• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

दूध व्यवसायातून लखपती

Team Agroworld by Team Agroworld
October 26, 2020
in हॅपनिंग
0
दूध व्यवसायातून लखपती
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

उत्तरप्रदेशातील ज्ञानेश तिवारी यांचा धवलक्रांतीत वाटा

उत्तर प्रदेशातील शहाजानपूर जिल्हा धवल क्रांतीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. याच जिल्हातील ज्ञानेश तिवारी यांचा धवलक्रांतीत मोठा वाटा आहे. उच्चशिक्षित असलेल्या ज्ञानेश तिवारी यांना यशस्वी दूध उत्पादक म्हणून ओळखतात. मुर्‍हा म्हशींच्या संगोपनातून अल्पावधीतच लखपती झालेल्या ज्ञानेश यांचे प्रयत्न अनेकांना प्रेरणादायी ठरत आहे.

उत्तर प्रदेशातील शहाजहानपूर जिल्ह्यात नबीपूर नावाचे सर्वसामान्य खेडे आहे. याच गावात तिवारी परिवाराचे कायमस्वरुपी वास्तव्य आहे. शेतीवर उदरनिर्वाह करणार्‍या तिवारी परिवारातील ज्ञानेश यांना शिक्षक व्हायचे होते. ज्ञानेशने जिद्दीच्या बळावर एमए.बीएड. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण करूनही तांत्रिक अडचणींमुळे ते शिक्षण होवू शकले नाहीत. यानंतर त्यांनी निराश न होता नवीन काहीतरी करण्याचा निश्चिय केला. शेतीची आवड त्यांना असल्याने शेतीला काहीतरी पूरक व्यवसाय सुरू करण्याचे त्यांनी ठरवले. शेतीला दूध धंद्याची जोड देण्याचे त्यांनी निश्चित केले. सध्या याच दूध धंद्यातून ज्ञानेश लाखो रुपयांची कमाई करत आहे. एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीत काम करणार्‍या उच्च पदाधिकार्‍याला सुद्धा एवढा पगार मिळणार नाही, एवढे उत्पन्न त्यांना या दूध व्यवसायातून मिळत आहे. डेअरी उद्योग क्षेत्रात नव्याने पाऊल टाकणार्‍यांना ज्ञानेश तिवारी मार्गदर्शक काम करत आहेत.

दूध व्यवसायाकडे वळाले
ज्ञानेश तिवारी यांचे वडील गावातील शाळेत मुख्याध्यापक होते. यासोबतच त्यांना शेतीची देखील आवड आहे. भविष्यात ज्ञानेशने सुद्धा शिक्षक झाले पाहिजे, अशी त्यांच्या वडीलांची इच्छा होती. वडीलांच्या इच्छेनुसार ज्ञानेश यांचा प्रयत्न सुरू होता. प्रबळ इच्छा शक्तीच्या बळावर ज्ञानेशने घरची शेती संभाळत एमए.बीएड. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. याच दरम्यान 2014 साली उत्तर प्रदेश सरकारतर्फे कामधेनू डेअरी योजना सुरू करण्यात आली होती. दूध उत्पादन वाढवणार्‍या या योजनेकडे ज्ञानेश अकर्षित झाले. आपल्या गावातच डेअरी निर्माण करण्याचा चंग ज्ञानेश यांनी बांधला.

पहिली कामधेनू डेअरी
कामधेनू डेअरीच्या मागणीसाठी ज्ञानेश तिवारींनी अर्ज केला. त्यांच्यासोबतच जिल्ह्यातून लाखो अर्ज आले होते. शिक्षण व उपलब्ध शेतीचा निकष लावून ज्ञानेश यांची कामधेनू डेअरी देण्याचे पशुसंवर्धन विभागाने मंजूर केले. शहाजानपूर जिल्ह्यात प्रथमच ज्ञानेश यांनी कामधेनू डेअरीचे निर्माण केले. भारतीय स्टेट बँकेतर्फे डेअरी सुरू करण्यासाठी ज्ञानेश यांना 90 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले. एखाद्या शेतकर्‍याला 90 लाख रुपये देण्याची ही शहाजानपूर जिल्ह्यातील पहिलीच वेळ होती.

डेअरी उद्योगाचे प्रशिक्षण
डेअरी उद्योगाचे प्रशिक्षण घेण्याचे ज्ञानेश यांनी ठरवले. त्यासाठी कर्नाल येथील नॅशनल डेअरी रिसर्च इंस्टीट्यूटची निवड केली. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सुरवातीला 10 एचएफ गायी व 10 मुर्‍हा जातीच्या म्हशींची खरेदी केली. अत्यल्प कालावधीतच त्यांनी गायींची संख्या कमी करून म्हशींची संख्या वाढवली. सध्या त्यांच्याकडे 90 मुर्‍हा म्हशींचा अद्यावत गोठा आहे. दीड एकर क्षेत्रावर त्यांनी आधुनिक पद्धतीचा व्हेंटीलेशन मुक्त गोठा उभारला आहे. गोठ्याची उंची उंच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे गोठ्यात हवा खेळती राहते. हवा खेळती राहिल्याने म्हशींचे अरोग्य अबाधीत राहते.

चारापाण्याची व्यवस्था
म्हशींना पाण्यात डूंबायला अवडते. त्यासाठी ज्ञानेश यांनी गोठ्या जवळच दोन तलावांची निर्मिती केली आहे. म्हशींना या तलावात डुंबण्यासाठी सोडले जाते. तलावात मत्स्य पालनाचा व्यवसाय सुद्धा ज्ञानेश यांनी सुरू केला आहे. उपलब्ध 40 एकर शेतीवर हिरव्या चार्‍याची लागवड करण्यात आली आहे. मका, कडबा पिकाचा चार्‍यासाठी उपयोग केला जातो. म्हशींना लागणारा कोणताच चारा विकत घेतला जात नाही.

दूध व्यवसायाचे व्यवस्थापन
दूध व्यवसायाच्या व्यवस्थापनासाठी तिवारींनी 12 लोकांची टीम तयार केली आहे. सर्वच टीमला कर्नाल येथे प्रशिक्षण देण्यात आले होते. टीम मधील प्रत्येक सदस्याला त्याची जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. म्हशींची देखभाल करण्यासाठी कायम स्वरूपी एका पशुवैद्यकाची नेमणूक करण्यात आली आहे. म्हशींची येणारी पिढी सुदृढ होण्यासाठी दोन सिद्ध वळू गोठ्यात ठेवण्यात आले आहेत. याच बरोबर हरियाणा व पंजाब येथून उच्च दर्जाचे सिमेन सुद्धा मागवण्यात येते.

दूध उत्पादन, विक्री
मुर्‍हा म्हैस प्रती दिवस सरासरी 10 ते 18 लिटर या प्रमाणात दूध देते. यानुसार 350 ते 400 लिटर दुधाचे रोज संकलन होते. सुरवातीला उत्पादित दुधाची विक्री शहाजानपूर जिल्ह्यातील उच्चभ्रु वसाहतींमध्ये केली जात होती. सध्या दुधाची विक्री जिल्ह्यातील हॉटेल व्यवसायिकांना केली जाते. म्हशीच्या दुधाला सरासरी 45 रुपये प्रती लिटर या प्रमाणात भाव मिळतो. प्रती महिना सरासरी पाच लाख लिटर दुधाची विक्री केली जाते. यातील दोन लाख उत्पादन खर्च होतो. सरासरी दरमहा 2 लाख रुपये निव्वळ नफा या दूध व्यवसायातून मिळत आहे. शेणखताचा वापर स्वतःच्या करण्यासोबतच उर्वरित विक्री केले जाते. प्रती ट्रॉली शेणखताला 4 हजार रुपये दर मिळतो.

प्रतिक्रिया
कठोर परिश्रम करण्याची तयारी
कठोर परिश्रम करण्याची क्षमता असेल तर दुग्धजन्य व्यवसाय चांगला आहे. चार वर्षांपासून मी यशस्वी दूध व्यवसाय करत आहेत. उत्तर प्रदेशातील अनेक प्रगतीशील दूध उत्पादक शेतकरी नियमीत भेटायला येतात. ज्या व्यक्तीला कामाचा थकवा येत नाही. त्याच व्यक्तीने या उद्योगात आले पाहिजे. डेयरीच्या विस्तारावर ज्ञानेश तिवारी काम करत आहेत. विस्तारासाठी म्हशींची संख्या सुद्धा वाढवली आहे. बाजारात शुद्ध डेअरी उत्पादनांची खूप मागणी आहे. ताक, दही, पनीर, लस्सी आणि देशी गहिरा लवकरच तयार करण्याच्या योजनांवर काम करत आहे. -ज्ञानेश तिवारी

Share this:

  • Facebook
  • X
Tags: कामधेनू डेअरीदूध उत्पादनदूध व्यवसायविक्री
Previous Post

रेशीम शेतीतून जपली व्यवसायिकता

Next Post

बोअर शेळीपालनात यशस्वी

Next Post
बोअर शेळीपालनात यशस्वी

बोअर शेळीपालनात यशस्वी

ताज्या बातम्या

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.