• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

दक्षिण मुंबईतील 107 वर्षे जुन्या पारशी डेअरीचा मेक-ओव्हर, विस्ताराच्या नव्या योजना

नरिमन अर्देशीर यांनी 1916 मध्ये मरीन लाईन्स भागात वयाच्या 18व्या वर्षी दुधाच्या एका कॅनवर सुरू केली होती डेअरी; आता चौथ्या पिढीतील परवणा मिस्त्री आणि झीनिया पटेल या महिलांच्या हाती कारभार

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 2, 2023
in इतर
0
दक्षिण मुंबईतील 107 वर्षे जुन्या पारशी डेअरीचा मेक-ओव्हर, विस्ताराच्या नव्या योजना
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

दक्षिण मुंबईतील 107 वर्षे जुन्या पारशी डेअरी फार्मने प्रथमच नवा अवतार धारण केला आहे. आजही पहिल्या दिवसापासूनचे अनेक ग्राहक त्यांच्या चौथ्या पिढीत पारशी डेअरीशी जुळलेले आहेत. याच नवतरुण ग्राहकांना नजरेसमोर ठेवून पारशी डेअरीच्या व्यवसायातील चौथ्या पिढीने तरुणाईला कनेक्ट होईल, असा चकचकीत, ब्राईट आणि व्हायब्रंट लूक डेअरीला दिला आहे.

जेव्हा तुम्ही एखाद्या डेअरीची कल्पना करता तेव्हा तुम्ही काय पाहता? दूध भरलेली काही मोठी भांडी, त्याबरोबर दूध, पनीर, बटर आणि दहीच्या पाकिटांनी भरलेले रेफ्रिजरेटर आणि असंच बरांचसं काही. पण मुंबईच्या हृद्यस्थानी, मरीन लाइन्सच्या प्रिन्सेस स्ट्रीटवर असलेली 107 वर्षे जुनी पारशी डेअरी म्हणजे फक्त डेअरी किंवा एखादे दुकान नाही. मुंबईच्या पंचतारांकित भागातील बदलांचा साक्षीदार असलेले ते इतिहासातील एक पान आहे. नव्याने मेक-ओव्हर झालेली असली तरी दक्षिण मुंबईतील तीन-चार पिढ्यांतील मुलांनी याच पारशी डेअरी फार्मच्या दुधावर बाळसे धरलेले आहे. काळाच्या ओघात मुंबईतील जुन्या पारसी, इराणी खुणा नाहीशा झाल्या तसे या कुटुंबाने होऊ दिले नाही. आपला वारसा, आपला व्यवसाय जपला. आता चौथ्या पिढीने त्याला काळानुरूप तरुण रुपडे दिले.

 

ॲग्रोवर्ल्ड एक्स्पो (जळगाव, पिंपळगाव)

 

चमकदार लाल दरवाजा; शहेन मिस्त्री यांचे डिझाइन

नव्या डेअरीचे डिझाइन शहेन मिस्त्री आर्किटेक्ट्सने केलेले आहे. आता एक चमकदार लाल दरवाजा पाहुण्यांचे स्वागत करतो. ओपन लेआउटमुळे डिस्प्ले काऊंटर, फ्रिजमधील पदार्थ चटकन नजरेत पडतात. मिठाई-पेढा, खाजा, पापडी-जलेबी, लाडू, मिल्क केक हे आजही दर्शनी भागात जुन्या शैलीतील लाकडी काउंटरमध्ये ठेवलेले असतात. त्याच्या डावीकडील कॅफेसारख्या जागेत काही टेबल, पारंपरिक खुर्च्या आणि मोदकाच्या आकाराचे खास बसण्याचे छोटे-छोटे स्टुल (पौफ) आहेत.

 

मरीन लाईन्स रस्त्यावरून दिसणारा पारशी डेअरीचा आकर्षक लूक.

 

 

मेक-ओव्हर होऊनही जाणीवपूर्वक जपलाय वारसा

दुकानाच्या आत डोकावले तरी मेक-ओव्हर होऊनही जाणीवपूर्वक जपलेला वारसा दिसतो. डेअरीतील भिंती पाहिल्यावर काळाची चाके आपल्याला इतिहासात घेऊन जातात. पूर्वीची मूळ दुधाचे कूपन, काचेच्या दुधाच्या बाटल्या, डेअरीच्या बटर आणि योगर्टच्या जुन्या जाहिराती दिसतात. याशिवाय, एक अगदी खास गोष्ट इथे आहे – दुधवाल्यांचा गणवेश! हो, पूर्वी गणवेश घालायचे दुधवाले, कोबाल्ट निळा गणवेश. दूधवाले तेव्हा ब्लू ब्रिगेड म्हणून ओळखले जात. घरोघरी दूध पुरवताना ते हा निळा गणवेश परिधान करत.

 

संस्थापक नरिमन अर्देशीर यांच्या जुन्या पारशी डेअरीचा लूक.

 

 

कुटुंबाकडे आज 300 एकर शेतजमीन

नरिमन अर्देशीर यांनी 1916 मध्ये, वयाच्या 18व्या वर्षी दुधाच्या एका कॅनवर ही डेअरी सुरू केली. ते स्वतः कॅनभर दूध विविध ठिकाणाहून एकत्रित करून डेअरीत ग्राहकांना विकायचे. तेव्हापासून सुरू असलेल्या या व्यवसायाची, कुटुंबाची कहाणी आज नव्या डेअरीत काही ब्लॅक & व्हाईट तसेच रंगीत छायाचित्रांच्या प्रदर्शनातून सांगितले आहे. आज कुटुंबाकडे 300 एकर शेतजमीन आणि स्वत:ची गुरे, गोठे आहेत.

 

अजूनही हाताने बनवली जाते सुतारफेणी

पारशी डेअरीचे जुने बहुतांश ग्राहक टिकून आहेत. आता नवीन ग्राहक आकर्षित करून त्यानं टिकवून ठेवण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. डेअरीतील उत्पादने आजही तशी जुन्या काळासारखी दर्जेदार, पारंपरिक आहेत. जुन्या पाककृती शाबूत आहेत आणि पदर्शातील मूळ घटक देखील कायम आहेत. डेअरीच्या नव्या पिढीतील प्रतिनिधी परवणा एस. मिस्त्री सांगतात, “आमची सुतारफेणी अजूनही हाताने बनवली जाते. आजही आमचे तूप शुद्ध सोनेरी आणि दाणेदार आहे. आम्ही अजूनही मलई, लोणी हाताने घुसळूनच काढतो.”

 

पारशी डेअरीत नूतनीकरणानंतरही जपलेले जुन्या शैलीतील लाकडी काउंटरमध्ये ठेवलेले डिस्प्ले फ्रीज

 

लंडनमधून व्यवसाय व्यवस्थापन पदवी

35 वर्षीय परवणा मिस्त्री यांनी लंडनमधील ले कॉर्डन ब्ल्यू येथून व्यवसाय व्यवस्थापन पदवी घेतली आहे. सध्या त्या पारशी डेअरीचे संपूर्ण उत्पादन आणि ऑपरेशन सांभाळतात. त्यांची बहीण झीनिया के. पटेल या ब्रँडिंग आणि मार्केटिंग हाताळतात, तर त्यांचे चुलत भाऊ सरफराज आणि बख्त्यार के. इराणी अनुक्रमे विक्री आणि अकाउंट्स हाताळतात. हा कौटुंबिक व्यवसाय आता ही चौथी पिढी एकत्रितपणे सांभाळू लागली आहे.

 

डेअरीतील कामगारांनी संप केला अन् …

हे चौघेजण लहानपणापासून डेअरीमध्ये येत होते. मात्र, डेअरीवर अचानक एक संकट आले, ज्यामुळे त्यांना औपचारिकपणे थेट घरगुती व्यवसायात प्रवेश मिळाला. “2006-2007 मध्ये, डेअरीतील कामगारांनी संप केला. त्यामुळे आम्हा सर्वांनी इतरत्र करत असलेली कामे सोडून दिली. आईच्या बरोबरीने आम्ही तेव्हा डेअरीतील सर्व कामे हाताळले,” असे सरफराज इराणी सांगतात. तेव्हापासून त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.

डेअरीचा मेक-ओव्हर केल्यापासून काही बदल जाणवला का, असे विचारले असता, परवणा मिस्त्री म्हणतात, “कॅफेमध्ये सहसा संध्याकाळच्या वेळी गर्दी असते. कॉलेज तरुण-तरुणी एक ग्लास लस्सी किंवा कुल्फी घेण्यासाठी जरूर थांबतात. नव्या चीअरफुल वातावरणात ते ग्रुप सेल्फी घेतात… आता पारंपारिक दर्जासह डेअरी कॅफेतील वातावरण अधिक चैतन्यशील वाटत आहे.”

 

पारशी डेअरीचे संचालक मंडळ – बख्त्यार के. इराणी, परवाना एस. मिस्त्री, मेहेरू के. पटेल, शेरनाझ के. इराणी, झीनिया के. पटेल, सरफराज के. इराणी, जेरू नरिमन.

 

द ग्रेट इंडियन टॉफी

डेअरीतील प्रत्येक कोपऱ्यातून लक्ष वेधून घेणारे टॉफी व्हेंडिंग मशीन खास आकर्षण आहे. “द ग्रेट इंडियन टॉफी” असे त्याला नाव देण्यात आले आहे. त्यातून दुधाची टॉफी वितरीत होते. या मशीनच्या बाजूलाच दोन मोठ्या रेफ्रिजरेटर्समध्ये ठेवलेले दूध, पनीर, तूप, लस्सी, गोड दही आणि मिष्टी डोई यासह विविध प्रकारचे दुग्धजन्य पदार्थही प्रसिद्धच आहेत.

डेअरीमध्ये आता मोठ्या खिडक्या देखील आहेत, ज्या बाहेरील गजबजलेल्या रस्त्याचा नजारा दाखवतात. या खिडक्यातून भरपूर नैसर्गिक प्रकाश आत येतो. या खिडक्या जणू नव्या पारशी डेअरी फार्मचा आर्ट कॅनव्हास म्हणून देखील कार्य करत आहेत. डेअरीने प्लीज सी एजन्सी आणि प्रॉडक्शन डिझायनर तिया तेजपाल यांच्यासोबत ब्रॅण्डिंग आणि प्रमोशन करता केला आहे. त्यातून डेअरीच्या हॉट सेलिंग उत्पादनांची लक्षवेधी शैलीत जाहिरात केली गेली आहे. एजन्सीने अगदी क्रिएटिव्ह काम केले आहे. डेअरीच्या खिडक्यांपैकी एक खिडकी दूध, लस्सी आणि दहीच्या मोठ्या डब्यांनी रोली-पॉली खेळत सजलेली आहे. दुसर्‍या खिडकीत तुपाचे भांडे अशा पद्धतीने रचलेले दिसतात, की त्यातून घी हा शब्द इंग्रजीत जाणवतो.

 

चैतन्यशील, आकर्षक वातावरण

झीनिया सांगतात, “हे सर्व इतकं लक्ष्यवेधी आणि आकर्षक झाले आहे, की रस्त्याने जाणारे लोकही या कलाकृतींसह फोटो क्लिक करण्यासाठी आवर्जून थांबताना दिसत आहेत. नवीन पिढीच्या ग्राहकांसाठी डेअरी अधिक चैतन्यशील आणि आकर्षक व्हावी, अशी आमची इच्छा होती. इथली ओपन रेफ्रिजरेटर लोकांना तुमच्यासाठी कोणीतरी सेवा द्यायला येईल, याची वाट पाहायला न लावता, स्वतः हवे ते उत्पादने निवडून आणि कॅश काउंटरकडे जाण्याची मुभा देतात.”

इथले टॉफी मशीन लहान मुलांना लक्षात घेऊन तयार केले गेले आहे. लहान मुले सहसा आई-वडीलांसोबत डेअरीत जायला तयार नसतात कारण तिथला लूक, वातावरण हे सारं जुनाट, बोअरिंग असते. डेअरी हे कंटाळवाणे ठिकाण मानले जाते, म्हणून मुलांना मोठ्यांना कंपनी द्यायची नसते. त्यामुळे पारसी डेअरीने त्यांच्या टॉफीचे रीब्रँड केले, त्याला संपूर्ण सर्कससारखे वातावरण दिले आणि ते मजेदार करण्यासाठी एक डिस्पेंसिंग मशीन जोडले. स्टोअरच्या दुसर्‍या कोपऱ्यात एक गिफ्ट शॉप आहे, जे ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार भेटवस्तू कस्टमाईज करण्यात मदत करते.

 

पारशी डेअरी स्टोअरच्या भविष्यात विस्ताराच्या योजना

नव्या सुधारणा केवळ देखाव्यापुरत्या मर्यादित नाही. पारशी डेअरी स्टोअरच्या भविष्यातील अनेक विस्तार योजना आहेत. पुढील दोन महिन्यांत आणखी दोन फिजिकल आऊटलेट्स-बोरिवली आणि घाटकोपरमध्ये उघडले जाणार आहेत. महाराष्ट्राच्या इतर प्रमुख शहरांमध्ये, नंतर गुजरात, दिल्ली , बंगळुरू आणि भारताच्या इतर भागांमध्ये डेअरीचा विस्तार करण्याचा विचार आहे. एक दिवस जगभरातील काही प्रमुख शहरात पारसी डेअरी पोहोचेल, असा नव्या पिढीला विश्वास आहे.

 

Nirmal Seeds

 

लहानगीची एक आयडिया – बार्बी बर्फी

चौथी पिढी हा वारसा इतक्या चांगल्या प्रकारे पुढे कसा चालवत आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ते तर सोडाच, तुम्हाला आणखी आश्चर्य वाटेल, की पाचवी पिढीही व्यवसायात स्वारस्य व्यक्त करत आहे. झीनिया पटेल सांगतात, की “रिनोव्हेशननंतर परवणाची मुलगी डेअरीत आली होती, तेव्हा तिने आमच्या आईस्क्रीम बर्फीकडे पाहिले. ती गुलाबी रंगाची बर्फी आणि त्यावर आईस्क्रीम शिंपडले आहे. ते पाहून ती म्हणाली ‘मासी, याला आपण बार्बी बर्फी म्हणायला हवे’. आम्ही ती सूचना अत्यंत गांभीर्याने घेतली. आईस्क्रीम बर्फी या मूळ नावाखाली हॅशटॅग म्हणून बार्बी बर्फी जोडले आणि ती आयडिया क्लिक झाली. ग्राहकांना त्याचे आकर्षण वाटतेय.”

 

OM Gayatari Nursery
OM Gayatari Nursery

 

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • एका बिघ्यात चार महिन्यात 9 लाखांची कमाई, ‘या’ फुलाची करा शेती
  • लुप्त होणार्‍या वाणाला अ‍ॅड. गणेश हिंगमिरे यांनी दिले जीवदान

 

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: दक्षिण मुंबईनरिमन अर्देशीरपारशी डेअरी
Previous Post

केळीला या बाजार समितीत मिळाला इतका दर

Next Post

टेरेस गार्डनिंगमधून सेंद्रिय भाजीपाल्याचे उत्पादन

Next Post
टेरेस गार्डनिंग

टेरेस गार्डनिंगमधून सेंद्रिय भाजीपाल्याचे उत्पादन

ताज्या बातम्या

साखर आयुक्त

साखर आयुक्त सिद्धराम सालिमठ यांची सहा महिन्यातच बदली!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 17, 2025
0

पावसाचा इशारा

राजस्थानमधून मान्सूनच्या माघारीला सुरुवात; राज्यात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाचा मुक्काम..! पहा राज्यासह जिल्हानिहाय अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 15, 2025
0

GST सुधारणांमुळे कृषी क्षेत्राच्या शेअर्समध्ये तेजी ; पहा कोणत्या कृषी कंपन्यांचे किती शेअर्स वधारले

GST सुधारणांमुळे कृषी क्षेत्राच्या शेअर्समध्ये तेजी ; पहा कोणत्या कृषी कंपन्यांचे किती शेअर्स वधारले

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 13, 2025
0

राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार

राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ; पहा 18 सप्टेंबरपर्यंतची विभाग व जिल्हानिहाय स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 12, 2025
0

राज्यातील धरणांत 87 टक्के साठा

राज्यातील धरणांत 87 % साठा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 10, 2025
0

कृषी आधारित अर्थव्यवस्थेला चालना

जीएसटी घटल्याने कृषी आधारित अर्थव्यवस्थेला चालना…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 5, 2025
0

नव्या अमेरिकी टेरिफचा कोणत्या देशांना काय फायदा..

नव्या अमेरिकी टेरिफचा कोणत्या देशांना काय फायदा..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 5, 2025
0

आता फक्त 5% जीएसटी

शेती यंत्रसामग्री, ट्रॅक्टर, खतांवर आता फक्त 5% जीएसटी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 4, 2025
0

भारतीय बासमतीवर 50% टेरिफ

पाकिस्तानच्या बासमतीची अमेरिकी बाजारात होणार चांदी!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 4, 2025
0

कपास किसान ॲप

कापूस विकण्यासाठी आता घरबसल्या करा देशभरातील बाजार समित्यांत बुकिंग!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 4, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

साखर आयुक्त

साखर आयुक्त सिद्धराम सालिमठ यांची सहा महिन्यातच बदली!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 17, 2025
0

पावसाचा इशारा

राजस्थानमधून मान्सूनच्या माघारीला सुरुवात; राज्यात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाचा मुक्काम..! पहा राज्यासह जिल्हानिहाय अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 15, 2025
0

GST सुधारणांमुळे कृषी क्षेत्राच्या शेअर्समध्ये तेजी ; पहा कोणत्या कृषी कंपन्यांचे किती शेअर्स वधारले

GST सुधारणांमुळे कृषी क्षेत्राच्या शेअर्समध्ये तेजी ; पहा कोणत्या कृषी कंपन्यांचे किती शेअर्स वधारले

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 13, 2025
0

राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार

राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ; पहा 18 सप्टेंबरपर्यंतची विभाग व जिल्हानिहाय स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 12, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.