जैन हिल्स कृषी महोत्सवात भेट दिल्यानंतर येथे विविध पिके प्रत्यक्ष शेतात लावलेली दिसत आहेत. या पिकांमध्ये महत्त्वाचे पीक आहे हळद. इथे हळदीच्या विविध जातींची लागवड केलेली आहे. हळदीच्या वीस जाती येथे लावलेल्या आहेत. या वीस जातींचे वैशिष्ट्य असे की, या जातींमध्ये वेगवेगळे कुरकुमीन कन्टेन्ट आहे. हळदीला जो पिवळसरपणा येतो, तो कुरकुमीन कन्टेन्टमुळे येतो. कुरकुमीन प्रमाण तीन ते आठ टक्क्यांपर्यंतची आपल्याकडे हळद आहे. त्याच्यामध्ये तीन ते चार टक्के कुरकुमीन असलेली सेलम आहे. पाच टक्क्यांपर्यंतची आपल्याकडे प्रगती आहे आणि आठ टक्क्यांपर्यंतची पितांबर आहे.
जैन इरिगेशनतर्फे आता हळद रोपांचीही विक्री
हळद साधारणतः दोन बाय एक वर लागवड करतात. मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला हळदीची लागवड होते. जैन इरिगेशनतर्फे आता हळद रोपांची व्यवस्था देखील होत आहे, या रोपांची विक्री आपण लवकरच करणार आहोत. हळद दोन बाय एक गादी वाफ्यावर लागवड करावी. तसेच लॅटरल टाकायच्या. अशा पद्धतीने इरिगेशन फर्टिगेशन करायचे.
या पद्धतीने केले आहे हळदीचे संगोपन
दोन बाय एक गादी वाफ्यावर लागवड केल्यानंतर एकरी पंधरा टनापर्यंत सेलम हळदीचे उत्पादन येते. त्यानंतर आपण प्रगती काढल्यानंतर गहू किंवा हरभरा पीक घेऊ शकतो. म्हणजे शेतकऱ्याला त्याचा दुप्पट फायदा होतो. म्हणून शेतकऱ्यांनी प्रगती हळद वाणाची पण लागवड करावी. त्या पद्धतीने आपल्याकडे तीन-चार व्हरायटी अशा आहेत, ज्याचे कमी कालावधीत उत्पादन येते. यावर आपल्याकडे प्रयोग सुरु आहे.
अशा पद्धतीने करा फवारणी
लागवड करताना ट्रायकोडर्माचे ट्रेंचिंग केल्यामुळे रोपांजवळ होणारी मूळकूज होत नाही. त्यानंतर हळदीवर विशेष किडींचा प्रादुर्भाव होत नाही. पण, पान खाणारी अळी किंवा करपा या दोन गोष्टींचा प्रादुर्भाव होतो. त्याच्यावर आपण फंगीसाईडचा स्प्रे करायचा. एक पेस्टीसाईडचा स्प्रे करायचा. यामुळे रोग कंट्रोल होतो.
सहा महिन्यात काढणीला येणारी हळद
अशा पद्धतीने मे-जून मध्ये लागवड केल्यानंतर सहा महिन्यांची जी हळद आहे, ती डिसेंबरमध्ये काढणीला येते. सेलम हळदीला आठ ते नऊ महिने लागतात. ती आपण जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये काढणी करू शकतो.
सजय विश्वनाथ सोनंजय, फार्म मॅनेजर, जैन इरिगेशन सिस्टीम लि., जळगाव