जळगाव : ‘फाली म्हणजे फ्युचर ॲग्रीकलर लिडर ऑफ इंडिया होय, त्याच फाली या शब्दाचा एफ- फॉर्मर सेंट्रीक, ए- ॲप्रेरिसियेट, एल – लार्ज गोल व लॉर्न टर्म, आय – इनोव्हेशन यावर काम केल्यास शेतीत बदल होऊ शकता त्यासाठी प्रत्येकाने आपले ध्येय उच्च ठेवले पाहिजे ते पूर्ण करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नशील असले पाहिजे, असे मार्गदर्शन आयटीसी कंपनीचे ॲग्री ॲण्ड आयटी बिझनेसेसचे गृप हेड शिवकुमार एस यांनी केले.
जैन हिल्स येथे ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (FALI) च्या अकराव्या अधिवेशनच्या तिसऱ्या सत्राचा आज समारोप झाला. इनोव्हेशन व ॲग्रीटेक बिझनेस प्लॅन स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर इनोव्हेशन व बिझनेस मॉडेल स्पर्धेतील परिक्षकांसह जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, फालीच्या संचालिका नॅन्सी बॅरी, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल पाटील, सुनिल गुप्ता, अभिजीत जोशी, यूपीएलचे अमोल फाळके, अंजिक्य तांदळे, राकेश कुमार, कांजी परमार, गोदरेज ॲग्रोवेटचे स्वीटी वेगुंटा, मंगेश देशमुख, रविंद्र पठारे, स्टार ॲग्रीचे कैलास कालबंदे, प्रविण कुमार कासट, नाबार्ड अमित तायडे, प्रॉम्पट आयुषी मित्तल, दिव्या छांगलानी, व्हर्व फॉर्मस्टे विघ्नेश व्हि जे., एसबीआय फाऊंडेशनचे किरण घोरपडे यांच्यासह कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दोघंही स्पर्धेतील विजेत्यांना चषक, सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. सोबतच माजी फाली विद्यार्थी व शिक्षकांसह सहकार्य करणाऱ्या कंपनी प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला. तर हर्ष नौटियाल यांचा विशेष सन्मान करण्यात आला. स्मॉल गृप सेशन मधील चर्चेतील सहभागी विद्यार्थ्यांपैकी चैताली कलंबडे गोंदिया, गौरी जैन जयपूर, विद्याश्री पुजारी पुणे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. माजी विद्यार्थी अर्थव गिरी गोसावी, विशाल माळी, शर्वरी झाल्टे यांनी मनोगत व्यक्त केले. या कंपनी प्रतिनिधींनीसुद्धा संवाद साधला. अल्पभुधारक शेतकऱ्यांबाबत आपण विचार केला पाहिजे. शेतीत खूप संकटे आहेत मात्र ती कमी करण्यासाठी सोल्यूशन सुद्धा असतात त्याबाबतचा विचार फाली इनोव्हेशन स्पर्धेत दिसला. व्हॅल्यू अॅडीशनचा विचार करून उत्पन्न कसे वाढेल यासाठी ध्येयपूर्वक कार्य केले पाहिजे त्यासाठी बिझनेसमधील लॉर्ज गोल्स ठेवले पाहिजे. त्यात सातत्य असावे तंत्रज्ञानासह नवनवीन कल्पनांना पुढे आणले पाहिजे असे मनोगत शिवशंकर एस. यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना जैन इरिगेशनचे अनिल जैन म्हणाले की, भारत २०४७ मध्ये विकसीत राष्ट्र म्हणून पुढे येण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आहे त्यांच्या स्वप्नाला पूर्ण करण्याची जबाबदारी ही फाली च्या कृषीक्षेत्रातील भविष्यदर्शी नेतृत्त्वाची आहे. त्यासाठी आतापासून प्रयत्न केले आहे. भारताच्या कृषी क्षेत्राचा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने विचार केला असता आवाका खूप मोठा आहे मोठी आर्थिक उलाढाल यात होत असते. कोरोना काळात संपूर्ण भारत बंद असताना कृषी क्षेत्र थांबले नाही कितीही एआय आले तरी अन्न हे जमिनीतून उगवावे लागेल त्यासाठी विशिष्ट पद्धतींचा अवलंब करावा लागेल त्यामुळे भारत विकसीत राष्ट्र करायचे असेल तर शेती ही तंत्रज्ञानासह करावी लागेल. कृषी हे नोबल प्रोफेशन आहे. शेतकरी कठिण परिस्थीतही उत्पन्न घेत असतो त्यांची मानसिकता कणखर असते अशाच मानसिकतेतून शेती केली पाहिजे. संघर्ष कितीही असो सोल्यूशन काढले पाहिजे त्यासाठी फक्त मानसिकता महत्त्वाची आहे. प्रवासात चढ उतार येत असतात शॉर्टकट कधीही मारू नये संघर्षातून मिळालेले यश हे शाश्वत असते असे मार्गदर्शन अनिल जैन यांनी विद्यार्थ्यांसोबत केले. नॅन्सी बॅरी यांनी आभार मानले. हर्ष नौटियाल, रोहिणी घाडगे यांनी सूत्रसंचालन केले.
इनोव्हेशन स्पर्धेतील विजेते
फाली अकरावे अधिविशेनच्या तिसऱ्या सत्रात जैन हिल्सच्या आकाश ग्राऊंडवर अॅग्रीटेक इनोव्हेशन स्पर्धा घेण्यात आली. त्यात राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात व महाराष्ट्रातून ४९ इनोव्हेशन फालीच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. लाईफ सेव्हींग शूज हे मॉडेल महात्मा गांधी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय, आष्टा सांगली यांचा प्रथम क्रमांक आला. द्वितीय श्री यमायी श्रीनिवास विद्यालय, औंध सातारा (ओनियन ॲण्ड गार्गिलीक लिफ कटर), तृतीय एस. एस. लिगार्डे विद्यालय, अकोला वासूद जि. सोलापूर (मॅझीक ट्रॅक्टर), जयश्री पेरीवल इंटरनॅशनल स्कूल जयपूर (ॲग्री चार्ज इफिशन्सट सोलार पॅनल सेटिंग) चतुर्थ तर खान्देश गांधी बाळूभाई मेहता विद्यालय कासारे धुळे (प्रोटेबल चाफ सेपरेटर) यांचा पाचवा क्रमांक आला.
बिझनेशन प्लॅन सादरीकरणातील विजेते
जैन हिल्सच्या परिश्रम हॉल, बडी हांडा हॉल, गांधी तिर्थच्या कस्तूरबा हॉलसह क्लासरूमध्ये एकाच वेळी फालीच्या विद्यार्थ्यांनी ४९ बिझनेशन प्लॅन चे सादरीकरण केले. यात प्रथम क्रमांकाने ग्रामप्रबोधनी विद्यालय, साळूंब्रे जि. पुणे (ड्राय पावडर व्हेजीस) तर आदर्श माध्यमिक विद्यामंदिर विटा जि. सांगली (पेटल रिव्होल्यूशन) द्वितीय, श्रीराम विद्यालय नवलाख ऊंब्रे जि. पुणे (व्हर्मी कंपोस्ट) तृतीय, न्यू इंग्लीश स्कूल फॉर गर्ल्स आष्टा सांगली (ओनियन आईल ॲण्ड शॉम्पू प्रोडक्शन) चतुर्थ, खान्देश गांधी बाळूभाई मेहता विद्यालय कासारे धुळे (करंज ऑईल ॲण्ड पावडर प्रोडक्शन) पाचवा क्रमांक मिळाला.
फाली हे उत्प्रेरक आहे – अनिल जैन
सध्याच्या शैक्षणिक पद्धतीमध्ये कृषिविषयक माहिती पाहिजे तितक्या प्रमाणात नाहीय. त्यामुळे फाली सारख्या कृषिविषयक प्रात्याक्षिकांसह नाविन्यपूर्ण संशोधनाला चालना देणारा उपक्रमाची आज भारत आवश्यकता आहे. गेल्या अकरा वर्षापासून फ्युचर ॲग्रीकल्चर लीडर्स ऑफ इंडियाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचता आले. शेतीविषयीची विचाराधारा बदलविण्यात फालीची मोठी भूमिका आहे.फाली हे ग्रामीण भागात, शेती व शेतीपूरक उद्योग क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्यांसाठी उत्प्रेरक म्हणून कार्य करत आहे. अशी माहिती पत्रकारांशी संवाद साधताना फाली असोसिएशनचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी दिली. त्यांच्यासोबत ॲग्री ॲण्ड आयटी बिझनेसेसचे ग्रृप हेड शिवकुमार एस, फालीच्या संचालिका नॅन्सी बॅरी उपस्थित होते. मोठ्या शहरांमधील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये शेती व शेतकऱ्यांविषयी संवेदनशील जागृती निर्माण व्हावी यासाठी फाली e+ हा उपक्रम राबविला जात आहे. जेणेकरून ग्रामीण भागातील शेतीमधील उदासिनता दुर होण्यासाठी मदत होईल. स्वत:च्या मनातील विचार बदला तर सामाजिक स्तरावर शेतीला सन्मान मिळेल परिणामी शेतीतून भारताचे भविष्य घडेल यासाठी फालीसारखे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे. फालीचे काही माजी विद्यार्थी हे स्वत: व्यवसायिक झाले आहेत. ते रोजगार निर्मिती करत आहेत त्याचा आनंद आहे. त्यातील अर्थव गिरी गोसावी-सांगली याने आपल्या व्यवसायातील प्रगती विषयी सांगितले. रिसर्च डेव्हलपमेंटसाठी विशेष प्रयत्न करत असल्याचेही अनिल जैन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यासाठी फालीच्या विद्यार्थ्यांना सांगितले त्यासाठी शिष्यवृत्ती, इंटरर्नशील आणि व्हेंचर फडिंग या तीन माध्यमातून फाली असोसिएशन मदत करत असल्याचेही त्यांनी सांगितले.