• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

मक्यावरील नवीन लष्करी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन

Team Agroworld by Team Agroworld
July 29, 2019
in तांत्रिक
0
मक्यावरील नवीन लष्करी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT


लष्करी अळी (फॉल अर्मीवर्म) प्रसार ,
स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा ही मुळची संयुक्त राज्ये ते अर्जेटीना पासुन पसरलेल्या दक्षिण गोलार्धातील उष्ण देशातील आहे. लष्करी अळीचे पतंग भक्कम उडणारे व उन्हाळयाच्या महिन्यामधे मोठया प्रमाणावर अंतर कापून स्थलांतर करतात किडीचे पतंग 3600 कि.मी. चे अंतर 30 तासात कापू शकतात. त्यामुळे या किडीचा प्रसार झपाटयाने होतो. हया किडीची सन 2016 च्या पहिल्या चरणात पश्चीम व मध्य आफ्रिकेमधे सर्वप्रक्षम नोंद झाली व आता तिचा धोका आफ्रीका, अमेरीका व आशिया खंडातील देशात होत आहे. भारतामधे हया अळीची नोंद प्रथमच तामिलनाडू व कर्नाटक राज्यातील वेगवेगळया जिल्हयात जून – जुलै 2018 च्या दरम्यान झाली असुन ती आंध्रप्रदेश व तेलंगाना या राज्यात पसरून महाराष्ट्रात कर्माळा तालुक्यात जि. सोलापूर येथे या किडीची प्रथम नोंद झाली. त्यानंतर सांगली, पुणे, नांदेड व हिंगोली तर विदर्भात प्रथमच 23 ते 30 सप्टेंबर 2018 दरम्यान बुलढाणा जिल्हयातील नांदूरा तालुक्यात माळेगाव (गोंड) येथे मका पिकावर मोठया प्रमाणावर आढळून आली. माळेगाव या गावातील आठ एकर मका उध्दस्त करून टाकला व शेवटी शेतकर्‍याने पिक कापून अळी सहीत नष्ट केले. महाराष्ट्राच्या ईतरही भागात
झपाटयाने प्रसार होत आहे. शास्त्रज्ञांच्या मते भारतामधे हि किड आयात निर्यातद्वारे किंवा आफ्रिका व अमरीकेतून पतंगाच्या स्थलांतराद्वारे आली असावी.

खादय वनस्पती :
ही किड बहुभक्षीय असून 80 पेक्षा जास्त वनस्पतीवर आपली उपजिविका करते. परंतु गवतवर्गीय पिके हे या किडीचे सर्वात आवडते खादय आहे. हि किडी सर्वात जास्त मका, मधू मका, ज्वारी यावर उपजिविका करतांना आढळून येतेहराळी, सिंगाडा , कापूस, रान मेथी, मका, ओट, बाजरी, वटाणा, धान, ज्वारी, षुगरबीट, सुदान ग्रास, सोयाबीन, ऊस, तंबाखु व गहू यांवर वारंवार प्रादुर्भाव होतो भाजीपाल्यामधे फक्त मधूमक्यावर नियमित प्रादुर्भाव असतो. परंतु इतर भाजीपाला, फळ पिकामधे सेप, अंगूर, संत्रा, पपई पीच, स्ट्रॅाबेरी व इतर फुलपिकाचे कधीकधी नुकसान करते हवामान: उष्ण व दमट वातावरणात या किडीला पोषक आहे.
जिवनचक्र व ओळख :
या अळीची उन्हाळयात 30 दिवसात एक पिढी पूर्ण होत असुन अखंड खादय
मिळाल्यास 3 ते 4 पिढया विविध वनस्पतीवर पूर्ण होऊ शकतात. अंडी अर्ध गोलाकार असुन पानावर एका समुहात 100 ते 200 अंडी असतात.
एक मादी सरासरी 1500 तर महत्तम 2000 अंडी देऊ षकते. अंडी समुह
केसाळ व राखाडी/ भुर्‍या रंगाच्या लव किंवा मऊ केसाने झाकलेले असतात. अंडी देण्याचा कालावधी उन्हाळयात फक्त 2 ते 3 दिवसाचा असतो.
अळी: पुर्ण वाढ झालेल्या अळीचे तोंडावर पांढुरक्या रंगाचे उलटया वाय ‘ल्’ आकराचे चिन्ह असते. तर पोटाच्या आठव्या सेगमेंटवर चौकोनात फुगीर गोल गडद किंवा हलक्या रंगाचे चार ठिपके असतातदिवसा अळी लपून राहते. उन्हाळयात अळी अवस्था 14 दिवसाची तर हिवाळयात किंवा थंड वातावरणात ती 30 दिवसापर्यंत असु षकतेकोश: चकाकणा-या तपकीरी रंगाचे कोश सामान्यत: 2 ते 8 सेमी खोल जमिनीत असतात अळी स्वत: भोवती अंडाकृती, मातीचे कण व रेषीम धागा एकत्र करून सैल कोश तयार करते उन्हाळयात कोशा अवस्था 8 ते 9 दिवसाची असून अती थंड वातावरणात ती 20 ते 30 दिवसाची सुध्दा राहू शकते.प्रौढ: नरामधे समोरचे पंखावर राखडी व तपकीरी रंगाच्या छटा असून टोकाला व मध्य भागाजवळ त्रिकोणी पांढरे ठिपके असतात.
मादीमधे समोरचे पंख नरापेक्षा कमी चिन्हांकीत असतात. ते एकसमान राखडी तपकरीरी रंगाचे असून त्यावर राखडी व तपकरी रंगाचे ठिपके असतात. मागील दोन्ही पंख मोहक चंदेरी पांढरे असून त्यावर आखुड गडद रंगाची किनार असते. पतंग अवस्था सरासरी 10 दिवसाची असुन ती 7 ते 21 दिवसापर्यंत असु शकते. प्रौढ निशाचर असून मादी सामान्यत: बहुतांष अंडी पहिल्या चार ते पाच दिवसाच्या कालावधीत देते नुकसान: अळया पाने खाऊन पिकाचे नुकसान करतात. नुकत्याच अंडयातुन बाहेर आलेल्या अळया पानाचा हिरवा पापूद्रा खातात. त्यामुळे पानाला पांढरे चट्टे पडतात. दुसर्‍या ते तिसर्‍या अवस्थेतील अळया पानाला छिद्रे करतात. पानाच्या कडा खातात. अळया मक्याच्या पोंग्यामधे राहून पानाला छिद्रे करतात. त्यामुळे पोंग्यातून बाहेर आलेल्या पानावर एका रेशेत एकसमान छिद्रे दिसतातसर्वसाधारण एका झाडावर एक किंवा दोन अळया राहतात, कारण त्या जवळ आल्यास एकमेकांना खातात. जूनी पाने मोठया प्रमाणात पर्णहीन होऊन पानाच्या फक्त मध्य शिरा व व झाडाचे मुख्य खोड षिल्लक राहते. झाड फाटल्यासारखे दिसते पोंगा धरण्याची सुरूवातीची अवस्था प्रादुर्भावास कमी बळी पडते, मध्यम पोंगे अवस्था त्यापेक्षा जास्त तर उशिरा अवस्था अळीला सर्वात जास्त बळी पडते. अळी काही वेळा कणसाच्या बाजुने आवरणाला छिद्र करून दाणे खाते पाळत ठेवणे : प्रादूर्भावग्रस्त भागात पतंगावर पाळत ठेवण्यासाठी हंगामात तसेच बिगर हंगामात कामगंध सापळयाचा एकरी पाच या प्रमाणे वापर करावा
सर्वेक्षण :
किडीच्या प्रादुर्भावासाठी पिकाचे आठवडयातून दोन वेळा सर्वेक्षण करावे. यासाठी शेतामधील पाच ठिकाणचे मक्याचे 20 झाडे किंवा 10 ठिकाणचे 10 झाडे, शेताचे प्रतिनीधीत्व करतील अशी निवडावीत. प्रादुर्भावग्रस्त झाडाचे प्रमाण टक्क काढण्यास एवढे नमुने पुरेसे आहेत. परंतु प्रती झाड अळयांची संख्या काढण्यासाठी झाडाच्या नमुन्याची संख्या वाढवावी लागेल. • रोपे ते सुरूवातीची पोंगे अवस्था ( उगवणी नंतर 3 ते 4 आठवडे): सर्वेक्षणाअंती सरासरी 5 टक्के प्रादुर्भाव ग्रस्त झाडे आढळल्यास फवारणी करावी. • मध्यम ते उशिरा तर 5 ते 7 आठवडे): सर्वेक्षणाअंती सरासरी मध्यम पोंगे अवस्थेमधे 10 टक्के पोंगयामधे ताजा प्रादुर्भाव तर उशिरा पोंगे अवस्थेमधे 20 टक्के पोंग्यामधे ताजा प्रादुर्भाव आढळल्यास फवारणी करावी
गोंडा ते रेषीम अवस्था ( उगवणी नंतर 8 आठवडे): फवारणीची गरज नाही परंतू 10 टक्के कणसामधे ताजा प्रादुर्भाव आढळल्यास फवारणी करावी
व्यवस्थापन:
पिकाची काढणी वेळेवर करून पिकाची नंतरच्या हंगामात मोठया प्रमाणावर प्रादुर्भावातुन सुटाक होऊ शकते. पिक काढणीला आल्यावर (कणसे कापल्यानंतर) धाडयाची गंजी शेतात न ठेवता योग्य विल्हेवाट लावावी पिकाचे कायीक वाढीत अतोनात नुकसान झाले असल्यास धांडे कापून पोंग्यातील अळी सहित नष्ट करावे , खोल नांगरणी करावी. लवकर पक्व होणार्‍या वाणाची निवड करून लवकर परेणी करावी व याचा गाव किंवा विभागीय पातळीवर अवलंब करावा.
मका,उडीद/मुग/तूर आंतर पिक घ्यावे. मका पिका सभोवताल सापळा पिक म्हणून हायब्रीड नेपीयर च्या 3 ते 4 ओळी पेराव्या व त्यावर प्रादूर्भाव दिसताच 5 टक्के निबोंळी अर्क किंवा अ‍ॅझाडिरेक्टीन 1500 पीपीएम, 50 मिली प्रति 10 लिटर या प्रमाणे फवारणे
मधू मक्याच्या प्रतिकारक वाणाची निवड करावी. स्वच्छता मोहीम राबवावी व नत्र खताचा अवास्तव वापर टाळावा. पिकाच्या सुरूवातीच्या अवस्थेत एकरी 20 या प्रमाणे पक्षी थांबे उभारावे (30 दिवसापर्यंत)
यांत्रीक पदध्ती
पिकाच्या सुरूवातीच्या अवस्थेत पानावरील समुहात दिलेली अंडी किंवा अळयांचा समुह असलेली प्रादूर्भाव ग्रस्त पाने (पाढरे चट्टे असलेली) अंडी/अळयांसहीत नष्ट करावी.
प्रादूर्भाव दिसताच प्रादूर्भावग्रस्त पोंग्यामधे सुकलेलीलेली वाळू टाकावी
पतंग मोठया प्रमाणवर नष्ट करण्यासाठी कामगंध सापळयांचा एकरी पंधरा या प्रमाणे वापर करावा. सापळे पिकाच्या घेराच्या उंचीबरोबर प्राधान्याने सुरूवातीच्या पोंगे अवस्थेत लावावे जैविक नियंत्रण जैवविवीधता वाढवणे आंतरपिके / इतर सजावटीच्या फुल वनस्पती घेउन नैसर्गीक शत्रूंचे संवर्धन होण्यास मदत होइल पतंगाची संख्या 3पतंग/ कामगंध सापळा या प्रमाणात आढळताच ट्रायकोग्रामा प्रेटीओसम, टेलेमोनस रेमंस या परोपजीवी किटकांचे दर आठवडयाने एकरी 50 हजार अंडी याप्रमाणे शेतात सोडावे. त्यानंतर 3 ते 4 दिवसापर्यत रासायनिक किटकनाशकाची फवारणी करू नये.
रोपे ते सुरूवातीची पोंगे अवस्थेत 5 टक्के पोंगयामधे तसेच 10 टक्के कणसामधे प्रादुर्भाव आढळल्यास जैविक किटकनाशकांची फवारणी करावी व मेटारायझीयम अ‍ॅनिसोप्ली पावडर (1 x 108 सीएफयू/ग्रॅम)/ 50 ग्रॅम किंवा नोमुरीया रीलै पावडर (1×108 सीएफयू/ग्रॅम)/ 30 ग्रॅम/10 ली या प्रमाणे उगवणी नंतर 15 ते 25 दिवसांनी पोंग्यात फवारावे त्यानंतर प्र्ाादूर्भावानुसार 10 दिवसाच्या अंतराने 1 ते 2 फवारण्या कराव्या व बॅसीलस थूरीजींअसीस व कुर्सटाकी )/ 20 ग्रॅम/10 किंवा 400 ग्रॅम/एकर या प्रमाणे फवारणी करावी
रासायनिक किटकनाषकांचा वापर :(शिफारस 18-19 वर्षासाठी)
अळी पोंग्यामधे उपजिवीका करीत असल्यामुळे रासायनिक किटकनाशकाची जास्त घनफळाच्या फवारणी (नॅपसॅक) पंपाद्वारे फवारणी केल्यास फवारणीचे द्रावण पोंग्यात जाऊन नियंत्रण मिळते.
• रोपे ते सुरूवातीची पोंगे अवस्था : व अंडयाची उबवण क्षमता कमी व सुक्ष्म अळयांचा नियंत्रणासाठी 5 टक्के प्रादुर्भाव असल्यास,5 टक्के निबोंळी अर्क किंवा अ‍ॅझाडिरेक्टीन 1500 पीपीएम, 50 मिली प्रति 10 लिटर या प्रमाणे फवारणे • मध्यम ते उशिरा पोंगे अवस्था
व दुस-या ते तिस-या अवस्थेतील अळयाच्या नियंत्रणासाठी,10 ते 20 टक्के प्रादुर्भाव असल्यास
स्पिनेटोराम 11.7 टक्के प्रवाही, 9 मिली किंवा थायोमेथोक्झााम 12.6 टक्के +ल्यँब्डा
सायहेलोथ्रिन 9.5 टक्के, 5 मिली किंवा क्लोरॅन्ट्रनिलीप्रोल 18.5 टक्के प्रवाही, 3 मिली 10
लिटर पाण्यात याप्रमाणे फवारणे गोंडा ते रेशिम ( उगवणी नंतर 8 आठवडे):
व या अवस्थेत रासायनिक किटकनाशकाचा वापर किफायतशिर म्हणून मोठया अळया
वेचाव्या.
(टिप:एकात्मिक व्यवस्थापन, केद्रीय कृषी मंत्रालय, भारत सरकार,नवी दिल्ली यांचे 6 मे 2019 व रासायनिक किटकनाशकांचा वापर 28 मे 2019 च्या कार्यालयीन परीपत्रका नुसार)

डॉ. ए. व्ही. कोल्हे, मुख्य पिकसंरक्षण अधिकारी, व डॉ. डी. बी.उंदिरवाडे, विभाग प्रमुख
किटकशास्त्र विभाग, डॉ. पंदेकृवि, अकोला विभाग प्रमुख
किटकशास्त्र विभाग, डॉ. पंदेकृवि, अकोला

Share this:

  • Facebook
  • X
Tags: लष्करी अळीव्यवस्थापन
Previous Post

शासनाची एकरकमी कर्ज परतफेडीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

Next Post

‘फ्रूटकेअर’ तंत्राने तांदलवाडी बनले महाराष्ट्राचे फिलिपाइन्स .

Next Post
‘फ्रूटकेअर’ तंत्राने तांदलवाडी बनले महाराष्ट्राचे फिलिपाइन्स .

‘फ्रूटकेअर’ तंत्राने तांदलवाडी बनले महाराष्ट्राचे फिलिपाइन्स .

ताज्या बातम्या

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.