• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

उच्चशिक्षीत युवकाने उभारला पाकीटबंद दुधाचा व्यवसाय

Team Agroworld by Team Agroworld
November 20, 2019
in यशोगाथा
0
उच्चशिक्षीत युवकाने उभारला पाकीटबंद दुधाचा व्यवसाय
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

  • अमरावती जिल्हयातील मोर्शी तालुका हा संत्र्यासाठी प्रसिध्द. पण याच तालुक्याला हायटेक डेअरीच्या माध्यमातून नवी ओळख देण्याचा प्रयत्न युवा शेतकरी विश्वजीत देशमुख यांनी चालविला आहे. व्हिडी फार्म लॅण्ड ब्रॅण्डने खास गिर गाईंच्या दूधाची विक्री विश्वजीतव्दारे होते. नागपूर, अमरावती, मोर्शी या भागात पहिल्या टप्प्यात दूध विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे.
    अशी झाली सुरवात
    दुग्ध व्यवसाय सुरु करण्याच्या विचारात असलेल्या विश्वजीतने गाईंपासून मिळणार्‍या शेण आणि गोमूत्राच्या विक्रीचाही विचार डोक्यात ठेवला होता. त्यामुळेच या दोन्ही घटकातील तांत्रीक माहिती मिळविण्याचे काम त्याने पहिल्या टप्प्यात हाती घेतले. सुरवातीला आय.आय.टी. तज्ज्ञांच्या माध्यमातून शेणात उपलब्ध घटकांची माहिती घेतली. त्यांच्याव्दारेच नंतर पारंपारीक आणि अपारंपारीक ऊर्जेविषयी देखील माहिती मिळाली. अपारंपारीक ऊर्जा वापरणार्‍या देशांविषयी जाणून घेतले. त्यामुळे दूध उत्पादनासोबतच बायोगॅसच्या माध्यमातून ऊर्जा निर्मिती करता येईल का ? याची चाचपणी पुढच्या टप्प्यात सुरु केली. मदर डेअरीच्या उपाध्यक्षांशी देखील याविषयावर चर्चा केली. परंतू त्यांनी कोणतेही सहकार्य करण्यास असमर्थता दर्शविली. इतरांकडून सहकार्य मिळणार नाही, याची खात्री झाल्यानंतर स्वतःच 2017 मध्ये दहा गाईंपासून व्यवसायाची सुरवात केली. या गाईंपासून मिळणारे दूध विकताना सुरवातीला खुप त्रास झाला. लोकांना ए-2 दूध आणि त्याची उपयोगीता याविषयी काहीच माहिती नव्हती. परिणामी विश्वजीतला अपेक्षीत दर मिळत नव्हता. मोर्शी येथील प्रयोगशील शेतकरी अजित जोशी यांना या दूधाची उपयुक्तता कळाल्यानंतर त्यांनी दूध खरेदी सुरु केली, तेच पहिले ग्राहक होते.
    जातीवंत गिर वळू
    गाईंच्या खरेदीसोबतच जातीवंत गिर वळूची खरेदी करण्यात आली. 60 हजार रुपयांना त्याची खरेदी करण्यात आली. पोहरा (जि.अमरावती) येथील शासकीय गिर संवर्धन केंद्रातून याची खरेदी केल्याचे त्यांनी सांगीतले.
    टप्याटप्याने वाढविली संख्या
    प्रकल्पात सुरवातीला दहा गाई होत्या. दर चार महिन्याने तीन गाई याप्रमाणे टप्याटप्याने गाईंची संख्या वाढविण्यात आली. आता प्रकल्पातील गाईंची संख्या 84 वर पोचली आहे. लहान वासरांची संख्या 15 असल्याचे विश्वजीत यांनी सांगीतले. 240 ते 260 दिवस इतकाच दूध देण्याचा कालावधी एका गिर गाईंचा आहे. एका गिर गाईपासून दोन्ही वेळचे मिळून सरासरी 5 ते 6 लिटर दूध मिळते.
    असे आहे शेड
    प्रकल्पाकरीता 90 बाय 70 फुट आकाराचे शेड उभारण्यात आले आहे. 9 लाख रुपयात याची उभारणी झाली. मुक्त गोठा संचार पध्दतीचा अवलंब या प्रकल्पात केला आहे. सकाळी कॉन्सट्रेटेड फिड दिले जाते. दर तीन लिटरसाठी एक किलो याप्रमाणे दिले जाते. गाईंच्या वजनारुप (बॉडी मास इन्डेक्स) देशी फिड देण्यावर भर राहतो. मका, ज्वार, तूरीची चूरी याचे मिक्श्चर यात राहते. 50 मिली कॅल्शीयम, 30 ग्रॅम मिनरलही सोबत दिले जाते. सकाळी हिरवा चारा देण्याचे देखील नियोजन आहे. पावसाळ्यात कोरडा चारा दुपारी दिला जातो. संध्याकाळी परत हिरवा चारा दिला जातो. पावसाळ्याचा अपवाद वगळता इतरवेळी रोज संध्याकाळी हिरवा चारा देण्यावर त्यांचा भर राहतो. 10 ते 12 किलोचे कोरडा आणि 18 ते 20 किलो हिरवा चारा उपलब्ध करुन दिला जातो.
    चारा लागवड
    ज्वारी, यशवंत या हिरव्या चार्‍यासोबत गुळवेल ही दिल्या जातो. दर तीन महिन्यांनी एकदा गुळवेल देण्यावर भर राहतो. विश्वजीत यांच्याकडे 40 एकर शेती आहे. यातील दहा एकरावर ते चारा लागवड करतात.
    आरोग्य असे जपतात
    उन्हाळ्यात कोरफड गाईच्या पाठीला लावल्यास थंडावा राहतो. ज्यांच्याकडे कॅल्शीयम उपलब्ध नसेल त्यांनी बेलाची पाने सावलीत वाळत ठेवायची त्यानंतर ही पाने बारा ते 15 दिवस वाळत घालून हाताने बारीक करुन ती एखाद्या बॉक्समध्ये जमा केल्यास हा पर्याय देखील कॅल्शीयमसाठी पूरक ठरतो. कॅल्शीयमवर अतिरिक्त खर्च करण्याची गरज यामुळे भासत नाही. गाय जमीन चाटते त्यावेळी कॅल्शीयमची कमरतता आहे, असे समजावे.
    पशुधन अधिकार्‍याची सेवा
    जनावरांच्या आरोग्य विषयक समस्या सोडविण्यासाठी ऑन कॉलबेसीसवर पशुधन अधिकार्‍यांची सेवा घेतली जाते. जनावरांचे लसीकरण त्यांच्या माध्यमातूनच नियमीपणे होते. कॅल्शीयम वगळता महिन्याला सहा हजार रुपयांचा खर्च जनावरांच्या आरोग्यावर होतो.
    दुग्धोत्पादनाला दिली व्यावसायिकता
    84 गाईंपासून सरासरी 125 ते 150 लिटर दूध मिळते. सकाळी साडेपाच ते साडेसहा बारा तास त्यानंतर गॅप देत दूध काढले जाते. सुरवातीला मशीनने दूध काढण्याचा प्रयत्न झाला. परंतु, गाईंना सवय नसल्याने सुरवातीला दूध उत्पादन कमी मिळत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे मजुरांमार्फतच दूध काढण्यावर भर दिला गेला. गाय वाल्यानंतर दोन महिन्यांनी ती दुबार गर्भार राहिलीच पाहिजे. त्यामुळे दुग्धोत्पादनात सातत्य राहते. ही पद्धती कटाक्षाने पाळली गेली पाहिजे. मुक्त गोठा पध्दतीत गाई आणि वळू मोकाट सोडल्या जात असल्याने हे साधता येते.
    दूध पॅकींग युनिट
    प्रती तास 500 पाकिट या क्षमतेचे पॅकींग युनिट त्यांनी उभारले आहे. 2017 मध्ये 68 लाख रुपयात याची उभारणी करण्यात आली. रोज 300 ते 350 दूध पाकिटांचे पॅकींग यावर होते. मोर्शीवरुन अमरावती आणि तेथून नागपूर असे वाहनाने दूध पाठविले जाते. अमरावती ते नागपूर असे दूध पाठविण्यासाठी खासगी वाहतूकदाराची मदत घेण्यावर त्यांचा भर राहतो. 30 लिटर दुधापासून 1 किलो तूप मिळते. 250 मिली, 500 आणि एक किलोच्या पॅकींगमध्ये तूपाची विक्री होते. कंपोस्टची विक्री 15 रुपये किलोने होते. शेणापासून तयार गोवर्‍या विकल्या जातात. गोवर्‍याची विक्री देखील करण्यावर भर राहिला आहे.
    असे आहेत दर
  • दूध ः प्रती लिटर 60 रुपये
  • तूप ः1200 रुपये किलो
  • गोमूत्र ः वीस रुपये लिटर
  • गोमूत्र बॉटल ः 50 मिली, साडेचार रुपये

    मुद्रा लोणसाठी झिजविले बँकांचे उंबरठे
    व्यवसाय विस्ताराच्या विचारात असलेल्या विश्वजीत देशमुख यांनी मुद्रा लोणसाठी महाराष्ट्र बँक आणि कोंकण विदर्भ ग्रामीण बँकेकडे विचारणा केली. परंतु, या दोन्ही बँकांनी त्यासाठी नकारात्मकता दर्शविली. परंतु, त्यानंतरही निराश न होताच पैसा उभारण्यासाठी इतर पर्याय विश्वजीत यांनी निवडले. शासनस्तरावरुन मुद्रालोणचा प्रसार होत असला तरी बँका मात्र सुलभरित्या ते मिळू देत नाही, असा अनुभव यातून आल्याचे त्यांनी हताशपणे सांगीतले.
    व्यवसायाचे व्यवस्थापन, उत्पादीत दूधाच्या विक्री व बाजारपेठेत मार्केटींग, वितरणासाठी मोर्शी आठ, अमरावती आणि नागपूर येथे प्रत्येकी सहा व्यक्तींची सेवा या प्रकल्पाकरीता घेण्यात आली आहे. उत्पादीत दुधाच्या वितरणासह सर्वच कामे यांच्या माध्यमातून होतात. ग्राहकांना घरपोच दूध पोचविले जाते.

विश्वजीत देशमुख
9953327934

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: गिर वळूव्हिडी फार्म लॅण्ड ब्रॅण्ड
Previous Post

अॅग्रोवर्ल्डने शेतकऱ्यांपर्यंत नव तंत्रज्ञान पोहोचविले : आ.सुरेश भोळे

Next Post

हिवाळ्यात पशुधनाची घ्यावयाची काळजी!!

Next Post
हिवाळ्यात पशुधनाची घ्यावयाची काळजी!!

हिवाळ्यात पशुधनाची घ्यावयाची काळजी!!

ताज्या बातम्या

न्याय्य व्यापार करारा

ट्रम्प नरमले! भारतासोबत ‘न्याय्य व्यापार करारा’चे संकेत, आयात शुल्क कमी होणार?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 12, 2025
0

थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा

महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 11, 2025
0

AI

शेतात AI कसे वापरावे? सोप्या ट्रिक, मोठे फायदे!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 10, 2025
0

जपान

जपानचे अस्वलांशी युद्ध: 54,000 अस्वल, सैन्य तैनात आणि 5 धक्कादायक सत्ये

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 8, 2025
0

जाणार एकदाचा पाऊस; महाराष्ट्रात थंडीचा मोसम सुरू

जाणार एकदाचा पाऊस; महाराष्ट्रात थंडीचा मोसम सुरू

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 7, 2025
0

एका गावात एकाच दिवशी आले 16 नवे ट्रॅक्टर!

एका गावात एकाच दिवशी आले 16 नवे ट्रॅक्टर! महाराष्ट्राच्या शेतीत नेमकं काय घडतंय?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 6, 2025
0

राज्यात आणखी 2-3 दिवस पाऊस

राज्यात आणखी 2-3 दिवस पाऊस; नव्या कमी दाब क्षेत्राचा प्रभाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 5, 2025
0

ट्रॅक्टरची विक्रमी विक्री

दसरा-दिवाळीच्या काळात ट्रॅक्टरची विक्रमी विक्री

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 4, 2025
0

शेतकऱ्यांचे नशीब पालटणार?

शेतकऱ्यांचे नशीब पालटणार? ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाचा ‘महा-प्लॅन’!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 3, 2025
0

लग्नसराईचे वेध: तुळशी विवाहानंतर उडणार लग्नांचा बार, 18 नोव्हेंबरपासून घुमणार सनई-चौघड्याचे सूर!

लग्नसराईचे वेध: तुळशी विवाहानंतर उडणार लग्नांचा बार, 18 नोव्हेंबरपासून घुमणार सनई-चौघड्याचे सूर!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 1, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

न्याय्य व्यापार करारा

ट्रम्प नरमले! भारतासोबत ‘न्याय्य व्यापार करारा’चे संकेत, आयात शुल्क कमी होणार?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 12, 2025
0

थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा

महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 11, 2025
0

AI

शेतात AI कसे वापरावे? सोप्या ट्रिक, मोठे फायदे!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 10, 2025
0

जपान

जपानचे अस्वलांशी युद्ध: 54,000 अस्वल, सैन्य तैनात आणि 5 धक्कादायक सत्ये

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 8, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish