हवामान अंदाज

IMD 26 July 2024 : सावधान! नाशिकसह ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

मुंबई : (IMD 26 July 2024) राज्यातील अनेक भागात कालपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुण्यासह मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, बदलापूर, सातारा, कोल्हापूरसह अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात आज देखील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे.

IMD 26 July 2024

IMD 26 July 2024 : नाशिकसह या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट

रेड अलर्ट
नाशिक, मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड आणि सातारा या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून (IMD) अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

26 July 2024

ऑरेंज अलर्ट
रत्नागिरी, कोल्हापूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट असून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

जळगावसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट
जळगाव, छ. संभाजीनगर, जालना, बीड, अहमदनगर, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, नागपूर, सांगली आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

Panchaganga Seeds

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

Related Articles

Back to top button