाटक विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 जुलैपासून सुरू होत आहे. राज्यातील मागील भाजप सरकारने कृषी बाजारात खासगी व्यवस्था लागू केली होती.

मागील भाजप सरकारने आणलेल्या एपीएमसी कायद्याने कर्नाटकात कृषी उत्पादनांच्या विक्रीवरील निर्बंध हटवले गेले होते. त्यामुळे खाजगी व्यक्तींना शेतमाल खरेदी-विक्री बाजारपेठेची स्थापना करण्यास परवानगी दिली गेली होती. सहकाराचा व ग्रामीण भागाच्या प्रगतीचा कणा असलेल्या स्थानिक कृषी उत्पन्न पणन समित्यांच्या (APMC) अधिकारांतही भाजप सरकारने कपात केली होती.

Ajeet Seeds

आयकर विभागाचा कायम खाते क्रमांक (PAN) असलेल्या कोणत्याही खासगी व्यक्तीस कृषी व्यापार, शेतमाल खरेदी आणि विक्री व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली गेल्याने कर्नाटकात चांगलीच अनागोंदी माजली होती. त्याआधी शेतकऱ्यांना केवळ अधिसूचित बाजारा समितीत किंवा मंडईतच शेतमाल विक्री करावी लागत होती. या सरकारी व्यवस्थेपेक्षा खासगी बाजारात शेतमालाला चांगला भाव मिळेल, असे भाजपने सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात उलटच झाले. खासगी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची चांगलीच फसवणूक केली होती.

कर्नाटकचे कृषी मंत्री शिवानंद पाटील यांनी “ॲग्रोवर्ल्ड”ला सांगितले, की “भाजप सरकारने ज्या हेतूने हा कायदा आणला होता, तो यशस्वी झाला नाही. शेतमालाला चांगला भाव मिळावा, हा त्यांचा हेतू होता; पण तो आजिबात सफल झाला नाही. याशिवाय, बाजार समितीवर अवलंबून असलेली हमाल, माथाडी, छोटे सरकारमान्य व्यापारी आदी एक लाखाहून अधिक कुटुंबे प्रभावित झाली. भाजपने खासगी बाजार समिती कायदा अंमलात आल्यानंतर शेतकर्‍यांना संकटाचा आणि कटु अनुभवाचा सामना करावा लागला.”

Sunshine Power House of Nutrients

काँग्रेसच्या 2019-20 च्या सरकारमधील व्यवस्थेच्या तुलनेत भाजपाच्या नव्या कायद्याने कृषी बाजारातील उलाढाल, व्यवसायही घसरत गेला. कर्नाटकातील एपीएमसीमध्ये 2019-20 मध्ये सुमारे ₹ 620 कोटींचा महसूल मिळवला होता. भाजप सरकारने 2021 मध्ये सुमारे ₹ 300 कोटी, 2022 मध्ये ₹ 200 कोटी आणि 2022-23 मध्ये फक्त 194 कोटीवर आणून ठेवला. ही घसरण रोखण्यासाठी तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा महसूल वाढवण्यासाठी नवीन कायदा आणणे आवश्यक आहे, असे शिवानंद पाटील यांनी सांगितले.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • Banana Rate Today : केळीला ‘या’ बाजार समितीत मिळतोय सर्वाधिक दर
  • साखर कारखाना उभारणीसाठी हवाई अंतर, इथेनॉल निर्मितीसाठी लवकरच राज्याचे धोरण
Tags: कर्नाटक कृषी-पणन मंत्री शिवानंद पाटीलखासगी बाजार समितीभाजप सरकारमंत्रिमंडळ बैठक
Previous Post

Banana Rate Today : केळीला ‘या’ बाजार समितीत मिळतोय सर्वाधिक दर

Next Post

साध्या सोप्या पद्धतीने बनवा निंबोळी अर्क ; किडींचा होईल बंदोबस्त

Next Post
निंबोळी अर्क

साध्या सोप्या पद्धतीने बनवा निंबोळी अर्क ; किडींचा होईल बंदोबस्त

ताज्या बातम्या

Speel slim: Beste Legale Goksites van Nederland 2026 met snelle iDEAL-betalingen

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Test Post Created

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

How The Independent tested new casino sites

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

#2 7bet: Great Bonus Value

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

The best online casino slots built around you

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Online slots explained: from classic slot machines to modern formats

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

How Much Money Do I Need to Start?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Test Post Created

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

🎁 Matched Deposit Bonuses

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Responsible Gambling and Session Management

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

Speel slim: Beste Legale Goksites van Nederland 2026 met snelle iDEAL-betalingen

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Test Post Created

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

How The Independent tested new casino sites

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

#2 7bet: Great Bonus Value

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.