• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

हायड्रोपोनिक तंत्राने हिरवा चारा निर्मिती

Team Agroworld by Team Agroworld
May 29, 2019
in तांत्रिक
0
हायड्रोपोनिक तंत्राने हिरवा चारा निर्मिती
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT


हायड्रोपोनिक तंत्राद्वारे उत्पादित केलेला हिरवा चारा हा पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या हिरव्या चार्‍यापेक्षा सकस असतो. चाराटंचाई परिस्थितीत कमी खर्चामध्ये हिरवा चारा निर्मितीचा हा चांगला पर्याय आहे. हायड्रोपोनिक चारा तयार करण्यासाठी बांबू, तट्या, प्लॅस्टिक ट्रे, 50 टक्के क्षमतेचे शेडनेट, मिनी स्प्रिंकलर किंवा फॉगर सिस्टिम व टायमर यांची गरज असते. या साधनसामग्रीचा वापर करून 72 स्क्वेअर फूट जागेत बसेल असा सांगाडा अवघ्या 15 हजार रुपये खर्चात तयार होतो.

यामध्ये प्रकाश, तापमान, आर्द्रता आणि पाण्याचे नियंत्रण करून दररोज 100 ते 125 किलो पौष्टिक हिरवा चारा तयार करता येतो. चारा तयार करण्यासाठी मका, गहू, बाजरी, बार्ली याचा वापर केला जातो. धान्याला ई.एम.च्या द्रावणात बीजप्रक्रिया करावी लागते. हे धान्य 12 तास भिजत ठेवून, 24 तास गोणपाटात अंधार्‍या खोलीत ठेवावे. त्यानंतर प्लॅस्टिक ट्रेमध्ये (3 फूट 2 फूट 3 इंच ) साधारणतः 1.5 ते 1.75 किलो बी पसरावे. अशा प्रकारे प्रतिदुभत्या जनावरांना दहा ट्रे या प्रमाणे जनावरांच्या संख्येवरून ट्रेची संख्या ठरवावी. हे प्लॅस्टिक ट्रे हायड्रोपोनिक चारा निर्मिती गृहात सात ते आठ दिवस ठेवावेत. एक इंची विद्युत मोटारीला लॅटरलची जोड देऊन फॉगर पद्धतीद्वारे प्रत्येक दोन तासाला पाच मिनिटे याप्रमाणे दिवसातून सात वेळा पाणी द्यावे. एका दिवसासाठी 200 लिटर पाणी लागते. ही यंत्रणा स्वयंचलित आहे. पाण्याची टाकी उंच ठिकाणी ठेवल्यास सायफन पद्धतीने विद्युत मोटारीचा वापर न हायड्रोपोनिक्स चार्‍यास पाणी देता येते. चार्‍याची 7 ते 8 दिवसांत 20 ते 25 सें.मी. उंचीपर्यंत वाढ होते. साधारणपणे एक किलो गव्हापासून नऊ किलो, तर एक किलो मक्यापासून 10 किलो हिरवा चारा तयार होतो.
चारा देण्याचे प्रमाण ः

  • भाकड जनावरे 6 किलो प्रतिदिवस प्रतिजनावर.
  • दुभती जनावरे 15 किलो प्रतिदिवस प्रतिजनावर.
    हायड्रोपोनिक चार्‍याचे फायदे ः
  • चारा टंचाई परिस्थितीत हिरवा चारा निर्मितीचा चांगला पर्याय.
  • कमी जागेत, कमी पाण्यात, कमी कालावधीत, स्वस्तात हिरवा पौष्टिक चारानिर्मिती.
  • जनावरांना 90 टक्के चारा पचतो.
  • पशुखाद्याचा खर्च 40 टक्के कमी.
  • जनावरांच्या रोगप्रतिकारक शक्तीत वाढ.
  • दुधाच्या फॅटमध्ये वाढ. किमान अर्धा लिटरने
    दुधात वाढ.
  • जनावरांची प्रजनन क्षमता सक्षम होते.
  • जनावरांच्या शरीरात प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वाच्या
    उपलब्धतेत वाढ.
  • जमिनीवर चारा उत्पादन घेण्याच्या तुलनेत 5 ते 10 टक्के
    पाण्याची आवश्यकता आहे.
  • प्रथिने, जीवनसत्त्वे, अँटीऑक्सिडंट्स, फॉलिक
    अ‍ॅॅसिड, ओमेगा-3, स्निग्ध पदार्थ
    पौष्टिक चार्‍यासाठी संकरित नेपीअर गवत
    बहुवार्षिक, भरपूर उत्पन्न देणारे संकरित नेपिअर हे फायदेशीर चारा पीक आहे. पाण्याची सोय असल्यास उन्हाळी हंगामासाठी या पिकाची लागवड फेब्रुवारी महिन्यात करावी. या पिकाच्या लागवडीला उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. शक्यतो निचरा न होणार्‍या, दलदलीच्या जमिनी या पिकाच्या लागवडीसाठी टाळाव्यात. योग्य व्यवस्थापन केल्यास या पिकाचे चांगले उत्पादन मिळते. संकरित नेपिअर या चार्‍यामध्ये आठ ते नऊ टक्के प्रथिने असतात. या चारा पिकाचे यशवंत आणि फुले जयवंत (आर.बी.एन.- 13) हे सुधारित वाण आहेत. यशवंत वाणाची वैशिष्ट्ये म्हणजे कापणीनंतर जोमाने होणारी वाढ, अधिक लांबलचक भरपूर फुटवे, मऊ, लांब व रुंद पाने आणि त्यावर अल्प प्रमाणात लव ही आहेत. याचबरोबरीने फुले जयवंत हा नवीन सुधारित वाण यशवंत वाणापेक्षा 10 ते 15 टक्के जास्त उत्पादन देतो. यामध्ये ऑक्झिलिक आम्लाचे प्रमाण देखील यशवंत गवतापेक्षा कमी आहे, म्हणून हा वाण जनावरांच्या चार्‍यासाठी फायदेशीर आहे. या पिकाच्या लागवडीला उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. शक्यतो निचरा न होणारी, दलदलीच्या जमिनी या पिकाच्या लागवडीसाठी टाळाव्यात. खत व पाणी व्यवस्थापन योग्य प्रमाणात दिल्यास या गवताची चांगली वाढ होते.
    लागवडीचे तंत्र
    लागवडीपूर्वी उभ्या-आडव्या नांगरटी करून, कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणीच्या वेळी सात ते आठ टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. खरीप हंगामात जून ते ऑगस्ट आणि उन्हाळ्यात फेब्रुवारी ते मार्च या महिन्यात या गवताची लागवड करावी. याची लागवड ठोंबे मुळासह लावून करावी. तीन महिने वाढू दिलेल्या गवताच्या खोडाच्या जमिनीकडील 2/3 भागातील दोन ते तीन डोळे असणार्‍या कांड्या काढून लावल्यास त्या चांगल्या फुटतात. ठोंबे किंवा कांड्या 90 सें.मी. अंतरावरील सर्‍यांच्या बगलेत लावाव्यात. सरासरी दोन ठोंबांतील अंतर 90 बाय 60 सें.मी. ठेवून लागवड केल्यास आंतरमशागत करणे सुलभ जाते.
    लागवडीच्या वेळी माती परीक्षणानुसार 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 50 किलो पालाश द्यावे. त्यानंतर पीकवाढीचा जोम कायम राहण्यासाठी दर चार कापण्यांनंतर 25 किलो नत्र द्यावे. हे बहुवार्षिक बागायती चारा पीक असल्याने तणांचा उपद्रव होतो, त्यामुळे त्याच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. गवताच्या सुरवातीस वाढीच्या काळात एक किंवा दोन खुरपण्या देणे आवश्यक आहे, त्यानंतर गरजेनुसार खुरपणी अथवा खांदणी करावी. गवताच्या भरपूर उत्पादनासाठी पाणी व्यवस्थापनाचा महत्त्वाचा घटक आहे. उन्हाळी हंगामात (फेब्रुवारी ते मार्च) लागवड केल्यास गवताच्या उत्तम वाढीसाठी सुरवातीचे दोन व त्यानंतर आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पावसाळ्यात (खरीप हंगामात) गरजेनुसार 12 दिवसांच्या अंतराने पाळ्या द्याव्यात, तसेच थंडीच्या दिवसांत 10 ते 12 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
    कापणी व उत्पादन ः
    या गवताची कापणी लागवडीपासून दहा आठवड्यांनी करावी. कापणी जमिनीपासून साधारण 15 ते 20 सें.मी. उंचीवर करावी, त्यामुळे फुटवे फुटण्यास चांगली मदत होते. नंतरच्या कापण्या पीकवाढीनुसार सात ते आठ आठवड्यांनी कराव्यात. म्हणजेच सकस, रुचकर, पौष्टिक व रसरशीत चारा उपलब्ध होतो. अशा प्रकारे वर्षभरात सात कापण्या घेता येतात. कापण्या वेळेत करणे आवश्यक आहे, अन्यथा चारा जाड व टणक होऊन पौष्टिकतेचे प्रमाण कमी होऊन, चारा कमी मिळतो. शिफारशीप्रमाणे उत्तम व्यवस्थापन केल्यास प्रति वर्षी आठ ते नऊ कापण्यांद्वारे 2500 ते 3000 क्विंटल चारा एक हेक्टर क्षेत्रापासून मिळू शकतो.
    चार्‍यासाठी लावा ज्वारी, बाजरी ः
    ज्वारी हे उंच वाढणारे, पालेदार, रसाळ व सकस चारा देणारे पीक आहे. या चारापिकासाठी मध्यम ते भारी व चांगला निचरा होणारी जमीन लागते. पूर्वमशागतीच्या वेळी भरखत म्हणून शेणखत अथवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे. ज्या ठिकाणी पाण्याची सोय आहे, तेथे फेब्रुवारी महिन्यात ज्वारीची लागवड करावी.
    लागवडीसाठी रुचिरा, मालदांडी 35-1, एम.पी. चारी, फुले अमृता या जातींची लागवड करावी. हेक्टरी 40 किलो बियाणे लागते. पेरणी 30 सें.मी. अंतरावर करावी. पेरणीपूर्वी दहा किलो बियाण्यास 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्टर जिवाणूसंवर्धक चोळावे. पेरणीच्या वेळी हेक्टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश द्यावे. पेरणीनंतर 30 दिवसांनी 50 किलो नत्र प्रति हेक्टरी द्यावे. पिकाची वाढ झपाट्याने वाढत असल्याने सुरवातीला पहिली खुरपणी लवकर करावी. पन्नास टक्के पीक फुलोर्‍यात असताना कापणी करावी.
    हिरव्या चार्‍याचे उत्पादन प्रति हेक्टरी 500 ते 550 क्विंटल एवढे आहे. ज्वारीच्या चार्‍यात आठ ते दहा टक्के प्रथिने असतात. बाजरी हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत येते. पेरणीपूर्वी एक खोलगट नांगरट व दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून घ्यावी, त्यामुळे पिकाची वाढ चांगली होते. पेरणीपूर्वी जमिनीची मशागत करताना शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे. पेरणीच्या वेळी 30 किलो नत्र, 30 किलो स्फुरद, 30 किलो पालाश द्यावे. पेरणीनंतर प्रति हेक्टरी एक महिन्याने 30 किलो नत्र द्यावे. या पिकाची पेरणी फेब्रुवारीमध्ये करावी. लागवडीसाठी जायंट बाजरा व राजको बाजरा पेरणीसाठी हेक्टरी दहा किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी दहा किलो बियाण्यास 250 ग्रॅम अ‍ॅझोटोबॅक्टर जिवाणूसंवर्धक चोळावे. लागवड करताना दोन ओळींतील अंतर 30 सें.मी. ठेवावे. पिकाची वाढ जलदगतीने होत असल्यामुळे एखादी निंदणी करून तण काढावे. बाजरीच्या चार्‍यामध्ये सात ते आठ टक्के प्रथिने असतात. बाजरीच्या चार्‍याचे सरासरी उत्पादन प्रति हेक्टरी 450 ते 500 क्विंटल मिळते. पन्नास टक्के पीक फुलोर्‍यात असताना कापणी करावी.

Share this:

  • Facebook
  • X
Tags: एम.पी. चारीनेपीअर गवतफुले अमृतामालदांडी 35-1रुचिराहायड्रोपोनिक
Previous Post

मिश्र भाजीपाला शेतीतून कुटुंबाला आर्थिक हातभार

Next Post

बीज प्रक्रिया महत्व

Next Post
बीज प्रक्रिया महत्व

बीज प्रक्रिया महत्व

ताज्या बातम्या

निम्म्या महाराष्ट्रावर दुबार पेरणीचे संकट!.. ; पहा तुमचा जिल्हा यात आहे का ?

निम्म्या महाराष्ट्रावर दुबार पेरणीचे संकट!.. ; पहा तुमचा जिल्हा यात आहे का ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2025
0

महाबीज

अकोला महाबीज बीज परीक्षण प्रयोगशाळेस NABL मानांकन प्राप्त

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2025
0

उत्तर महाराष्ट्र हवामान अपडेट

उत्तर महाराष्ट्र हवामान अपडेट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 16, 2025
0

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

Wonder India : ही आहेत भारतातील 6 लपलेली वन्यजीव अभयारण्ये !

Wonder India : ही आहेत भारतातील 6 लपलेली वन्यजीव अभयारण्ये !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

ड्रॅगन फ्रुट

ड्रॅगन फ्रुटच्या पहिल्या काढणीतच 1 लाखाहून अधिक नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 11, 2025
0

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा ₹50,000 पर्यंतच बक्षीस !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2025
0

ड्रोन फवारणी

ड्रोन फवारणीतून महिला करतेय 60 ते 70 हजारांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

निम्म्या महाराष्ट्रावर दुबार पेरणीचे संकट!.. ; पहा तुमचा जिल्हा यात आहे का ?

निम्म्या महाराष्ट्रावर दुबार पेरणीचे संकट!.. ; पहा तुमचा जिल्हा यात आहे का ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2025
0

महाबीज

अकोला महाबीज बीज परीक्षण प्रयोगशाळेस NABL मानांकन प्राप्त

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2025
0

उत्तर महाराष्ट्र हवामान अपडेट

उत्तर महाराष्ट्र हवामान अपडेट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 16, 2025
0

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.