जळगाव : मका हे रब्बी हंगामातील गहू, हरभरा या प्रमुख पिकांइतकेच महत्वाचे पिक आहे. त्यामुळे यंदा देखील शेतकर्यांकडून मका पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. मात्र, या पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. योग्य उपाययोजना केल्यास लष्करी अळीवर नियंत्रण मिळण्यात मदत होवू शकते. या उपाययोजना काय आहेत? हे आपण जाणून घेवूया.
मका पिकाच्या योग्य वाढीसाठी 25 ते 30 अंश (से) तापमान चांगले असते. ज्या ठिकाणी तापमान 20 ते 25 अंश (से.) आहे, अशा ठिकाणी मकाचे पिक वर्षभर घेता येते. 35 अंश (से) पेक्षा अधिक तापमान असल्यास उत्पादनात घट येते. परंतु, सध्या वातावरणात मोठा बदल झाल्याने तापमानात मोठा चढ-उतार होत आहे. अशा परिस्थितीत मकावर लष्करी अळी, खोड पोखरणारी अळी, खोडमाशी, मावा यांचा प्रादुर्भाव होत असतो.
नेपिअर गवत ठरेल वरदान
मका पिकावर पडणार्या लष्करी अळीपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी पिकामध्ये नेपिअर गवताच्या तीन ते चार ओळी लावाव्यात. हे गवत सापळा पीक म्हणून कार्य करते. या गवतावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास पाच टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडीरॅक्टिन 1500 पी पी एम 50 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, जेणेकरून लष्करी अळीवर वेळीच नियंत्रण मिळविता येईल.
असे करा फवारणीचे व्यवस्थापन
मकाच्या निरोगी वाढीसाठी तसेच दर्जेदार उत्पादनासाठी फवारण्या करणे गरजेचे आहे. मकाच्या उगवणीनंतर पहिली फवारणी 15 दिवसांनी करावी. जर्मिनेटर 250 मिली, थ्राईवर 250 मिली, क्राँपशाईनर 250 मिली, प्रिझम 100 मिली, प्रोटेक्टंट 100 ग्रॅम, हार्मोनी 100 मिली, स्प्लेंडर 100 मिली आणि 100 लिटर पाणी आदींचे मिश्रण करून फवारणी करावी. दुसरी फवारणी उगवणीच्या 25 ते 30 दिवसांनी थ्राईवर 500 मिली, क्राँपशाईर 500 मिली, राईपनर 250 मिली, प्रिझम 250 मिली, न्युट्राटोन 250 मिली, हार्मोनी 250 मिली, स्प्लेंडर 250 व 150 लिटर पाणी आदींचे मिश्रण करून करावी. तिसरी व शेवटची फवारणी उगवणीच्या 40 ते 45 दिवसानंतर करावी. थ्राईवर 750 मिली, क्राँपशाईर 750 मिली, राईपनर 500 मिली, प्रोटेक्टंट 500 ग्रॅम, प्रिझम 500 मिली, न्युट्राटोन 500 मिली, हार्मोनी 300 मिली, स्प्लेंडर 300 मिली व 200 लिटर पाणी आदींचे मिश्रण करून करावी. यामुळे पिकावर कोणताही रोग न पडता उत्पादनात वाढ होवू शकते.