मुंबई : कणसे लागण्याच्या अवस्थेमध्ये अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास कोणत्याही रासायनिक कीटकनाशकाचा वापर करू नये. शक्य असल्यास अळ्या गोळ्या करून नष्ट कराव्यात.
किडीने आर्थिक नुकसानीची पातळी (1p टक्के प्रादुर्भावग्रस्त कणसे) ओलांडल्यास, नियंत्रणासाठी मेटॅऱ्हायझियम ॲनीसोप्ली 5 ग्रॅम किंवा नोमुरिया रिलाई 3 ग्रॅम किंवा बिव्हेरिया बॅसियाना 5 ग्रॅम किंवा बॅसिलस थुरीन्जीएंसीस कुर्सटाकी 2 ग्रॅम यापैकी एका जैविक कीटकनाशकाची प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.