गोठ्यातील गुरे-ढोरे मुकी असतात, ते त्यांची समस्या नेमकेपणाने शेअर करू शकत नाही. अशा परिस्थितीत त्यांच्या वेदना समजून घेऊन त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. हिवाळ्यात दुग्ध व्यवसायात नुकसान होऊ शकते. बहुतेक गुरांचा मृत्यू थंडीत होतो. अशा परिस्थितीत गुरांचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही उपाय सांगत आहोत.
दुभत्या जनावरांचा थंडीपासून बचाव करणे आवश्यक ठरते. देशातील अनेक राज्यांमध्ये थंडी पडायला सुरुवात झाली आहे. तापमानातही घट नोंदवली जात आहे. येत्या काही दिवसांत थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. अशा सध्याच्या बदलत्या वातावरणात गुरांना अधिक त्रास होऊ शकतो. दुग्ध व्यवसायात मोठ्या प्रमाणात नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी आपल्या गुरांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
गुरांमध्ये ही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा
थंडीमुळे गुरांमध्ये ताप किंवा पोटदुखीच्या तक्रारी वाढतात. जर तुमच्या गुरांमध्ये याची लक्षणे दिसू लागली असतील तर त्यांना प्रथमोपचार द्या आणि शक्य तितक्या लवकर पशुवैद्यकाला दाखवा. गुरे स्वतः त्यांची समस्या सांगू शकत नसल्याने गोठ्याच्या निरिक्षणातून त्यांच्या हालचालीत होणारे बदल समजून घ्यायला हवेत.
गुरांच्या अंगावर घालावीत तागाची पोती
थंडीच्या मोसमात गुरांच्या अंगावर ज्यूटची (ताग) पोती घालता येतात. वास्तविक, तागाची पोती शरीराला ऊब देतात. अशा परिस्थितीत तागाची पोती पांघरल्यास प्राण्यांना थंडीपासून वाचवता येते. हिवाळ्यात त्यांच्या राहण्याच्या जागेत ओलावा होऊ देऊ नका. ओलाव्यामुळे जनावरांवर थंडीचा प्रभाव आणखी वाढणार आहे. यामुळे तुमची दुधाळ जनावरे आजारी पडू शकतात. त्यामुळे दूध उत्पादनात घट होऊ शकते.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- वाफसा आणि पिकांसाठी पाणी व्यवस्थापन
- ग्रेन ड्रायर म्हणजे काय? शेतकरी सर्वात स्वस्त किंमतीला कोणते ग्रेन ड्रायर खरेदी करू शकतात?