माणसाने मनात आणले तर तो दगडही विकू शकतो, मात्र त्यासाठी जबरदस्त इच्छाशक्ती व अभिनव कल्पना असावी लागते आणि मी तर शोभेची झाडे विकत आहे त्यामुळे किमान आपल्या घरातील व घराजवळील वातावरण शुद्ध राहून मानवाला आवश्यक असणारा प्राणवायू (ऑक्सिजन) मोठ्या प्रमाणात मिळतो असे विश्वास पूर्ण विचार तळेगाव दाभाडे जिल्हा पुणे येथील 49 वर्षीय दिलीप किसनराव जाधव यांनी व्यक्त केले.
दिलीप जाधव यांचा तळेगाव एमआयडीसी ए -वन बायोटेक नावाने शोभिवंत झाडांच्या रोप तयार करण्याचा नर्सरी उद्योग आहे हा उद्योग नव्हे तर 25 एकर पेक्षा जास्त क्षेत्रावर पसरलेले साम्राज्य आहे यापैकी 29 हजार ते 1 लक्ष स्क्वेअर मीटर वर त्यांचे पॉलिहाऊस आहे तर 76 हजार ते 7 लक्ष स्क्वेअर मीटर रोपे उत्पादन व निर्मितीचे अर्ध पॉलिहाऊसकृत क्षेत्र आहे तर 63000 स्क्वेअर मीटर ते 1.20 लक्ष स्क्वेअर मीटर क्षेत्र वितरणासाठी जागा वितरणाचे पॉलिहाऊस व शेडनेट व्यापले आहे तळेगाव फार्मवर 120 पेक्षा जास्त कायमस्वरूपी कर्मचारी आहेत प्रत्यक्ष नर्सरीचे हे क्षेत्र फ्लोरीअग्रिकल्चरल पार्क अंबी (तळेगाव) येथे 2010 पासून सुरु असून हे त्यांच्या मित्राने घेतलेल्या सहा एकर क्षेत्रावर सुरू केले आहे येथील सर्व रोपे टिशू कल्चरची आहेत हे वैशिष्ट्य असून त्यामुळे रोपे जळणे, मरणे, वाया जाणे हे प्रमाण मात्र एक टक्का आहे.
दिलीप जाधव हे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रहिवासी असून 1992 चे कृषी पदवीधर आहेत 1993 ते 2003 पर्यंत त्यांनी पदमजी पल्प आणि पेपर मिल्स लिमिटेड मध्ये नोकरी केली तेथील कामाच्या अनुभवाच्या आधारे त्यांनी स्वतःचा उद्योग उभा करायचा होता त्यामुळे सुपरवायझर म्हणून नोकरी करताना सर्व विभागात काम करून अनुभव घेतला त्यातील प्रयोगशाळेचे इन्चार्ज होते पण सर्व गोष्टीला बंधने व मर्यादा होत्या येथे कार्यरत असतानाच 2001 ते 2003 या काळात डोक्यात पुढे काय ? हा विचार अस्वस्थ करत होता. पगार होता वीस हजार रुपये महिना. त्यांच्याच फर्मध्ये कार्यरत असणारे अनिल कादीमन हे लॅब मध्ये टिश्यूकल्चर प्रमुख होते त्यांचे कार्य करण्याची पद्धत व कर्मचारी यांच्याशी वागण्याची पद्धत यांचा प्रभाव दिलीप जाधव यांच्यावर पडला होता. त्यांच्याशी तिथे आपला विचार व्यक्त करीत असत. त्यांच्याजवळ एक दिवस डिके यांनी आपला राजीनामा दिला त्या वेळी अनिल राव म्हणाले आता पुढे काय करणार आहेत ? पण ठाम काही निर्णय नव्हता पिंपरी-चिंचवड परिसरात दोन रूम भाड्याने घेऊन लॅब 2003 मध्ये सुरू केली. या कामी त्यांची सुविद्य पत्नी सौ रोहिणी यांची मदत झाली त्या सुशिक्षित होत्या पण त्यांना कृषी चे कोणतेही ज्ञान व शिक्षण नव्हते दिलीप राव यांनी रोहिणी यांना टिश्युकल्चर चे ट्रेनिंग देऊन तीन वर्षात टिश्यु तज्ञ बनविले या लॅब मधील तयार रोपे विकण्यासाठी दिलीप जाधव हे मोटरसायकलवर विविध मॉल, हॉटेल, उच्चभ्रू वसाहत या ठिकाणी जाऊन विक्री करतात. एक वेळ अशी आली की खाजगी देणी देण्यासाठी मोटरसायकल सुद्धा विकावी लागली व एक वर्षभर साध्या सायकल वर व्यवसायासाठी फिरावे लागले कोणतीही बँक कर्ज देण्यास तयार नव्हते तरीही जिद्द न सोडता उभयतांनी व्यवसाय सुरूच ठेवला होता यातूनच वाकड येथे जागा घेऊन व्यवसायात वाढ केली या सर्व कामासाठी 2003 मध्ये अनिल कादीमन यांनी 5 लक्ष रुपये मदत दिली होती त्याचे हळूहळू मोठ्या व्यवसायात होत असलेले रूपांतर पाहून अनिल स्वतः 3.5 लाखाचे नोकरीचे पॅकेज सोडून या व्यवसायात पार्टनर झाले. 2005 मध्ये पार्टनरशिप रजिस्ट्रेशन झाले. 2007 पासून काम सुरू झाले मात्र अनिल राव 2001 मध्ये आपला हिस्सा (शेअर) घेऊन निघून गेले पण तोपर्यंत व्यवसाय सुस्थितीत प्रस्तावित झाला होता अनिलराव मुळे जाधव पती-पत्नी सह इतर कर्मचार्यांना चांगले व गुणवत्ता पूर्वक प्रशिक्षण मिळाले होते.
तळेगाव दाभाडे येथे 2003 मध्ये एमआयडीसी झाली होती दिलीप जाधव यांच्या एका मित्राने ते 2006 मध्ये सहा एकर जागा 16 लाख रुपयात घेतली होती त्या मित्राने ही जागा डि.के जाधव यांना कोणत्याही पूर्व अटीशिवाय फक्त विश्वासाने वापरण्यास दिली. तेथे 2010 पासून नर्सरी प्लांटेशन हळूहळू उभे राहिले या नर्सरीमध्ये घरामध्ये व घराबाहेरील वापरण्यात येणार्या बहुविध शोभेच्या झाडांची रोपे उपलब्ध करून देण्यात आली आहेत 180 पेक्षा जास्त प्रकारची रोपे येथे उपलब्ध असून त्यामध्ये दरवर्षी नवीन झाड प्रजातीची भरच पडत चालली आहे सध्या जवळपास दोनशे चाळीस प्रकारच्या जीन्स टिश्यु साठीच्या झाडांच्या प्रजाती त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.
त्यांचे वाकड येथील जागेतील टिश्यु कल्चर 3000 हजार स्क्वेअर फूट लॅबमधून दरवर्षी किमान 6 लाख ते 9 लाख प्लांट्स तयार करून नर्सरी कडे पाठवल्या जातात या प्लांटसाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करता लहान रोपांसाठी नेटपॉट व 4 इंची साठी व बिगफ्रंटसाठी सेमी रेडी पॉट व्हर्टीकल गार्डन साठी गिफ्ट पॉटचा वापर केला जातो व जास्त करून पॉट व फॅब्रिकचा यामध्ये वापर केला जातो मातीऐवजी कोकोपीटचा वापर प्रामुख्याने होतो. तामिळनाडू मधून कोकोपीट खरेदी केले जाते तर फॅब्रिकची ही होलसेलमध्ये खरेदी कंपनीकडून होते. त्यानंतर त्यापासून पॉट विविध आकाराचे बनवले जातात .
अहमदनगर येथील स्वतःच्या कंपनीच्या क्षेत्रावर एमआयडीसी मध्ये स्वतःची बायो कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प आहे . याशिवाय रोपांना पाण्यात विरघळणारी खते 19:19:19 , 12:61 , कॅल्शियम नायट्रेट , मायक्रो न्यूट्रिशियन हे चांगली व सक्षम मुळे तयार व्हावेत म्हणून तिचा वापर केला जातो (बायोझाईम) मावा व आळी नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस च्या फवारण्या घेतल्या जातात बुरशी नियंत्रणासाठी एम-45, बाविस्तीनचा वापर केला जातो. लॅबमधून आणून प्लांन्टेशन झाले की दहा दिवसानंतर फवारणी केली जाते त्यामुळे कीड, रोग हा प्रकार नर्सरीमध्ये पहावयास मिळत नाही. विशेष म्हणजे सदरच्या नर्सरीत कोणावरही नियंत्रणासाठी सुपरवायझर नाही प्रत्येक कामगार येथे स्वतंत्र असून ते सर्व आपले काम या संकल्पनेतून काम करतात.
लॅब व कृषी निगडित कामे असल्यामुळे जवळपास दहा कामगार बी.एस्सी, बी.एस्सी ऍग्री, बीकॉम आहेत. उर्वरित महिला व पुरुष अशिक्षित ते बारावी आहेत, पण सर्वजण आपल्या कामात निष्णात आहेत या कर्मचार्यांसाठी घर भाडे नाही, लाईट बिल नाही, बाहेर राहणारे असतील तर त्यांना येण्या-जाण्यासाठी बस सेवा मोफत दर रविवारी व राष्ट्रीय सणांच्या सर्व सुट्या दिल्या जातात .जुन्या कर्मचारी जोडप्यांसाठी दरमहा 15 ते 20 हजार रुपये व नवीन जोडप्यांसाठी 10 ते 15 हजार रुपये मासिक वेतन दिले जाते दिवाळी क महिन्याचे वेतन बोनस म्हणून दिले जाते टिश्यूकल्चर लॅब मध्ये व्हरायटी तयार होण्यासाठी साधारणपणे एक वर्ष लागते. तेथून या व्हरायटीचे रोप नर्सरीत आणून नेटपॉटमध्ये लागवड करून विक्रीसाठी तयार करेपर्यंत अडीच ते तीन महिने लागतात. सध्या दरवर्षी 50 ते 60 लाख रुपये निर्मिती असून दिल्ली ते कन्याकुमारी व मुंबई ते कलकत्ता असे संपूर्ण देशभरात विक्री होत आहे. दररोज सकाळी आठ ते बारा पर्यंत विक्रीचे ट्रक भरून दिले जातात दुपारी मात्र फक्त नर्सरी मधील कामे केली जातात नर्सरीमध्ये कोकोपीट भरणे रोपांची निगा राखणे पाणी देणे पासून विक्रीच्या रोपांचे ट्रे तयार करणे इथपर्यंतची कामे महिलाच करतात . त्यासाठी 20 महिला कर्मचारी असून त्यांच्या सहयोगी महिला वेगळ्या तर पुरुष कर्मचारी पॅकिंग लोडिंग अनलोडिंग व इतर कामे वजनदार कामे करतात
यासाठी लागणारे पाणी एमआयडीसीने पुरवठा केले आहे. त्याशिवाय जवळच नाला आहे या नाल्यात शुद्ध पाण्याबरोबर औद्योगिक वसाहतीचे वाहून जाणारे पाणी छोटा बांध टाकून अडवले आहे त्या पाण्याचा वापरही नर्सरीमध्ये केला जातो कर्मचार्यांना पिण्यासाठी फिल्टर (आ.ओ.) पाणी वापरले जाते शेडनेट ही 50 टक्केची आहे. दिलीप जाधव हे शाळा-कॉलेजमध्ये पर्यावरण विषयावर मार्गदर्शन करतात शाळा-कॉलेजेस विविध समाजसेवी संस्थांना रोपे जगून झाड तयार करण्याच्या अटीवर दरवर्षी रोपे मोफत देतात विविध जातीच्या रोपांचा दर वयोमानानुसार 60 रुपयांपासून ते 300 रुपयांपर्यंत आहे.
2014 मध्ये ए-1 बायोटेकची एक नवीन शाखा कोरोना(लेीेपर) नावाने रजिस्टर करण्यात आली. याचे संस्थापक व संचालक रोहित जाधव हे दिलीप जाधव यांचे बीएस्सी बायोटेक व एमबीए झालेले सुपुत्र आहे. त्यांना या कंपनीच्या माध्यमातून शोभेच्या वॉल हँगिंग गार्डन चा उपक्रम मुंबई, पुणे, बेंगलोर येथे राबवला आहे. तर भूतानमध्ये ही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे त्याचे काही ग्राहकांपैकी सिंडिकेट बँक पुणे व बेंगलोर, ग्रीन पार्क हॉटेल, मुंबई महानगर प्राधिकरण, दिल्ली महा मेट्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, नागपूर मेट्रो, रहेजा ग्रुप ,हिरो, भारत फोर्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, टाटा अशा अनेक कंपन्यांमधून नैसर्गिक वॉल हँगिंग द्वारा पर्यावरण व वातावरण शुद्धीसाठी कोरोना कार्यरत आहे.
दिलीप जाधव सौ रोहिणी जाधव व रोहित जाधव हे प्रमुख संचालक असून कैलास जाधव हे नर्सरी प्रमुख, रामदास शेळके उत्पादन प्रमुख, सॅम्युअल जेऊरकर हे मानव संसाधन विकास व अमोल चोपडे हे उत्पादन विभाग पाहतात सध्या ए-1 अंतर्गत दोन एकर क्षेत्रावर पॉलिहाऊस 4 एकर क्षेत्र अर्धपॉलिहाऊस ,शेडनेट. नगर एमआयडीसीत 10 एकर क्षेत्र नर्सरी साठी लागणारा कच्चामाल उत्पादन व पंधरा एकर क्षेत्रावर इतर जैवविविध असा एकूण 31 एकर चा व्याप आहे. जमिनीचे काही क्षेत्र वगळता पंधरा वर्षापासून गुंतवणूक वाढतच गेली त्यावरून लागेल तेवढा पैसा काढून मजुरांचे वेतन कर्मचारी पगार कच्चामाल खरेदी व व्यवस्थापन खर्च हा करताना उर्वरित फायदा ही इन्वेस्टमेंट मध्ये गुंतत गेले आतापर्यंत जवळपास दहा कोटी रुपये गुंतवणूक झाली असल्याचे जाधव यांनी सांगितले तर मासिक व्यवहार 20 ते 30 लाख रुपयांचा होतो. अशी मोघम माहिती त्यांनी दिली पहिले 10 वर्ष कोणत्याही बँकेचे कर्ज घेतले नाही. आतापर्यंत अद्यावत लॅबयासाठी कर्ज घेतल्याचे त्यांनी सांगितले.
संपूर्ण 31 एकरमध्ये सर्व कर्मचारी महाराष्ट्रीयन आहेत. ते विश्वासाने कामही करतात त्यामुळे मराठी माणूस कष्ट करत नाही ही संकल्पनाच मोडीत निघते असे ते सांगतात दिलीप जाधव हे महाराष्ट्र नर्सरी असोसिएशन, इंडिया नर्सरी उद्योग याचे सक्रिय सदस्य असून राज्यापासून विदेशा पर्यंत त्यांनी अनेक पुरस्कार मिळवले आहेत. भारतात त्यांचे कायमस्वरूपी 700 ते 750 ग्राहक आहेत. हे ग्राहक टिकवून ठेवण्या मागे गुड सर्विस ,गुड प्रोडक्ट अन्टीमय प्राईस हे धोरण व पारदर्शक कारभार असल्याचे जाधव सांगतात. घरातील नैसर्गिक वातावरणच नवीन ग्राहक निर्माण करतो त्यामुळे या रोप विक्रीच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरात आरोग्यपूर्ण व आनंदी वातावरण रहावे याकडे आमचा कल असल्याचे ते सांगतात .
शेती व शेतीपूरक व्यवसाय करू इच्छिणार्या तरुणांना संदेश देताना दिलीप जाधव म्हणतात हे एकच व्हिजन डोळ्यासमोर ठेवून त्याचा ध्यास घेऊन कष्ट केले तर यश हमखास मिळतेच धरसोड वृत्ती कधीच नसावी. सौ रोहिणी जाधव या बीकॉम एम.एस.डब्ल्यू. असून टिश्यु कल्चर टेक्नॉलॉजी त्यांच्या पतीच्या मार्गदर्शनातून झाल्या त्या म्हणतात उद्योगात प्रगती व भरभराट करून घ्यायचे असेल तर विश्वासावरच साथी हात बढाना एक अकेला थक जायेगा, मिलकर बोझ उठाना ख यानुसार आम्ही काम करत असतो टिश्युची निर्मिती करताना मला नैसर्गिक नवनिर्मितीचा नेहमीच आनंद मिळतो आम्ही यश मिळवत आहोत पण यामध्ये आमच्या सर्व कर्मचारी वर्ग यांचा सिंहाचा वाटा आहे लॅब कर्मचार्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च आम्ही करतो त्यामुळे ते सर्वजण आपलेपणाने काम करतात हेच आमचे यशाचे गुपित आहे येत्या दोन वर्षात आम्ही प्रतिवर्षी 5 कोटी रोप निर्मितीचे लक्ष्य गाठू हा मला विश्वास आहे.
A-one Biotech – 9921183935 : 9422523210
Email:- infoaonebiotech.com Web- www.aonebiotech.com