जळगाव : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना… शेतामध्ये काम करीत असताना अपघात होण्याचा धोका हा कायम असतो. अंगावर वीज पडणे, पूरस्थिती, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याचा अपघात झाल्यास कुटुंबाचे उत्पादनाचे साधनच बंद होते. त्यामुळे अपघातामध्ये मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत शासनातर्फे आर्थिक मदत ही या योजनेतून केले जाते. जाणून घेऊ या अपघात विमा योजनेची पात्रता, उद्दिष्ट्य, वैशिष्ट्य, लाभ कधी मिळेल, लाभ कधी मिळणार नाही, योजनेची आवश्यक कागदपत्रे, योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत…
२००९-१० मध्ये या योजनेला ‘शेतकरी जनता अपघात विमा योजना’ असे नाव होते आणि या योजनेअंतर्गत पूर्वी १ लाख रुपये एवढा विमा रक्कम देण्यात येत होती. परंतु आता या योजनेची व्याप्ती ही वाढवलेली असून वर्ष २०१५-१६ मध्ये ही रक्कम वाढवण्यात आली असून विमा रक्कम ही २ लाख रुपये एवढी करण्यात आलेली आहे व या योजनेला नंतर नवीन नाव देण्यात आले आहे ते नाव म्हणजे ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना’.
‘तण देई धन’ नेमकी संकल्पना काय ?
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/RFlShtyef_4
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2022
शेती व्यवसाय करताना अंगावर वीज पडणे, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याची कारणामुळे होणारे अपघात यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढावतो किंवा काही शेतकऱ्यांना या अपघातामुळे अपंगत्व येते परिणामी कुटुंबातील कर्त्या पुरुषाच्या अशा मृत्यूमुळे किंवा अपंगत्वामुळे कुटुंबावर आर्थिक परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे अशा शेतकरी कुटुंबाला आर्थिक लाभ मिळावा या उद्देशाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची सुरुवात केली गेली आहे.
महाराष्ट्र राज्यातील बहुतांश शेतकरी हे दारिद्रय रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असल्यामुळे त्यांना स्वतःचा विमा उतरवणे शक्य होत नाही. आर्थिक परिस्थिती कमजोर असल्या कारणामुळे ते विम्याचा हफ्ता भरण्यासाठी असमर्थ असतात व अशा वेळी एखाद्या शेतकऱ्याचा शेतात काम करताना एखाद्या कारणामुळे अपघात झाल्यास त्याला इलाज करण्यासाठी पैसे नसल्याकारणामुळे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते व अपघातात मृत्यू झाल्यास कुटुंबाला जीवन जगण्यासाठी खूप साऱ्या अडचणींना सामोरे जावे लागते. या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरु करण्याचा खूप मोठा निर्णय घेतला.
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता कोणती?
महाराष्ट्रातील १० ते ७५ वयोगटातील महसूल नोंदी नुसार विमा पॉलिसी लागू झालेल्या तारखेस खातेदार असलेला शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील विहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही एक सदस्य त्यामध्ये आई, वडिल, लाभार्थीचे पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती असे १० ते ७५ वर्षे वयोगटातील एकुण दोन जणांना लाभ घेता येईल.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे उद्दिष्ट्य
शेती व्यवसाय करताना शेतकऱ्यांचा अपघात होतो. परिणामी त्यांचा मृत्यू होतो किंवा त्यांना अपंगत्व येते परिणामी त्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते. या सर्व गोष्टींचा विचार करून अशा कुटुंबांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. जेणेकरून कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू ओढवल्यास किंवा अपंगत्व आल्यास कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार नाही.
शेतकऱ्याला आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्याच्या उद्देशाने गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
शेतकऱ्याचे जीवनमान सुधारण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
योजनेचे वैशिष्ट्य
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आली आहे.
या योजनेत आकारण्यात येणारी विम्याची रक्कम अत्यंत कमी आहे.
या योजनेअंतर्गत आकारण्यात येणारी विम्याची रक्कम ३२.२३ रुपये आहे. जी शासनामार्फत दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीत भरण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्याला विमा हप्त्याची रक्कम भरण्याची गरज नाही.
या योजनेअंतर्गत मिळणारे आर्थिक सहाय्य DBT च्या साहाय्याने लाभार्थी कुटुंबाच्या बँक खात्यात जमा केले जाते.
महाराष्ट्र राज्यातील १० ते ७५ वर्षे वयोगटातील महसूल नोंदी नुसार विमा पॉलिसी लागू झालेल्या तारखेस खातेदार असलेला शेतकरी व त्याच्या कुटुंबातील विहितीधारक खातेदार म्हणुन नोंद नसलेले कोणताही १ सदस्य त्यामध्ये आई वडील, लाभार्थीचे पती/ पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही १ व्यक्ती असे १० ते ७५ वर्षे वयोगटातील एकूण दोन जणांना या योजनेचा लाभ घेता येईल.
लाभ कधी मिळेल
विमा संरक्षणात रस्ता किंवा रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचुदंश, नक्षलवाद्याकडून झालेल्या हत्या, हिस्त्र जनावरांनी खाल्ल्यामुळे किंवा चावल्यामळे जखमी होणे किंवा मृत्यू, दंगल आणि अन्य कोणतेही अपघातांचा समावेश करण्यात आला आहे.
लाभ कधी मिळणार नाही
नैसर्गिक मृत्यू, विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व, आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वत:ला जखमी करून घेणे, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, अंमली पदार्थांच्या अंमलाखाली असताना झालेला अपघात, भ्रमिष्टपणा, बाळंतपणातील मृत्यू, शरीरांतर्गत रक्तस्त्राव, मोटार शर्यतीतील अपघात, युद्ध, सैन्यातील नोकरी, जवळच्या लाभधारकाकडून खून या बाबींचा विमा संरक्षणात समावेश नाही.
योजनेची आवश्यक कागदपत्रे
• दावा अर्ज
• ७/१२
• अर्जदाराचे राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असणे आवश्यक
• बँकेचे नाव
• बचत खाते क्रमांक
• शाखा
• आयएफएससी कोड
• शिधापत्रिका
• एफआयआर
• एखादा अपघात झाल्यास प्रथम माहिती अहवाल किंवा पोलीस पाटील अहवाल
• अकस्मात मृत्यूची खबर
• इंनक्वेस्ट पंचनामा
• वाहन चालविण्याचा वैध परवाना
• मृत्यू दाखला
• अपंगत्वाचा दाखला
• घोषणापत्र
• पासपोर्ट आकाराचा फोटो
• वयाचा दाखला (जन्माचा दाखल किंवा शाळा सोडल्याचा दाखल)
• अपघात घटनास्थळ पंचनामा
• पोष्ठ मार्टेम रिपोर्ट
• वारासदाराचे राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असणे आवश्यक
• कृषी अधिकारी पत्र
• औषधोपचाराचे कागदपत्र
• डिस्चार्ज कार्ड
योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याला सर्वात प्रथम आपल्या नजीकच्या जिल्हा कार्यालयात कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन सदर योजनेचा अर्ज घ्यावा लागेलं आणि अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडून सदर अर्ज जमा करावा
अशा प्रकारे या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
पंतप्रधान मत्स्य संपदा योजना : जाणून घ्या ही केंद्र सरकारी योजना 1 हेक्टर तळ्यासाठी कसे मिळवून देईल मत्स व्यवसाय कर्ज
शेतकऱ्यांनो, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदाम / तारण योजनेचा असा घ्या लाभ व वाढीव दराने विका शेतमाल..
Comments 2