• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

इस्त्राईली महिला शेतीत अग्रेसर

Team Agroworld by Team Agroworld
October 26, 2020
in यशोगाथा
0
इस्त्राईली महिला शेतीत अग्रेसर
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT


इस्राईल दौर्‍यात एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे तेथील महिलांचा सर्वच बाबतीतील सक्रिय सहभाग. शेती, उद्योग, व्यवसाय, हॉटेलमध्ये व्यवस्थापन आदी भूमिका अत्यंत काटेकोरपणे पार पाडण्याचे काम तेथील महिला सहजपणे करतात. आम्ही जॉर्डनमधून इस्राईलमध्ये प्रवेश करतानाच याची चुणूक दिसली. पुरुषांच्या बरोबरीने महिला प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करतात. यामुळेच इस्त्राईल सर्वच आघाड्यांवर पुढे असल्याची जाणीव मला झाली.
इस्त्राईलमध्ये प्रवेश केल्यावर तेथील तपासणी नाक्यावर आमच्या सामानाची तपासणी झाली. त्यानंतर आमची व्यक्तिगत पातळीवर चौकशी-तपासणी होणार होती. मी चौकशी कार्यालयातील एका खिडकीतून आत डोकावून पाहिले. कार्यालयात सर्वत्र महिला अधिकारी व कर्मचारी दिसत होत्या. काय विचारतील? त्यांची भाषा आपल्याला कळेल का? असे प्रश्न मला पडत होते. एवढ्यात आमच्यातील दोघांना चौकशी करणार्‍या महिला अधिकार्‍यांनी रेड सिग्नल देत थांबवून घेतले. आता त्या दोघांची वरिष्ठ अधिकार्‍यांकडून चौकशी होणार होती. त्या दोघांची चौकशी झाल्यानंतर माझा नंबर आला. त्या कनिष्ठ महिला अधिकार्‍यांनी कोठून आलात? कोठे जायचे आहे? इस्त्राईलमध्ये किती दिवस राहणार? कोणाला भेटणार आहात का? कशासाठी आलात? असे प्रश्न त्यांच्या इंग्रजी शैलीत विचारले. मी आपल्या इंग्रजी शैलीत प्रश्नांना उत्तरे दिली. 5 ते 6 प्रश्न विचारल्यानंतर ती हसली आणि वेलकम इन इस्त्राईल असे म्हणत तिने ग्रीन सिग्नल दिला. तेव्हा कुठे मला हायसे वाटले. या तपासणी नाक्यावर सुरक्षारक्षक देखील युवती होत्या. काळ्याशार गणवेशात हातात स्वयंचलित बंदूक घेतलेल्या, करारी चेहर्‍यावर जराही स्मित हास्य नसलेल्या महिला सैनिक पाहून धडकीच भरायची वेळ आली.
सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकल्प
तेल अवीवपासून 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या इर्शान गावाजवळ शफदान या सांडपाण्यावर प्रक्रिया करणार्‍या प्रकल्पाला आम्ही भेट दिली. या प्रकल्पाजवळ आमची बस पोहचली. गाईडने उतरताना प्रकल्पाबाबत सांगताच काहींनी बघण्यास नाराजी व्यक्त केली. आम्ही मात्र उत्सुकतेने प्रकल्प पाहण्यासाठी गेलो. या प्रकल्पाची माहिती आम्हाला ज्युली नावाच्या एका महिलेने दिली. येणार्‍या पर्यटकांना या योजनेची माहिती देण्याची जबाबदारी तिच्याकडे होती. ती या कार्यालयातील एकटी कर्मचारी होती. अधिकारीही तीच आणि शिपाईही तीच. इस्राईलमधील औद्योगिक, घरगुती, दवाखाने यांचे सांडपाणी आणि पावसाचे पाणी यावर येथे प्रक्रिया केली जाते. दररोज तीन लाख 80 हजार घनमीटर पाण्यावर येथे प्रक्रिया करण्यात येते. शुद्धीकरण प्रक्रिया 24 तास सुरू असते. इस्राईलमधील 25 शहरे आणि 87 प्रकल्पांचे सांडपाणी येथे वाहून आणले जाते. हे सांडपाणी त्या त्या शहरांनी पाईपलाईनने तिथपर्यंत आणले आहे.
प्रक्रियायुक्त पाण्याचा शेतीसाठी वापर
प्रक्रिया करून हे पाणी शेतीसाठी वापरतात. इस्राईलच्या शेतीला लागणार्‍या एकूण पाण्याच्या 15 टक्के पाण्याची गरज यातून भागविली जाते. विशेष म्हणजे हे सांडपाणी विकत घेतले जाते आणि शुद्ध करून शेतीला विकत दिले जाते. ना नफा, ना तोटा या तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात येतो. भारतात आज पावसाचे प्रमाण कमी होत आहे. भविष्यात अशा प्रकारच्या प्रकल्पाची आवश्यकता निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून सर्वच शेतकर्‍यांनी सुमारे दोन तास हा प्रकल्प पाहिला. येतांना जे शेतकरी नाराज होते परततांना ते समाधानी दिसत होते. या प्रकल्पात येणार्‍या सांडपाण्यातून माती, प्लॅस्टिक, लोखंड आदी धातू वेगळे करण्यात येतात. यातून रोज 30 टन माती वेगळी करण्यात येते. महिन्याला चारशे टन खते तयार होतात. या प्रकल्पासाठी वॉटर कॉर्पोरेशन ऑफ इस्राईल मदत करत असल्याची माहिती मिळाली. इस्राईलच्या अन्य शहरातील सांडपाणीही येथे आणून त्यावर प्रक्रिया करून ते शेतीसाठी वापरण्यात येणार आहे.
(क्रमशः)
मो.नं. 965771305
(लेखक हे रावेर, जि. जळगाव
येथील दै. सकाळचे बातमीदार आहेत)

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: इस्त्राईली महिलाशेतीसांडपाण्यावर प्रक्रिया
Previous Post

शेतीच्या यशात जपानी महिलांचा हात

Next Post

इस्त्राईली शेतीत कल्पकता, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर

Next Post
इस्त्राईली शेतीत कल्पकता, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर

इस्त्राईली शेतीत कल्पकता, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर

ताज्या बातम्या

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा 2)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

आज 20 ऑगस्ट 2025

आज 20 ऑगस्ट 2025 : जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अकोला, बुलढाणा, छ. संभाजीनगर, जालनाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

आज 20 ऑगस्ट 2025 : महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास...??

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास…??

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

दुग्धव्यवसायासाठी अनुदान

दुग्धव्यवसायासाठी अनुदान… वैयक्तिक ₹ 10 लाख तर सामूहिक ₹ 3 कोटींपर्यंत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 19, 2025
0

बंगालच्या उपसागरात

बंगालच्या उपसागरात दोन कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रभर कोसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 18, 2025
0

पहा राज्यातील जिल्हानिहाय पावसाची स्थिती

पहा राज्यातील जिल्हानिहाय पावसाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा 2)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.