पुणे : Farmers help.. पुणे दौऱ्यावर असताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा राज्यातल्या शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून गांभिर्याने पावले टाकली जात आहेत. नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दखल सरकार घेईल, अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
भव्य कृषी व दुग्ध प्रदर्शन अॅग्रोवर्ल्ड 11 ते 14 नोव्हेंबर 2022 @जळगाव..!
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/1xF7vny7J0I
विरोधी पक्ष या मुद्द्यावर काही बोलत असल्यास बोलू द्या. तो त्यांचा अधिकार आहे. मात्र नुकसान भरपाईपासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही याकरिता आम्ही काळजी घेत आहोत. आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील शेतकरीपुत्र आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांची जाणीव आहे. त्यामुळेच साडेचार हजार कोटींची मदत आतापर्यंत राज्यभर केली गेली. अतिपावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाची माहिती घेण्यासाठी पंचनामे सुरू आहे. पंचनामे पूर्ण होताच मदतवाटपाची प्रक्रिया सुरू होईल,” असे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले.
चांगली मदत देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू – अब्दुल सत्तार
नुकसान भरपाई वाटप नियोजनाविषयी ते म्हणाले, ”नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याच्या कामकाजाबाबत मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांशी चर्चा केलेली आहे. नुकसानग्रस्त भागांना मी स्वतःही भेटी दिल्या आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत. अतिपावसामुळे हानी झालेल्या भागांची माहिती मुख्यमंत्रीही घेत होते. त्यांनी निराश झालेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम केलेले आहे. चांगली मदत देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇