Home हॅपनिंग कृषी सेवक पदभरती : 16, 19 जानेवारी 2024 रोजी ऑनलाइन परीक्षा

कृषी सेवक पदभरती : 16, 19 जानेवारी 2024 रोजी ऑनलाइन परीक्षा

कृषी सेवक पदभरती संदर्भातील ऑनलाइन परीक्षा आयबीपीएस कंपनीमार्फत 16 व 19 जानेवारी 2024 रोजी घेण्यात येणार आहे. शासनाच्या 18 ऑक्टोबर 2023 रोजीच्या पत्रानुसार पेसा क्षेत्रातील पदभरतीस निर्बंध असल्याने फक्त नॉन-पेसा क्षेत्रातील या विभागातील जाहिरातीत नमूद एकूण 159 पदांसाठी पदभरतीची कार्यवाही करण्यात येणार आहे.

कृषी विभागाच्या अधिनस्त कार्यालयांच्या आस्थापनेवरील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर भरण्यासंदर्भातील सरळसेवा पेसा व नॉन पेसा पदभरतीसाठी जाहिराती 11 ते 14 ऑगस्ट 2023 या कालावधीत लातूर विभागस्तरावरुन प्रसिध्द करण्यात आल्या. या जाहिरातीच्या अनुषंगाने दिनांक 14 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीत इच्छुक उमेदवारांकडून अर्ज भरण्याची कार्यवाही पूर्ण झालेली आहे.

परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र यशावकाश आयबीपीएस संस्थेकडून संबंधितास उपलब्ध करुन देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल, असे लातूर विभागाचे कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

New Holland
Ganesh Nursery

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇