• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

दूध उत्पादक ते दूध संघाच्या अध्यक्षा

Team Agroworld by Team Agroworld
October 26, 2020
in इतर
0
दूध उत्पादक  ते दूध संघाच्या अध्यक्षा
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT


दूध संघाच्या कार्यक्षम अध्यक्षा म्हणून मंदाकिनीताई खडसे यांचा ठसा

राजकारणातील एक मातब्बर व्यक्तिमत्व म्हणून माजीमंत्री आमदार एकनाथराव खडसे हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. त्यांच्या पत्नी मंदाकिनीताई खडसे यांनी देखील सहकार क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ आणि महानंद दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदाची धुरा त्या यशस्वीरित्या सांभाळत आहेत. दोन्ही दूध संघांमध्ये त्यांनी कार्यक्षम महिला अध्यक्षा म्हणून ठसा उमटविला आहे. योग्य व्यवस्थापन कौशल्याच्या आधारे त्यांनी डबघाईस गेलेला जळगाव दूध संघ नफ्यात आणला. शिवाय महानंद दूध संघाची विस्कटलेली घडी व्यवस्थित बसवली. एका लहानशा दूध डेअरीच्या अध्यक्षा म्हणून सहकार क्षेत्रात सुरू झालेली त्यांची कारकीर्द बहरली आहे.

मंदाकिनीताई खडसे यांचे माहेर बुलढाणा जिल्ह्यातील नांदुर्‍याचे. नांदुरा येथील मधुकर नारायण पाटील व रुख्माबाई पाटील यांच्या त्या सर्वात लहान कन्या. त्यांचे संपूर्ण बालपण आई-वडील, तीन भाऊ आणि दोन बहिणींसोबत नांदुर्‍यातच गेले. शिक्षणही तेथेच झाले. मधुकर पाटील हे प्रगतशील शेतकरी होते. प्रत्येकाला शेतीकाम आलेच पाहिजे, असा मतप्रवाह त्या काळी होता. शिवाय शेतकरी कुटुंबात जन्म झालेला असल्याने त्यांना बालपणापासूनच शेतीची ओळख होती. कुटुंबीयांसोबत त्या शेतीची छोटी-मोठी कामे करीत. शेतीसोबत जोडधंदा म्हणून पशुपालन व दुग्ध व्यवसायाचीही त्यांना बर्‍यापैकी माहिती होती. पूर्वीच्या काळी मुलींचे लग्न लवकर केले जायचे. त्यानुसार मंदाकिनीताईंचेही लग्न लवकरच झाले. त्यांची एक बहीण कोथळीला दिलेली होती. तसेच, आमदार एकनाथराव खडसे यांचीही एक बहीण नांदुर्‍याला दिलेली होती. या नातेसंबंधांच्या माध्यमातून 12 एप्रिल 1977 मध्ये ताईंचे लग्न आमदार एकनाथराव खडसे यांच्याशी झाले.
सासरीही शेतीला प्राधान्य
मंदाकिनीताई यांचे सासरे म्हणजे आमदार एकनाथराव खडसे यांचे वडील गणपतराव खडसे यांच्याकडे कोथळीला वडिलोपार्जित 50 एकर शेती होती. खडसे कुटुंबीयांचेही शेतीला प्राधान्य होते. लग्न झाले त्यावेळी एकनाथराव खडसे हे बॉलपेनच्या फॅक्टरीची जबाबदारी सांभाळत होते. त्यांचे चार भाऊ बाहेरगावी असल्याने त्यांना शेतीकडेही लक्ष द्यावे लागत होते. त्या काळी खडसे कुटुंबीय मोठ्या प्रमाणात मिरची पिकवत होते. वर्ष 1978 मध्ये निखिल खडसे यांचा जन्म झाला. त्यानंतर एकनाथराव खडसे हे पूर्णवेळ शेती करायला लागले. मंदाकिनीताईंनाही शेतीची आवड असल्याने त्याही शेतीच्या कामांमध्ये मदत करीत असत. पुढे शीतलताई खडसे व रोहिणीताई खडसे यांचा जन्म झाला. मुलांसाठी दुधाची गरज भासत असल्याने विकतचे दूध घेण्यापेक्षा मंदाकिनीताईंनी दोन म्हशी पाळण्याचा निर्णय घेतला. म्हशींचे चारा व पाणी व्यवस्थापन त्या स्वतः करत. त्यामुळे पशुपालन आणि दूध उत्पादनाचा त्यांना अनुभव मिळाला.
महिलांची डेअरी उभारली
मुलांच्या दुधाची गरज भागवण्यासाठी पाळलेल्या दोन म्हशींपासून मंदाकिनीताईंना 2003-04 मध्ये घरच्या दुधाची गरज भागवून उर्वरित दुधापासून तब्बल 10 हजार रुपये उत्पन्न मिळाले. त्या काळी शेतीकाम करणार्‍या महिलांना चार रुपये प्रतिदिन मजुरी मिळत होती. शेतीकाम करणार्‍या महिलांनी शेतीसोबत जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय केला तर त्यांना चांगला पैसा मिळू शकतो, असा विश्वास त्यांना होता. महिला आपल्या कामाशी प्रामाणिक असतात. शिवाय त्या काटकसर करण्यातही निपूण असतात म्हणून महिलांसाठी डेअरी उभारण्याची संकल्पना त्यांच्या डोक्यात आली. ही संकल्पना 2004 मध्ये त्यांनी प्रत्यक्षात अंमलात आणली. कोथळीला त्यांनी मुक्ताई डेअरी या नावाने महिलांसाठीची डेअरी सुरू केली. डेअरीच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत अध्यक्षपदाची धुरा त्यांच्याच खांद्यावर आहे. डेअरीच्या संचालक मंडळात 11 महिला असून एकूण 250 दूध उत्पादक सभासद आहेत. या डेअरीच्या माध्यमातून महिला सबलीकरणाचा हेतूही साध्य झाल्याचे त्या सांगतात.
दूध संघाच्या अध्यक्षपदी निवड
जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अडचणीत असल्याने एनडीडीबीच्या (नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड) ताब्यात होता. 2006 मध्ये दूध संघाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी तत्कालीन दुग्ध व पशुसंवर्धन विकास मंत्री एकनाथराव खडसे यांनी पुढाकार घेत 6 कोटी रुपयांची आर्थिक मदत केल्याने दूध संघ वाचला होता. त्यानंतर 2013-14 मध्ये एनडीडीबीने दूध संघावरील ताबा सोडल्याने निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली. या निवडणुकीसाठी कोथळीच्या मुक्ताई दूध विकास सोसायटीकडून मंदाकिनीताई यांच्या नावाचा ठराव देण्यात आला. या निवडणुकीत त्या निवडून आल्या. त्यांनी अध्यक्षा म्हणून मुक्ताई डेअरीची भरभराट केलेली असल्याने जळगाव दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली. दुर्दैवाने याच काळात त्यांचे पूत्र निखिल खडसे यांचे निधन झाले. या घटनेमुळे त्या खचल्या. मात्र, नंतर मन घट्ट करून त्यांनी समाजकारण पुढे सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. दूध संघाच्या अध्यक्षा म्हणून शेतकरी बांधवांसाठी खूप काही करता येणार असल्याने त्यांनी अध्यक्षपद स्वीकारण्यास सहमती दर्शवली. 20 ऑगस्ट 2015 रोजी त्यांनी जळगाव दूध संघाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली.
दूध संघाला सावरले
मंदाकिनीताईंनी दूध संघाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा संघाची स्थिती खूपच वाईट होती. दूध संघाची घडी व्यवस्थित बसवण्यासाठी त्यांनी प्रसंगी काही कठोर निर्णय घेतले. चांगले काम करणार्‍यांच्या पाठीवर कौतुकाची थापही मारली. प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक म्हणून मनोज लिमये यांची निवड केली. त्यांच्या मदतीने दूध संघाच्या हिताचे निर्णय घेतले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, राजकीय जोडे बाजूला सारून सर्वपक्षीय संचालकांना एकत्र आणले. सर्वपक्षीय संचालकांना विश्वासात घेऊन दूध संघाच्या हिताचे निर्णय घेतले. त्याचाच परिपाक म्हणजे, दूध संघाचा अवघ्या तीन वर्षात चेहरा-मोहरा बदलला. दूध संघातील अधिकारी-कर्मचार्‍यांचा विश्वास संपादन केल्याने त्यांचाही उत्साह दुणावला. त्यामुळे कामकाजात गती आणि अचूकता आली. दूध उत्पादकांचाही विश्वास संपादन करून त्यांनी दूध संकलन वाढीवर भर दिला. अनेक दूध उत्पादकांना विविध बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिले. मागील वर्षी कर्मचार्‍यांना दोन पगार बोनस तर दूध उत्पादकांना 2 रुपये 20 पैसे प्रती लीटर प्रमाणे 16 कोटी रुपयांचे वाटप केले. या बाबींचा दूध संघाला खूप फायदा झाला.
महानंदचे अध्यक्षपद आले चालून
मंदाकिनीताईंनी कोथळीची मुक्ताई महिला डेअरीच्या अध्यक्षा म्हणून चांगले काम केले. त्यामुळे त्यांना जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली. तेथेही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविल्याने महानंदचे अध्यक्षपद त्यांच्याकडे चालून आले. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी स्वतः फोन करून त्यांना अध्यक्षपद स्वीकारण्यास सांगितले. महानंदचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांनी तेथेही विस्कटलेली घडी व्यवस्थित केली. दूध संकलन वाढीसह प्रक्रियेवर त्यांनी भर दिला. आज महानंदची आर्थिक उलाढाल 550 कोटींच्या घरात आहे. महानंदकडून भारतीय लष्कराला वर्षाकाठी टेट्रा पॅकद्वारे 40 लाख लीटर दुधाचा पुरवठा होतो. आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांसाठी पूरक आहार म्हणून दुधाचा पुरवठा करण्यास तसेच दूध भुकटीच्या निर्यातीला परवानगी द्यावी म्हणून त्यांनी राज्य शासनाकडे प्रस्ताव दिला आहे. त्याबाबत शासन सकारात्मक आहे. महानंदच्या प्रशासकीय कामकाजातही सुसूत्रता आणण्यात त्यांना यश आले. महानंदच्या माध्यमातून त्यांना वर्षभरासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डवर (आणंद) जाण्याचीही संधी मिळाली.
अडचणींकडे आव्हान म्हणून पाहिले
आजवरच्या प्रवासात मंदाकिनीताईंना असंख्य अडचणी आल्या. परंतु, त्या डगमगल्या नाहीत. प्रत्येक अडचणीकडे आव्हान म्हणूनच पाहिल्याने त्या यशस्वी झाल्या. जळगाव दूध संघ व महानंदमुळे खेड्यात राहून दिल्लीपर्यंत पोहचता आले हा माझ्या आयुष्यातील टर्निंग पाईंट असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. परंतु, जबाबदारी सांभाळताना कुटुंबालाही पूर्ण वेळ देण्यावर माझा भर असतो. नातवंडांसोबत राहणे मला आवडते. दिवसा काम आणि सायंकाळनंतर कुटुंबाला वेळ देणे असे माझे नियोजन असते, असेही त्या म्हणाल्या.
ग्रामीण भागातील महिलांचे केले संघटन
ग्रामीण महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मंदाकिनीताईंनी आपल्या गावात सहकारी तत्त्वावर दूध सोसायटीची स्थापना केली. नफ्यात चाललेल्या या सोसायटीने ग्रामीण महिलांना अर्थार्जनाचं साधन मिळवून दिले. या यशस्वी प्रयोगाने त्यांच्यातलं आत्मभान जागं झालं आणि त्यांचं नेतृत्व करणार्‍या मंदाकिनीताईंचा आत्मविश्वास वाढला. या क्षेत्रातच काम करायचं, असा निर्धार अधिक पक्का झाला. त्यानंतर मंदाकिनीताईंनी मागे वळून पाहिलेच नाही. आतापर्यंतच्या प्रवासात त्यांना असंख्य अडचणी आल्या; परंतु तरीही त्या थांबल्या नाहीत. महिलांचे संघटन करता आलं, याचं मला अतिशय समाधान आहे. आज शहरातल्या महिलांना आर्थिक स्वातंत्र्य आहे. कारण काम करण्याच्या, पैसे मिळवण्याच्या संधी त्यांना उपलब्ध आहेत. एखाद्या स्त्रीला संधी मिळाली की ती अतिशय निष्ठेने काम पूर्णत्वाला नेते. गावातल्या महिलांची कष्ट करण्याची तयारी असूनही केवळ संधीच्या अभावामुळे त्या आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नाहीत. महिलांसाठीच्या दूध डेअरीने हीच उणीव दूर केली, असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षपद म्हणजे आव्हानच…
सहकारी दूध महासंघ अध्यक्ष हे अतिशय जबाबदारीचे पद आहे. या महासंघाचे 85 जिल्हा दूध संघ सदस्य आहेत. या सदस्य संघांकडून रोज दुधाची होणारी आवक किती, त्यातून विक्री किती होते, नफा/तोटा किती होतो, पाश्चराइज्ड दुधाव्यतिरिक्त महासंघाची एकूण उत्पादने किती आणि कोणकोणत्या प्रकारची आहेत, अशी सर्व गोष्टींची इत्थंभूत माहिती अध्यक्षाला ठेवावी लागते. दूध हा नाशवंत पदार्थ आहे. आज महाराष्ट्रातील 85 जिल्हा दूध संघ महासंघाशी जोडलेले आहेत. त्यांच्यापैकी 65 दूध संघांकडून महासंघाकडे आवक होते. अशा दूध संघांचे संचालक नेमण्याचे कामही महासंघामार्फत चालते. जिल्हा पातळीवरचे दूध संघ नफ्यात चालतात. या संघांचा महासंघ मात्र सर्व उत्पादने दर्जेदार असूनही तोट्यात आहे, ही आजची वस्तुस्थिती आहे. ती नाकारता येणार नाही. जिल्हा पातळीवर दूध संकलन शेतकर्‍यांकडून केले जाते आणि महासंघाला मात्र अन्य संघांवर अवलंबून राहावं लागते. तसेच महासंघात अतिरिक्त कर्मचारीवर्गही आहे. या दोन प्रमुख कारणांमुळे महासंघ तोट्यात चालतो असे मला वाटते. त्याचबरोबर मुंबईच्या मार्केटमध्ये महानंदबरोबरच अन्य खाजगी ब्रँडही असतात. त्यांच्याशी स्पर्धा असते. त्याचाही प्रतिकूल परिणाम महानंदच्या व्यवसायावर होतो, अशाही परिस्थिती महानंदची भरभराट करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्या म्हणाल्या.
गुणवत्तेत तडजोड नाहीच
महानंद म्हटलं की बहुतेकांच्या डोळ्यासमोर गायीचं दूध, लस्सी आणि ताक ही उत्पादने येतात. त्यापलीकडे लोकांना विशेष माहिती नसते. मात्र, आज महानंदच्या उत्पादनांची साखळी बरीच मोठी आहे. वरील तीन उत्पादनांबरोबरच सुगंधी दूध, साजूक तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, लष्करासाठी जाणारं टोण्ड मिल्क अशी दर्जेदार उत्पादने आज बाजारात आहेत. या सर्व उत्पादनांसाठी लागणारा कच्चा माल म्हणजे आमच्याकडे येणारे दूध. रोज इथे साडेतीन लाख लीटर दुधाची आवक होते. कोणतीही दर्जात्मक तडजोड करायची नाही, हे तत्त्व आम्ही कसोशीने पाळत आलो आहोत. म्हणूनच आलेल्या दुधात काही दोष आढळला तर कोणतीही तडजोड न करता, दुधाचे टँकरच्या टँकर परत पाठवले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्व आघाड्या सांभाळण्याचा प्रयत्न
माझी सुनबाई रक्षा खडसे खासदार आहे. नातवंडे लहान आहेत. त्यांचे संगोपनही महत्त्वाचे आहे. त्यामुळे घरातलीही जबाबदारी आहेच. ती सांभाळून आठवड्यातले 5 दिवस मुंबईत काम, तर दोन दिवस जळगावमध्ये राहून काम करायचे आणि रविवारी पुन्हा मुंबईकडे परतीचा प्रवास सुरू करायचा, अशी सध्या तारेवरची कसरत सुरू आहे. सहकार क्षेत्र पुढे नेले पाहिजे, शेतकर्‍यांना बाजारपेठ उपलब्ध झाली पाहिजे, त्यांना त्यांच्या श्रमाचे मोल मिळाले पाहिजे असे मला वाटते. त्यासाठी ही कसरत जमवावी लागते. मग जमेल तिथे प्रत्यक्ष हजर राहून, जमेल तिथे फोनवर संपर्क करून या सगळ्या आघाडया सांभाळायचा प्रयत्न करते, असे ताईंनी सांगितले.
विकास दूध संघाची उलाढाल 450 कोटी!
जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची आज वार्षिक 450 कोटींची उलाढाल आहे. सद्यस्थितीत संघाचे प्रतिदिन दूध संकलन 3.5 लाख लीटर आहे. हेच संकलन प्रतिदिन 5 लाख लीटरपर्यंत वाढविण्याचा त्यांचा मानस आहे. दूध संघाची क्षमता 2.5 लाख लीटर असून ती 5 लाख लीटर करण्यासाठी त्यांनी प्लँटचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी एनडीडीबीमार्फत 50 कोटींचे राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे (आरकेव्हीवाय) प्रकरण टाकले. त्यात सरकारने नवा प्लँट, नवीन यंत्रसामग्री खरेदी व इतर कामांसाठी 25 कोटी रुपये मंजूर केले. नव्या प्लँटचे काम लवकर पूर्ण व्हावे, यासाठी ते काम एनडीडीबीला दिले आहे. मार्च 2019 पर्यंत नवा प्लँट कार्यान्वित होणार असून शीतकरण, उत्पादन, पॅकिंग व साठवणुकीची क्षमता दुप्पट होणार आहे. दुधाचे संकलन प्रतिदिन 5 लाख लीटर करणे, त्यानंतर उत्पादित मालाच्या विक्रीसाठी जिल्ह्याबाहेरचे मार्केट काबीज करणे, मालाची गुणवत्ता अजून सुधारणे हे आमचे फ्यूचर प्लॅन्स असल्याचे त्यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • X
Tags: जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघनॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डमंदाकिनीताई खडसेमहानंद दूध
Previous Post

चहाचा रंजक इतिहास!

Next Post

कृषी पर्यटन म्हणजे… शहरी जीवनशैलीने ग्रामीण संस्कृतीला मारलेले आलिंगन

Next Post
कृषी पर्यटन म्हणजे…  शहरी जीवनशैलीने ग्रामीण संस्कृतीला मारलेले आलिंगन

कृषी पर्यटन म्हणजे… शहरी जीवनशैलीने ग्रामीण संस्कृतीला मारलेले आलिंगन

ताज्या बातम्या

FPC & Agri Startup कार्यशाळा

ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिकमध्ये 10 ऑगस्टला (रविवारी).. FPC & Agri Startup कार्यशाळा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2025
0

पशुपालक

पशुपालकांनो ! फॉर्मची नोंदणी करा आणि मिळवा शासकीय योजनांचा लाभ !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2025
0

1 ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी..!

1 ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी..!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 29, 2025
0

पाणीसाठा

राज्यातील धरणात 25 जुलैपर्यंतचा पाणीसाठा ; पहा तुमच्या जिल्ह्याची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 28, 2025
0

चार मित्रांचा डेअरी स्टार्टअप, आज 300 कोटींचा यशस्वी व्यवसाय ! 

चार मित्रांचा डेअरी स्टार्टअप, आज 300 कोटींचा यशस्वी व्यवसाय ! 

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 26, 2025
0

आजपासून आठवडाभर पाऊस; पहा तुमच्या जिल्ह्यातील स्थिती !

आजपासून आठवडाभर पाऊस; पहा तुमच्या जिल्ह्यातील स्थिती !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 26, 2025
0

मकरंद जाधव- पाटील नवे कृषीमंत्री

मकरंद जाधव- पाटील नवे कृषीमंत्री

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 23, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा.. अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात 2 ऑगस्टला..

दुग्धव्यवसाय कार्यशाळा.. अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात 2 ऑगस्टला..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 23, 2025
0

उत्तर महाराष्ट्रातील

उत्तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये शनिवारपर्यंत असा असणार पाऊस !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2025
0

निम्म्या महाराष्ट्रावर दुबार पेरणीचे संकट!.. ; पहा तुमचा जिल्हा यात आहे का ?

निम्म्या महाराष्ट्रावर दुबार पेरणीचे संकट!.. ; पहा तुमचा जिल्हा यात आहे का ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

FPC & Agri Startup कार्यशाळा

ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिकमध्ये 10 ऑगस्टला (रविवारी).. FPC & Agri Startup कार्यशाळा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2025
0

पशुपालक

पशुपालकांनो ! फॉर्मची नोंदणी करा आणि मिळवा शासकीय योजनांचा लाभ !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2025
0

1 ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी..!

1 ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी..!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 29, 2025
0

पाणीसाठा

राज्यातील धरणात 25 जुलैपर्यंतचा पाणीसाठा ; पहा तुमच्या जिल्ह्याची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 28, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.