मुंबई : राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे तर काही ठिकाणी संततधार पाऊस सुरु आहे. तसेच राज्यात पावसाचा जोर कायम असून पुढील 48 तास पावसाची अशीच स्थिती राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे.

राज्यात अनेक ठिकाणी धो- धो पाऊस पडत असून भारतीय हवामान विभागाने (IMD) आज रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांना अलर्ट दिला आहे. या ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. तसेच पुणे, रायगड, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

या जिल्ह्यांना यलो अलर्ट
धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून (IMD) यलो अलर्ट देण्यात आला असून या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

दरम्यान, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहमदनगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांना कोणताही अलर्ट देण्यात आला नाही.

			














