Home हवामान अंदाज IMD चा ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

IMD चा ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

IMD

मुंबई : राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढला असून भारतीय हवामान विभागाकडून (IMD)आज अनेक जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, या आठवड्याच्या सुरुवातीलाच राज्यातील काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. आज हवामान विभागाकडून (IMD) कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट देण्यात आला आहे, ते पाहूया

 

 

रेड, ऑरेंज अलर्ट कुठे ?
हवामान विभागाकडून (IMD) आज रायगड, रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा हायअलर्ट देण्यात आला असून या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

 

 

महाराष्ट्रातील आजची पावसाची स्थिती (19 जुलै 2024)

 

आज या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस
अमरावती, नागपूर, वर्धा, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, नांदेड हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांत आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, छ. संभाजीनगर, जालना, बीड, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून (IMD) कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही.

 

Shree Sairam Plastic & Drip Irrigation

 

 

Jain Irrigation

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇