नाशिक : ग्रेप एक्सपोर्ट असोसिएशन ऑफ इंडियाच्या संचालकपदी ओम गायत्रीचे मधुकर गवळी यांची निवड करण्यात आली आहे.
ग्रेप एक्सपोर्ट असोसिएशन ऑफ इंडिया अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघ, पुणे अध्यक्ष कैलासराव भोसले यांची निवड झाली तसेच उपाध्यक्षपदी मयंक टंडन व राजाराम सांगळे यांची निवड करण्यात आली. त्याच प्रमाणे खजिनदारपदी विलास धुर्जड, सेक्रेटरी- राजेंद्र बोरस्ते व जॉईट सेक्रेटरी म्हणून तुकाराम येलाले यांची निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे असोसिएशनच्या संचालकपदी संघाचे मानद सचिव बबनराव भालेराव, सह्याद्री फार्मचे विलासराव शिंदे, प्रितम चंद्रात्रेय, लक्ष्मण सावळकर, परेश भयाणी, माणिकराव पाटील, भास्करराव शिंदे, मधुकर क्षीरसागर, बाळासाहेब वाघ, अमित पडोळ, अमित चोपडे, रावसाहेब रायते, मनोज लहाने, मधुकर गवळी, अविनाश कोळी, हरीश मोरे, तुषार खापरे यांची निवड करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघ, नाशिक विभागातर्फे अध्यक्ष बाळासाहेब गडाख यांनी सर्वांचा सत्कार केला. तसेच मावळते अध्यक्ष खापरे यांचे त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानले.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.