• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

राज्यात 1 कोटी 65 लाख 70 हजार 437 शेतकऱ्यांचा पीक विमा अर्ज दाखल – धनंजय मुंडे

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2024
in हॅपनिंग
0
राज्यात 1 कोटी 65 लाख 70 हजार 437 शेतकऱ्यांचा पीक विमा अर्ज दाखल – धनंजय मुंडे

मुंबई (मंत्रालय प्रतिनिधी) प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत आपल्या पिकांचा विमा भरण्याची अंतिम मुदत बुधवार 31 जुलै रोजी राज्यातून 1 कोटी 65 लाख 70 हजार 437 पीक विमा अर्ज पीक विमा पोर्टलवर दाखल झाले असून लाखो शेतकऱ्यांनी केवळ 1 रुपया विमा हफ्ता भरून आपले पीक विमा संरक्षित केले असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

 

खरीप हंगाम 2024 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीकविमा पोर्टलच्या वतीने सुरुवातीला 15 जुलै ही अंतिम मुदत देण्यात आली होती, मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे बरेच शेतकरी तेव्हा विमा भरण्यापासून वंचित राहिल्याने कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांना विनंती करून 31 जुलै पर्यंत मुदतवाढ करून घेतली होती. 15 जुलै नंतर अखेरपर्यंत 21 लाख 90 हजार अर्जांची त्यामुळे वाढ झाली आहे.

1 कोटी 10 लाख 55 हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित
राज्यात एकूण 97% पेरणी पूर्ण झाली असून पीक विमा योजनेच्या माध्यमातून एकूण 1 कोटी 10 लाख 55 हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले आहे. तर एकूण विमा संरक्षित रक्कम ही 53 हजार 886 कोटी इतकी आहे.

 

राज्य शासनाने भरले 4725 कोटी
एकूण विमा हफ्ता हा सुमारे 7959 कोटी इतका निश्चित असून, त्यापैकी शेतकरी हिस्सा एक रुपया प्रमाणे 1 कोटी 65 लाख, राज्य हिस्सा एकूण 4725 कोटी, त्यामध्ये राज्य शासनाचा स्वतःचा हिस्सा 3232 कोटी व शेतकऱ्यांच्या वतीने राज्य शासनाने भरावयाचा हिस्सा 1492 कोटी इतका निश्चित करण्यात आला असून केंद्र सरकारचा हिस्सा 3233 कोटी इतका निश्चित करण्यात आला आहे.

Jain Irrigation

मागील वर्षाच्या खरीप हंगामातील 7280 कोटी रुपये पीक विमा मंजूर
दरम्यान मागील वर्षीच्या खरीप हंगामामध्ये सुमारे 1 कोटी 71 लाख विमा अर्ज दाखल झाले होते तर संपूर्ण हंगामात वेगवेगळ्या प्रकारचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पिक विम्या पोटी आतापर्यंत 7280 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी 4271 कोटी पिक विम्याचे वाटप पूर्ण झाले असून आणखी 3009 कोटी रुपयांचे वितरण सध्या सुरू असून अंतिम पीक कापणी अहवालाचे काम 100% पूर्ण झाल्यानंतर या रकमेत आणखी वाढ होणार असल्याचेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

 

शेतीकामासाठी ट्रॅक्टरला हायहिल्सची चाके ; शेतकऱ्याची आयडिया

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • मक्यावरील लष्करी अळीचे व्यवस्थापन
  • बीटी कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन
Tags: कृषिमंत्री धनंजय मुंडेपीक विमा
Previous Post

बीटी कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन

Next Post

IMD 2 August 2024 : ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये राज्यात कसा राहील पाऊस ?

Next Post
IMD 2 August 2024

IMD 2 August 2024 : ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये राज्यात कसा राहील पाऊस ?

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.