नवी दिल्ली : Indian Army Dog.. मृत्यूला न घाबरता जो जीवाची बाजी लावत शत्रूशी लढतो. तोच खरा योद्धा असतो..अशीच एक घटना जम्मू काश्मीरमध्ये घडली. भारतीय लष्करात अविरतपणे सेवा करणारा तो श्वान म्हणजे ‘झूम’. जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात 10 ऑक्टोबर रोजी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचा श्वान गंभीर जखमी झाला. या चकमकीदरम्यान लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी ठार झाले, त्यात ‘झूम’ श्वानही जखमी झाला आणि दोन दिवसांनंतर त्याचा मृत्यू झाला. भारतीय लष्करातील श्वानांबद्दल आज बोलण्याचं निमित्त म्हणजे, जम्मू- काश्मीरमध्ये घडलेली घटना.
‘श्वानपथक’ लष्कराच्या पथकातील एक महत्वाचा भाग आहे. ज्याच्याशिवाय तपासाला नवी दिशा मिळत नाही. जम्मू-काश्मीरमध्ये 9 ऑक्टोबरच्या रात्री अनंतनाग जिल्ह्यातील एका भागात दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. लष्कराने तात्काळ शोधमोहीम सुरू केली. या शोधमोहीमेत लष्कराने आपल्या ‘असॉल्ट डॉग’ म्हणजेच लष्करातील ‘झूम’ नावाच्या कुत्र्याला देखील सामील केले होते.
भव्य कृषी व दुग्ध प्रदर्शन अॅग्रोवर्ल्ड 11 ते 14 नोव्हेंबर 2022 @जळगाव..!
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/1xF7vny7J0I
गंभीर जखमी होऊनही… असा लढला ‘झूम’
‘झूम’ला एका घरात दहशतवादी शोधायचे होते. त्याने आपले काम चोखपणे बजावत दहशतवाद्यांना ओळखले आणि दहशतवाद्यांवर हल्ला केला. मात्र, यादरम्यान लष्कराचे इतर जवान त्या घराजवळ पोहचेपर्यंत दहशतवाद्यांना पळून जाण्याचा प्रयन्त केला. अशा बिकट स्थितीत झूमने पुढे होत. त्यांचा मार्ग रोखून धरला. चिडलेल्या दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरु केला. यातील दोन गोळ्यांनी ‘झूम’च्या शरीराचा वेध घेतला.
गंभीर जखमी झालेल्या ‘झूम’ने लष्कराचे इतर जवान त्याठिकाणी येईपर्यंत आपला मोर्चा सोडला नाही. अखेर लष्करी जवानांनी तेथे पोहचून लष्कर-ए-तोयबा च्या दोन्ही दहशतवाद्यांना ठार मारले. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या ‘झूम’ला 54 AFVH (Advance Field Veterinary Hospital) या लष्कराच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होत. मात्र १२ ऑक्टोबर रोजी दुपारी 12 च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. यानंतर भारतीय लष्कराच्या 29 आर्मी डॉग युनिटने आणि त्यांच्या साथीदारांनी जम्मूमध्ये भारतीय लष्करी श्वान ‘झूम’ याला आदरांजली वाहिली.
मुंबई बॉम्बस्फोटात जंजीरची लाखमोलाची कामगिरी
मार्च 1993 मध्ये मुंबईत झालेल्या 12 भीषण बॉम्बस्फोटांमध्ये 257 जणांना जीव गमवावा लागला होता व 713 जण जखमी झाले होते. मात्र तुम्हाला माहिती आहे, एक श्वान नसता तर ही संख्या हजारोंच्या घरात गेली असती. मुंबईच्या बॉम्ब शोधक पथकासोबत या श्वानाने तेव्हा काम केले होते. या श्वानाचे नाव आहे जंजीर. 1993 च्या मुंबई साखळी बॉम्ब स्फोटात जंजीर या श्वानाने 3329 किलो पेक्षा जास्त आरडीएक्स, 6406 जिवंत काडतुसे, 249 हॅन्ड ग्रेनेड आणि 600 डेटोनेटर शोधून काढले होते. जंजीरच्या कामगिरीने हजारो मुंबईकरांचा जीव वाचला होता असे म्हणता येईल. 2000 साली मृत्यू नंतर पूर्ण सन्मानाने त्याला दफन करण्यात आले.
लष्करात कोणत्या प्रजातींच्या कुत्र्यांच्या वापर केला जातो?
आधुनिक युद्धाच्या कलेत, श्वानांची भूमिका ही फक्त हल्ला करण्यापासून इतर भूमिकांप्रमाणे बदलली आहे. आता सैन्यदलात श्वानांना (Indian Army Dog) ठराविक जबाबदाऱ्या दिलेल्या असतात आणि प्रत्येक भूमिकेसाठी वेगळा कुत्रा कर्तव्य बजावत असतो.
पहारेकरी.
टेहळणीसाठी प्रशिक्षित श्वान.
निरोप्या / दूत.
अंमली पदार्थ आणि स्फोटकांचा शोध घेणे.
मदत आणि बचावकार्यासाठी प्रशिक्षित श्वान.
मागोवा घेणे आणि संरक्षक कर्तव्ये.
वैद्यकीय संशोधन.
जगभरातील सैन्यात कार्यरत असणाऱ्या श्वानांच्या प्रजाती
सैन्यदलात जर्मन शेफर्ड, डच शेफर्ड आणि बेल्जियन शेफर्ड जातीच्या श्वानांना जास्त प्राधान्य दिले जाते. शेफर्ड जातीचे श्वान बुद्धिमान, विश्वासार्ह, अंदाज लावण्यास योग्य, सहज प्रशिक्षित होणारे आणि सामान्यत: मध्यम आक्रमक असतात. जवळजवळ कोणत्याही हवामान परिस्थितीशी सहज जुळवून घेण्यास ते सक्षम असतात. पहारा देणे, टेहळणी करणे आणि वेळप्रसंगी हल्ला करणे यासाठी शेफर्ड जातीच्या श्वानांना प्राधान्य दिले जाते. मागोवा घेणे, अंमली पदार्थ आणि स्फोटकांचा शोध घेणे यासारख्या विशिष्ट भूमिकांसाठी रिट्रीव्हर्स जातीचे श्वान (लॅब्राडोर, गोल्डन किंवा चेसपीक बे) प्राधान्यकृत आहेत.
लष्करात कुत्र्यांना (Indian Army Dog) प्रशिक्षण किती दिवसांचे दिले जाते?
आर्मी डॉग ट्रेनिंग वेगळ्या पद्धतीने सुरू होते. त्यांना एकदम सैन्यात आणून सोडलं जात नाही. ते सुमारे 15 दिवस त्यांच्या प्रशिक्षकासोबत राहतात. चोवीस तास एकत्र राहणे याला marrying-up देखील म्हटले जाते. यादरम्यान, कुत्री अधिक आक्रमक असल्यास किंवा त्यांना काही कारणाने शिकण्यात काही अडचण आल्यास किंवा त्यांना शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त वाटत नसल्यास, त्यांना प्रशिक्षणापासून वेगळे केले जाते.
कुत्र्यांना कसे प्रशिक्षण दिले जाते
कुत्र्यांचे घ्राणेंद्रिय म्हणजे गंध ओळखण्याची क्षमता इतर प्राण्यापेक्षा तीव्र असते. प्रशिक्षण घेतल्यानंतर ते औषधे, स्फोटके, रक्त आणि बरेच काही शोधू शकतात. परंतु, हे एखादा गंध शोधण्यासाठी कुत्र्यांना प्रशिक्षण घेणे आवश्यक असते. लपून बसलेल्या दहशतवाद्यांचे ठिकाण आणि त्यांच्याकडे असलेली शस्त्रे आणि दारूगोळा शोधण्यासाठी युनिटमधील श्वानांना प्रथम पाठवले जाते.
श्वानांवर कॅमेरे बसवलेले असतात आणि कॅमेऱ्यांच्या आधारे फीडवर नियंत्रण कक्षातून नजर ठेवली जाते. या श्वानांना लपून बसलेल्या दहशतवाद्यांच्या नकळत त्यांच्या जागी घुसण्याचे प्रशिक्षण दिले जाते. या ऑपरेशन्स दरम्यान भुंकू नये यासाठी त्यांना वेगळे प्रशिक्षण दिले जाते. हे श्वान लपून बसलेल्या अतिरेक्यांच्या लक्षात आले आणि त्यांच्यावर हल्ला झाला तर त्याला प्रत्युत्तर सुद्धा देतात. त्यावेळी त्यांचा सांभाळ करणारा व्यक्ती नेहमीच अशा परिस्थितीवर बारीक नजर ठेऊन असतो.
इंग्रजांच्या काळापासून भारतीय लष्करात श्वानांना दयामृत्यू दिला जायचा
लष्कराला भीती असायची की हे कुत्रे चुकीच्या लोकांच्या हाती आले तर. या कुत्र्यांना लष्कराच्या गुप्त जागांची माहिती असायची. त्यामुळे त्यांच्या सेवेपश्चात या कुत्र्यांचा गैरवापर होण्याची भीती असल्याने तसेच कुत्र्यांचा वापर चुकीच्या पद्धतीनं झाला तर. याशिवाय कुत्र्यांना गंभीर दुखापत झाली, ते आजारी पडले तर त्यांना मारलं जायचं. सुरुवातीला अशा कुत्र्यांवर उपचार केले जायचे. पण काही सुधारणा झाली नाही तर त्यांना गोळी मारली जायची. फक्त कुत्रेच नाही तर घोडे, गाढवं यांनाही उपयोग संपल्यावर मारलं जायचं. याला अॅनिमल युथेनेशिया म्हणतात.
लष्कराच्या कुत्र्यांना दत्तक का दिलं जात नाही ?
त्यामागे असाही विचार असायची की लष्करानं तयार केलेल्या कुत्र्यांना सामान्य माणसांसोबत कसं ठेवणार ? पुन्हा सैन्यात त्यांना जेवढी सुविधा मिळते, तेवढी दुसरीकडे मिळणं शक्य नाही. 2015 मध्ये सरकारने सांगितलं अशा कुत्र्यांना न मारता त्यांना दत्तक देता येईल, अनेक देशांत असे कायदे सुद्धा आहेत. नंतर हे प्रकरण दिल्ली हायकोर्टात गेलं होतं.
कोर्टानं कुत्र्यांना ठार करणं हे कायद्याचं उल्लंघन म्हटलं होतं. 2017 मध्ये मेरठमध्ये कुत्र्यांसाठी ‘रिमाउन्ट अँड वेटेरिनरी कॉर्प्स सेंटर अँड कॉलेज’ स्थापन केलं गेलं. यावेळी लष्कर अधिकाऱ्याने सांगितलं, वैद्यकीय उपचार संपतात तेव्हाच कुत्र्यांना मारलं जातं. भारतात कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या राज्यांत कुत्र्यांना दत्तक घेण्याची सोय आहे.
भारतीय लष्करात प्रशिक्षित कुत्र्यांचा वापर कधी पासून सुरु झाला?
1959 साली श्वानांना पहिल्यांदा भारतीय सैन्यदलाच्या सेवेत दाखल करण्यात आले. 1 मार्च 1960 मध्ये मेरठ मध्ये ‘रिमाउन्ट अँड वेटेरिनरी कॉर्प्स सेंटर अँड कॉलेज’ स्थापन करण्यात आले, जिथून सैन्यासाठी लागणाऱ्या श्वानांना प्रशिक्षण देण्यात येते. भारतीय सैन्यात आजच्या घडीला 1200 श्वान सेवेत आहेत. यामध्ये विदेशी जाती अधिक आहेत, पण आता पूर्णपणे देशी जातीचे मुधोळ हाउंड सैन्यात दाखल होत आहेत.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇