मुंबई : (Monsoon Maharashtra 27 June Update) राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर काही दिवस मुसळधार पाऊस कोसळला त्यानंतर पावसाने दडी मारली. आणि आता पुन्हा पावसाचे आगमन झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. दरम्यान, विदर्भात हवा तसा पाऊस झाला नसल्याने येथील शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
राज्यात काही ठिकाणी पावसाने दडी मारली असली तरी मुंबई, पुणे आणि कोकणात पुन्हा जोरदार पावासाला सुरुवात झाली आहे. तसेच मुंबईत आज सकाळपासूनच पावसाने हजेरी लावलेली आहे.
IMD कडून या जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट
राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली असून भारतीय हवामान विभागाने (IMD) आज मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर, बुलढाणा, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
या जिल्ह्यांत वातावरण साधारण
जळगाव, धुळे, नंदुरबार, छ. संभाजीनगर, नाशिक, अहमदनगर, जालना, बीड, परभणी, लातूर, उस्मानाबाद आणि सांगली या जिल्ह्यांना कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. येथील वातावरण साधारण राहील.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- मान्सूनचा जून अखेरपर्यंत विभागनिहाय अंदाज; जुलैचा पहिला आठवडाही ठरणार पाणीदार
- या 6 जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
*