नवी दिल्ली : मोदी सरकारने काल पीएम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले. त्यानंतर आज सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना आणखी एक भेट दिली आहे. केंद्र सरकारने येत्या रब्बी पिकांचे किमान हमी भाव म्हणजे एमएसपी (MSP) जाहीर केले आहेत.
मसूरचा एमएसपी सर्वाधिक
गव्हाची एमएसपी 2015 रुपयांवरुन 2125 क्विंटल म्हणजे 110 रुपयांनी वाढवली आहे. तर हरभऱ्याचा एमएसपी 1635 वरुन 1735 म्हणजे 105 रुपयांनी वाढवण्यास केंद्रिय कॅबिनेटने मान्यता दिली आहे. गहू, हरभऱ्याप्रमाणेच इतर महत्वाच्या सहा रब्बी पिकांचा एमएसपी वाढवला आहे. मसूरचा एमएसपी सर्वाधिक 500 रुपये वाढून 6 हजार रुपये क्विंटल झाली आहे. तर मोहरीचा एमएसपी 400 रुपयांनी वाढवला आहे. करडईचा एमएसपी 5 हजार 441 होता. तो 209 रुपयांनी वाढून 5 हजार 650 रुपये क्विंटल झाली आहे.
भव्य कृषी व दुग्ध प्रदर्शन अॅग्रोवर्ल्ड 11 ते 14 नोव्हेंबर 2022 @जळगाव..!
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/1xF7vny7J0I
या पिकांच्या किमतीमध्ये मोठी वाढ
सन 2023-24 सालासाठी सहा रब्बी पिकांच्या किमान हमी भावाच्या वाढीला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असल्याचं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी सांगितलं. त्यानुसार मसूरच्या किमतीत दर क्विंटलमागे 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर गव्हाच्या किमतीत 110 रुपायांची वाढ करण्यात आली आहे. चना किमतीत 105 रुपयांची तर मोहरीच्या किमतीत 400 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या पिकांच्या किमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आल्याचं केंद्र सरकारने सांगितलं आहे.
डाळी आणि तेलबियांच्या उत्पादनात लक्षणीय वाढ
सरकारने म्हटले आहे की, पीक वर्ष 2022-23 साठी रब्बी पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ केंद्रीय अर्थसंकल्प 2018-19 च्या अनुषंगाने आहे. ज्याने अखिल भारतीय सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान 1.5 पट किमान एमएसपी निश्चित करण्याची घोषणा केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीला योग्य भाव मिळेल, असे सरकारने म्हटले आहे. निवेदनात म्हटले आहे की, 2014-15 पासून तेलबिया आणि कडधान्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी नवीन प्रयत्न केले जात आहेत. यानंतर डाळी आणि तेलबियांच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. कृषी मंत्रालयाच्या चौथ्या आगाऊ अंदाजानुसार, तेलबियांचे उत्पादन 2014-15 मध्ये 275 लाख टनांवरून 2021-22 मध्ये 377 लाख टन इतके वाढले आहे. त्याचप्रमाणे डाळींच्या उत्पादनातही वाढ झाली आहे.
एमएसपी म्हणजे काय?
एमएसपी (MSP) म्हणजे किमान हमी भाव किंवा किमान आधारभूत किंमत. या किमतीला सरकार शेतकऱ्यांकडून त्यांच्या पिकांची खरेदी करतं. एकदा का एखाद्या पिकाला किमान हमी भाव जाहीर केला तर त्या किमतीखाली त्या पिकाची खरेदी करता येत नाही. किमान तेवढ्या किमतीला संबंधित पीक खरेदी करणं सरकारला बंधनकारक असतं. किमान हमीभावामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारचं आश्वासन मिळतं, दिलासा मिळतो.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- केरळ 1 नोव्हेंबरपासून 16 प्रकारच्या भाज्या व फळांसाठी लागू करणार MSP…
- शेतकरी कुटुंबाने आता गाव गाव MSP, हर घर MSP अभियानात सहभागी व्हावं – व्ही एम सिंह
- Minimum Support Price : ऐन सणासुदीत शेतकऱ्यांना फटका ; अद्यापही MSP जाहीर होण्याची प्रतीक्षाच