• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

मल्चिंगवर पीक उत्पादन

Team Agroworld by Team Agroworld
April 27, 2019
in यशोगाथा
0
मल्चिंगवर पीक उत्पादन
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

तांबे कुटुंबाचे शेतीत विविध पीक प्रयोग

श्रीरामपूर तालुक्यातील तांबेवाडी येथील सोपान रावसाहेब तांबे यांची आकरा एकर शेती. त्यांनी मुलांच्या मदतीने शेतीत वेगवेगळे प्रयोग करुन उत्पादनात वाढ केली आहे. गेल्या पाच वर्षापासून मल्चिंगचा वापर करुन टरबुजाचे उत्पादन घेतात. डाळिंबासाठीही ते मल्चिंगचा वापर करतात. मल्चिंगचा वापर केल्यामुळे तांबे यांना नियंत्रित सिंचन पद्धतीने चांगले उत्पादन घेता येत आहे. कांदा बिजोत्पादनही ते घेतात. संरक्षित पाण्यासाठी त्यांनी शेततलावही केलेला आहे.

तांबेवाडी येथील सोपान रावसाहेब तांबे हे प्रगतीशील शेतकरी आहेत. त्यांची वडिलोपार्जित अकरा एकर शेती आहे. त्यात ते सातत्याने वेगवेगळे प्रयोग करत असतात. त्यांना शेतीच्या यशस्वीतेमध्ये राहुल, अतुल, कुणाल या तीनही मुलांचा महत्वाचा वाटा आहे. तिघांचेही पदवीपर्यत शिक्षण झालेले आहे. तांबे यांच्या परिसरात कालव्याचे पाणी मिळते. त्यामुळे पाण्याची बर्‍यापैकी उपलब्धता असते. मात्र तरीही नियंत्रित पद्धतीने पाणी देण्यावर त्यांचा भर आहे. त्यासाठी ते ठिबक, तुषार सिंखनाचा सर्व क्षेत्राला वापर करतात. सोपानराव तांबे यांच्या मुलांनी सातत्याने शेतीमधील वेगवेगळ्या प्ऱयोगाबाबत अभ्यास केलेला आहे. त्यातून ते शेती उत्पादनात वाढ करण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. त्यात डाळिंब, टरबूज व अन्य पिकांसाठी मल्चिंगच्या वापरावर अधिक भर असतो.

डाळिंबाला आच्छादन
तांबे यांनी आठ वर्षापूर्वी अडीच एकर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड केलेली आहे. अडीच एकरावर सुमारे 570 झाडे लावलेली आहेत. सहा वर्षापासून त्याचे उत्पादन देखील मिळत आहे. सुरवातीला एक वर्ष पिकाला मल्चिंग केलेले नव्हते. त्या वर्षी वीस टन डाळिंबाचे उत्पादन मिळाले. दुसर्‍या वर्षापासून मल्चिंगचा वापर केल्याने 35 टन उत्पादन मिळाले. तेव्हापासून ते दरवर्षी डाळिंबाला मल्चिंगचा वापर करतात. सुरवातीला डाळिंबाची जानेवारी महिन्यात साधारण 15 ते 20 तारखे दरम्याण डाळिंब बागेची छाटणी करुन बहार धरत, मात्र बाजारातील मागणीचा आणि दराचा विचार करून चार वर्षापासून 20 फेब्रुवारीला छाटणी करतात. मल्चिंगचा वापर केल्यामुळे डाळिंबात तण वाढत नाही, परिणाम खुरपणीचा खर्च वाचतो, शिवाय पाण्याचा ओलावा टिकून राहतो आणि उत्पादनातही वाढ होत आहे.

टरबूज पिकासाठी मल्चिंग
सोपानराव तांबे पाच वर्षापासून दरवर्षी टरबुजाचे उत्पादन घेतात. त्यासाठी नियमितपणे मल्चिंगचा वापर करतात. यंदा त्यांनी नुकतीच दोन एकरावर शुगर क्विन टरबुजाची लागवड केली आहे. मल्चिंग करण्याआधी ते बेड करून खते देतात.

कांद्याचे बिजोत्पादन
तांबे दरवर्षी कांद्याची लागवड करतात. यंदाही त्यांनी चार एकरावर कांद्याची लागवड केलेली आहे. कांदा लागवड करण्यासाठी दरवर्षी कांद्याचे बिजोत्पादन करतात. यंदा त्यांनी पंधरा गुंठे क्षेत्रावर कांद्याचे बिजोत्पादनासाठी पुणा फुरसुंगी वाणाचे उत्पादन घेत आहे. कांदा लागवडीसाठी घरीच कांदा बिजोत्पादन घेतल्यामुळे दर्जेदार बियाणे आणि त्यापासून चांगली रोपे तयार होतात असे अतुल तांबे यांनी सांगितले.

संरक्षित पाण्यासाठी शेततलाव
तांबेवाडी भागात कालव्याचे पाणी मिळते. मात्र उन्हाळ्यात अथवा गरजेच्या वेळी पाण्याचा तुटवडा भासू नये यासाठी कृषी विभागाच्या मदतीने दोन वर्षापूर्वी 28 गुंठे क्षेत्रावर शेततलाव केलेला आहे. त्याचा वापर ते उन्हाळ्यात डाळिंब, टरबुज व अन्य पिकांसाठी करतात. सर्व क्षेत्राला पाणी देण्यासाठी ते ठिंबक, तुषार सिंचनचा वापर करत आहेत. कांद्यालाही तुषार सिंचनाचा वापर करतात.

गायींचे संगोपन

तांबे यांचा सेंद्रिय उत्पादनावरही भर असतो. साधारण 40 टक्के रासायनिक व 60 टक्के सेंद्रिय खतांचा वापर करतात. यासाठी गोमुत्राचीही स्लरी करतात. त्यासाठी तांबे गावराण गायींचे संगोपन करतात. त्यांच्याकडे दूध व्यवसायासाठी पाच संकरीत गायी आहेत. जनावराच्या चार्‍यासाठी पंधरा गुंठे क्षेत्रावर घासाची लागवड केलेली आहे.

प्रतिक्रिया
मल्चिंगमुळे पिकाला फायदा
आम्ही शेतात डाळिंब, टरबुज, कांद्याचे सातत्याने उत्पादन घेतो. संरक्षित पाण्यासाठी शेततलाव केलेला आहे. मात्र आम्ही डाळिंब, टरबुजासाठी मल्चिंगचा वापर करतो. त्याचा आम्हाला चांगला फायदा झालेला असून उत्पादनात वाढ झालेली आहे. पिकांसाठी नाशिकच्या मुसळगाव एमआयडीसी मधील अ‍ॅग्रोवल कंपनीतून मल्चिंग पेपर खरेदी करतो.

  • अतुल सोपानराव तांबे
    मो.नं. 9527441517

Share this:

  • Facebook
  • X
Tags: कांद्याचे बिजोत्पादनटरबूज पिकासाठी मल्चिंगडाळिंबाला आच्छादनमल्चिंगवर पीक
Previous Post

मिरचीचे भरघोस उत्पादन

Next Post

परदेशी भाजीपाल्यातून नियमित उत्पन्न

Next Post
परदेशी भाजीपाल्यातून नियमित उत्पन्न

परदेशी भाजीपाल्यातून नियमित उत्पन्न

ताज्या बातम्या

निम्म्या महाराष्ट्रावर दुबार पेरणीचे संकट!.. ; पहा तुमचा जिल्हा यात आहे का ?

निम्म्या महाराष्ट्रावर दुबार पेरणीचे संकट!.. ; पहा तुमचा जिल्हा यात आहे का ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2025
0

महाबीज

अकोला महाबीज बीज परीक्षण प्रयोगशाळेस NABL मानांकन प्राप्त

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2025
0

उत्तर महाराष्ट्र हवामान अपडेट

उत्तर महाराष्ट्र हवामान अपडेट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 16, 2025
0

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

Wonder India : ही आहेत भारतातील 6 लपलेली वन्यजीव अभयारण्ये !

Wonder India : ही आहेत भारतातील 6 लपलेली वन्यजीव अभयारण्ये !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

ड्रॅगन फ्रुट

ड्रॅगन फ्रुटच्या पहिल्या काढणीतच 1 लाखाहून अधिक नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 11, 2025
0

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा ₹50,000 पर्यंतच बक्षीस !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2025
0

ड्रोन फवारणी

ड्रोन फवारणीतून महिला करतेय 60 ते 70 हजारांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

निम्म्या महाराष्ट्रावर दुबार पेरणीचे संकट!.. ; पहा तुमचा जिल्हा यात आहे का ?

निम्म्या महाराष्ट्रावर दुबार पेरणीचे संकट!.. ; पहा तुमचा जिल्हा यात आहे का ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2025
0

महाबीज

अकोला महाबीज बीज परीक्षण प्रयोगशाळेस NABL मानांकन प्राप्त

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2025
0

उत्तर महाराष्ट्र हवामान अपडेट

उत्तर महाराष्ट्र हवामान अपडेट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 16, 2025
0

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.