• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

एकनाथराव खडसे यांची विज्ञाननिष्ठ शेती!

Team Agroworld by Team Agroworld
October 26, 2020
in इतर
0
एकनाथराव खडसे यांची विज्ञाननिष्ठ शेती!
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड

सीडलेस जांभूळ, 5 फुटी दुधी भोपळा, वर्षभरात दोनदा येणार्‍या आंब्याची शेती
एकनाथराव खडसे अर्थात जनसामान्यांचे नाथाभाऊ..! राजकारणातील एक मातब्बर, लढवय्ये व्यक्तिमत्व म्हणून महाराष्ट्रभर त्यांची प्रमुख ओळख. परंतु, या मुरब्बी राजकारणी माणसात एक चिकित्सक, प्रयोगशील शेतकरीही दडला आहे, ही बाब अनेकांना माहिती नाही. दिवाळी विशेषांकाच्या निमित्ताने अ‍ॅग्रोवर्ल्ड फार्मने नाथाभाऊंमध्ये दडलेला प्रयोगशील शेतकरी सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. शेतीमातीशी लहानपणापासून नाळ जुळलेली असल्याने राजकारणात पूर्णवेळ सक्रिय असतानाही त्यांनी शेतीकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही, हे विशेष. सुरुवातीला पारंपरिक पद्धतीने शेती करता करता त्यांनी आधुनिकतेची कास धरली. आज ते विज्ञाननिष्ठ शेती करत आहेत. सीडलेस जांभूळ… पाच फुटी दुधी भोपळा… साडेतीन ते चार फुटी शेवगा… वर्षभरात दोनदा बहरणारा आंबा… खजुराची शेती… मोसंबी… संत्रा… सीताफळ… पॉलिहाऊससारखी हायटेक फार्मिंग ते यशस्वीरित्या करीत आहेत.
असे वळले शेतीकडे
एकनाथराव गणपतराव खडसे यांचा जन्म कोथळी (ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) येथील एका शेतकरी कुटुंबात झाला. कोथळीतच त्यांचे बालपण गेले. पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी कोथळीत असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत घेतले. त्यानंतर आठवी ते मॅट्रीकपर्यंत ते औरंगाबाद येथील शासकीय तांत्रिक विद्यालयात शिकले. पुढे बांद्रा (मुंबई) येथील चेतना कॉलेजमध्ये त्यांनी वाणिज्य विषयात पूर्व पदवी मिळवली. नागपूर विद्यापीठातून ते वाणिज्य शाखेचे पदवीधर झाले. त्यांच्या राजकीय वाटचालीची पायाभरणी याच काळात झाली. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी स्टुडंट नॅशनल कौन्सिलच्या निवडणुका लढवल्या. ते महाविद्यालयाचे जनरल सेक्रेटरी होते. त्याकाळी नागपूर विद्यापीठावर संपूर्ण विदर्भातून एक विद्यापीठ प्रतिनिधी निवडून येत होता. विदर्भातील सुमारे 400 महाविद्यालये पालथी घालून ते नागपूर विद्यापीठावर विदर्भातील विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून निवडून आले होते. पदवी मिळवल्यानंतर त्यांनी भायंदर (मुंबई) येथून प्लास्टिक डिप्लोमा केला. त्यानंतर 1974 मध्ये अकोला येथे गुरुदत्त प्लास्टिक इंडस्ट्रिज नावाची कंपनी उभारली. या कंपनीत फाउंटन पेन, नायलॉनचे बटण तयार केले जायचे. हे जपानचे तंत्रज्ञान होते. त्याचा परवाना त्यांनी मिळवला होता. मात्र, या व्यवसायात फारसे यश न आल्याने त्यांनी थांबण्याचा निर्णय घेतला. 1975 च्या सुमारास ते कोथळीला परत आले. गावी परतल्यावर त्यांनी वडिलोपार्जित शेतीची सूत्रे हाती घेतली. लहानपणापासून शेतीची आवड असल्याने ते शेतीत रमले. सुरुवातीला पारंपरिक शेती करता करता त्यांनी आधुनिकतेचा अंगीकार केला. बदलते वातावरण… कमी होत जाणारे पर्जन्य… याचा वेळीच वेध घेऊन ते पीक पद्धतीत बदल करत गेले. सीडलेस जांभूळ… चार ते पाच फुटी दुधी भोपळा… इतकेच काय अत्यल्प पाण्यात तसेच वाळवंटी भागात होणार्‍या खजुराची शेती… पॉलिहाऊसच्या माध्यमातून हायटेक शेतीही ते आज करत आहेत. विशेष म्हणजे, राजकीय व्यापातही त्यांनी शेतीची आवड जोपासत त्यात नानाविध प्रयोग सुरूच ठेवले आहेत.
वडिलोपार्जित 180 एकर शेती
खडसे कुटुंबीयांकडे वडिलोपार्जित 180 एकर शेती होती. त्या काळी त्यांचे वडील, काका शेती पाहत होते. हिस्सेवाटणीत त्यांच्या वडिलांच्या वाट्याला 60 एकर शेती आली. मुक्ताईनगर जवळच ही शेती विस्तारलेली आहे. ते पाच भावंडे. मोठे भाऊ बारसू खडसे हे एम.एस्सी. पी.एचडी., दुसरे विश्वनाथ खडसे एमएस्सी. केमेस्ट्री, तिसरे काशीनाथ खडसे आर्किटेक्ट, चौथे रघुनाथ खडसे हे नेत्रतज्ज्ञ असल्याने एकनाथराव खडसे यांनी 1975 च्या सुमारास वडिलोपार्जित 60 एकर शेतीची सूत्रे सांभाळली. सुरुवातीला ते कापसासह कारंजी, पटना, जी- 4, गुंटूर जातीची मिरची, कांदे, विविध कडधान्ये अशी पारंपरिक पिके शेतीत घेत होते. केळीचे पीक घेण्याचा प्रयत्नही त्यांनी करून पाहिला. परंतु, बदलत्या वातावरणाचा केळीला फटका बसत असल्याने त्यांनी केळी लागवड थांबवली. शेतीची आवड असल्याने ते कृषी विषयक चर्चेसाठी आकाशवाणीवर होणार्‍या कार्यक्रमांमध्ये आवर्जून उपस्थित राहत. त्यामुळे शेतीतील बदलत्या तंत्रज्ञानाची त्यांना ओळख होत गेली. याच अनुषंगाने त्यांनी मिरची व भुईमुगाच्या नव्या बियाण्याची लागवड करत विविध प्रयोगही केले. इक्रिसॅट पद्धतीने केलेली भुईमूग लागवड हे त्याचे उदाहरण आहे. त्या काळी लग्न समारंभात नाश्ता आणि जेवणात पिठलं हा मेनू असायचा. हे पिठलं तयार करण्यासाठी पिवळी मिरची वापरली जाई. या पिवळी मिरचीची लागवड देखील ते मोठ्या प्रमाणावर करत होते. आजही त्यांच्या शेतात पिवळी मिरची लावली जाते. काही कालावधीनंतर महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) अस्तित्त्वात आले. महाबीजच्या मदतीने ते हरभरा तसेच इतर हायब्रीड वाणांचे सीड प्लॉट तयार करायला लागले. कालांतराने काही कारणास्तव हा उपक्रमही त्यांनी बंद केला. सातत्याने बदलणारे वातावरण, पर्जन्याचा दोलायमान झालेला आलेख लक्षात घेता त्यांनी नवतंत्रज्ञाची कास धरत पीक पद्धतीत बदल केला. बदलत्या काळासोबत गेल्याने त्यांनी मागे वळून पाहिले नाही.
बालपणीच्या आठवणींना उजाळा
बालपणाच्या आठवणींना देखील त्यांनी उजाळा दिला. ते म्हणाले की, बालपणी आम्ही नेहमी शेतात जायचो. तेव्हा विहिरीवर चालणारी मोट (पूर्वीच्या काळी विहिरीतून पाणी काढण्यासाठीचे साधन) आमच्यासाठी खूप मोठे आकर्षण होते. विहिरींमध्ये त्या काळी अवघ्या 8 ते 10 फुटावर पाणी असायचे. हे पाणी मोटद्वारे पिकांना दिले जायचे. मोट सुरू असताना नाड्यावर बसण्याचा आनंद वेगळाच असे. आमच्या शेतात तेलघाणा होता. तेथे तीळ, जवस, करडई आणि शेंगदाण्याचे तेल काढण्याचे काम चालायचे. शेतात आल्यावर आम्ही तीळ आणि शेंगदाण्याची ढेप खाण्यासाठी नेहमी जायचो. हा तेलघाणा वडिलांनी स्वत: चालवला. नंतर भाड्याने दिला. काही वर्षांनंतर तो बंद पडला. आमच्या शेतात बांधकामासाठी लागणार्‍या चुन्याची घाणीही होती. या घाणीत मानखड्यापासून चुना तयार केला व्हायचा. चुना घट्ट व्हावा म्हणून त्यात बेलफळे टाकायचे. गावात सर्वात आधी आमच्या शेतात चुन्याची घाणी होती. त्यानंतर ग्रामपंचायतीने चुन्याची घाणी सुरू केली होती, अशी आठवणी त्यांनी सांगितल्या.
दरवर्षी पेरणीसाठी जातीने राहतात हजर
शेतीची आवड असल्याने दरवर्षी वेळात वेळ काढून ते पेरणीसाठी जातीने हजर राहतात. शेती करायला सुरुवात केल्यानंतर एकही वर्षी त्यांनी पेरणीला उपस्थित राहणे टाळले नाही. कितीही महत्त्वाची कामे राहिली तरी ती पेरणीसाठी बाजूला ठेवतात. पूर्वी ते स्वत: हातात तिफण घेऊन पेरणी करायचे. पेरणी एका सरळ रेषेत झाली नाही तर कोळपणीला त्रास होतो. पिकांचे नुकसान होते. म्हणून पेरणी सरळ रेषेतच झाली पाहिजे, असा आपला आग्रह असतो. पेरणीचा काळ म्हणजे शेतकर्‍याच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा काळ असतो, असेही त्यांनी सांगितले.
सीडलेस जांभुळाचा यशस्वी प्रयोग
मध्यप्रदेशाच्या सीमावर्ती भागात मुक्ताईनगर तालुक्याचा काही भाग मोडतो. या भागात असलेल्या सातपुडा पर्वताच्या जंगलात सीडलेस जांभुळाची झाडे आढळतात. खूप जणांनी या जंगलातून रोपे आणून ती शेतात जगविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यात यश आले नाही. एकनाथराव खडसे हे राहुरी कृषी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर 12 वर्ष सदस्य होते. त्यामुळे त्यांनी राहुरी कृषी विद्यापीठातील कृषी शास्त्रज्ञांना यासंदर्भात माहिती देऊन सीडलेस जांभुळाच्या रोपांवर संशोधन करण्यास सांगितले. परंतु, कृषी शास्त्रज्ञांनाही कलमी रोपे तयार करण्यात यश आले नाही. विरोधी पक्षनेता असताना त्यांनी कृषी शास्त्रज्ञांना थेट सातपुड्यात नेले. यावेळी शास्त्रज्ञांनी 20 ते 25 किलो सीडलेस जांभूळ आणि काही रोपे नेली. संशोधन करताना अथक परिश्रमाअंती या जांभूळ आणि रोपांमध्ये शास्त्रज्ञांना काही टिश्यू आढळले. त्यांचा प्रयोग 10 टक्के यशस्वी झाला. शास्त्रज्ञांनी टिश्यूपासून जी रोपे तयार केली; त्यातील काही रोपे त्यांनी आपल्या शेतात ठिकठिकाणी लावली आहेत. आज सीडलेस जांभुळांचे चांगले उत्पन्न निघत आहे. कृषिमंत्री असताना त्यांनी शेतकर्‍यांच्या हितासाठी हे संशोधन राज्यव्यापी व्हावे, म्हणून प्रयत्न केले. मधुमेहासाठी जांभुळाचा रस गुणकारी असतो. याशिवाय सीडलेस जांभुळाला चांगली मागणी असल्याने त्याचा व्यावसायिक वापर व्हावा, म्हणूनही ते प्रयत्नशील आहेत. कमी पाण्यात आणि मुरमाड जमिनीतही सीडलेस जांभुळाचे पीक घेता येते. शेतकर्‍यांसाठी हे पर्यायी पीक ठरू शकते. त्यामुळे सीडलेस जांभुळावर अधिक संशोधनाची गरज आहे, हीच बाब ओळखून सरकार दरबारी त्यांचा पाठपुरावा आजही सुरू आहे. अधिवेशन काळात अनेकदा ते न विसरता सहकारी आमदारांसाठी सीडलेस जांभूळ नेतात. अनेकांसाठी हा कुतूहलाचा विषय आहे, असेही ते म्हणाले.
49 एकर क्षेत्रावर खजूर…
श्री संत मुक्ताई साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव हे त्यांचे जवळचे सहकारी आहेत. जाधव यांनी कारखाना परिसरातील शेतात 4 ते 5 वर्षांपूर्वी खजूर लागवडीचा प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर केला होता. त्यासाठी खजुराची रोपे त्यांनी आखाती देशातून आणली होती. त्यांचा प्रयोग यशस्वी झाल्याने एकनाथराव खडसे यांनीही आपल्या शेतात 15 एकरावर खजूर लागवड केली. आज खडसे यांचे 15 एकर आणि कारखाना परिसरातील शेतात 34 एकर क्षेत्रावर खजूर लागवड आहे. त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. 25 फूट बाय 25 फूट आकारात त्यांनी खजुराची लागवड केली आहे. एका एकरात सुमारे 60 ते 65 झाडे बसतात. त्यात लागवडीत नर व मादी झाडांचे प्रमाण समान असले पाहिजे. खजुराच्या झाडाचे वयोमान 100 वर्षांपर्यंत असते. लागवडीनंतर 4 वर्षानंतर उत्पन्न निघण्यास सुरुवात होते. एका झाडापासून सुमारे 5 ते 6 क्विंटल खजूर निघते. ओल्या खजुराला बाजारात प्रती किलो 200 रुपयांपेक्षा जास्तीचा दर मिळतो. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे खजूर मुरमाड जमिनीत आणि पाण्याविना घेता येते. फक्त सुरुवातीला झाड जगवण्यासाठी पाण्याची गरज भासते. लागवडीनंतर 4 वर्षांनी उत्पन्न निघते. त्यामुळे शेतकर्‍यांनी आंतरपीक घ्यावे. एकनाथराव खडसे यांनी शेवगा, हरभरा ही पीके आंतरपीके म्हणून घेतली. जळगाव जिल्ह्यातील जमीन आणि पावसाचा विचार केला तर येथील शेतकर्‍यांसाठी खजुराचे पीक उत्तम पर्याय ठरू शकतो. खजुराची लागवड करताना नर आणि मादी झाडे जवळ असतील, याची काळजी घ्यावी लागते. कारण मादी झाडावर फुलधारणेपूर्वी पांढर्‍या रंगाची पावडर येते. ही पावडर नर झाडावर पडल्याशिवाय त्याची फळधारणा होत नाही. वार्‍याने ही पावडर नर झाडावर उडाली नाही तर हाताने टाकावी लागते. प्रत्येक हंगामात ही काळजी घ्यावी लागते. सर्वसाधारणपणे नोव्हेंबर महिन्यात खजूर झाडावर फुलधारणा होते. त्यानंतर मार्च-एप्रिलमध्ये फळे मिळतात. खजुराची रोपे महाग आहेत. ती आखाती देशांमधून आयात करावी लागतात. ही रोपे आपल्याकडे आणल्यावर ती वातावरणाशी सुसंगत व्हावी म्हणून गुजरातमधील कच्छ, भूज या वाळवंटी भागात असलेल्या नर्सरीत ठेवावी लागतात. या सार्‍या प्रक्रियेत एका रोपासाठी सुमारे 4 ते 5 हजारांचा खर्च येतो. हा खर्च सर्वसामान्य शेतकर्‍याला करणे शक्य नसल्याने राज्य सरकारने त्यासाठी शेतकर्‍यांना सवलत द्यावी किंवा फळबाग म्हणून खजुराची शेती करण्यास इच्छूक शेतकर्‍यांना एनएचएम (नॅशनल हार्टिकल्चर मिशन) अंतर्गत मदत करावी, अशी मागणी खडसे यांनी सरकारकडे केली आहे. आखाती देशातील खजुरांच्या रोपांवर संशोधन करून टिश्यूकल्चर तंत्रज्ञानाच्या मदतीने ती भारतातच तयार केली तर शेती क्षेत्रात मोठा बदल घडू शकतो, असेही ते म्हणाले. या विषयासंदर्भात शेतकरी हितार्थ सरकार दरबारी पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आंब्याची 150 झाडे
त्यांच्या शेतात निरंजन प्रजातीच्या 150 आंब्याची झाडे आहेत. 4 वर्षांपूर्वी त्यांनी ही आंब्याची झाडे लावली होती. या आंब्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला वर्षभरातून दोनदा बहर येतो. दिवाळी व उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर आंबे निघतात. औरंगाबाद येथील हिमायतबाग फळ संशोधन केंद्रातून त्यांनी या आंब्याची रोपे आणली होती. यासोबतच, त्यांनी 2 एकर क्षेत्रावर अनोना प्रजातीच्या सीताफळांची देखील लागवड केली आहे. ही रोपे त्यांनी बार्शीहून आणली आहेत.
9 एकर मोसंबी, 2 एकर संत्रा
मुक्ताईनगरापासून काही अंतरावरील खडसे फार्मजवळ असलेल्या शेतात त्यांनी 9 एकरावर मोसंबीची तर 2 एकर क्षेत्रावर संत्रा लागवड केली आहे. मोसंबी व संत्रा लागवडीसाठी त्यांनी मल्चिंगचा वापर केला आहे. तसेच, सिंचनासाठी जैन इरिगेशनचे ठिबक तंत्रज्ञान वापरले आहे. या बागेतून मोसंबी आणि संत्र्याचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न निघत आहे. राजकीय व्यापातून वेळात वेळ काढून ते शेतात फेरफटका मारतात. याशिवाय 2 एकर क्षेत्रावर त्यांनी पॉलिहाऊस उभारले आहे. त्यात ढोबळी मिरची, काकडी तसेच टरबूज अशी पिके त्यांनी टप्प्याटप्प्याने घेतली आहेत. माणूस पेरला तरी माणूस उगवेल… हे जळगाव जिल्ह्यातील मातीचे वैशिष्ट्य आहे. म्हणूनच मी सातत्याने शेतात विविध उपक्रम राबवत असतो. त्याला यशही येत असते, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
शेतकर्‍याला सरकारी पाठबळाची गरज
दुष्काळी परिस्थितीसंदर्भात बोलताना ते म्हणाले की, यावर्षी सर्वत्र दुष्काळ आहे. शेतकर्‍याला सरकारी पाठबळाची गरज आहे. शेतीपूरक व्यवसायांकडे शेतकर्‍यांनी वळावे म्हणून दुग्ध व्यवसाय, शेती मालावर प्रक्रिया करणारे उद्योग यासाठी सरकारने सवलती दिल्या पाहिजेत. दुष्काळामुळे पुढील 8 महिने जास्तीची कामे नसल्याने शेतकर्‍यांनी शेतबांध बंदिस्ती, टेकड्यांवर समतल चर खोदणे, नाला बंडिंग, शासकीय मदतीतून शेततळे खोदणे अशी जलसंधारणाची कामे करायला हवी. गटशेतीला सरकार प्राधान्य देत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी गटशेतीकडे वळले पाहिजे. गटाच्या माध्यमातून शेती अवजारांची बँक उघडावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
जागतिक तंत्रज्ञानाच्या अभ्यासाची गरज
भारतीय शेतीत बदल घडवून आणायचा असेल तर जागतिक तंत्रज्ञानाच्या अभ्यासाची गरज आहे. इस्त्राईल, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, हॉलंड, नेदरलँडमध्ये जाऊन मी तेथील तंत्रज्ञान पाहिले आहे. या सर्व देशांमधील तंत्रज्ञान खूपच प्रगत आहे. पिकांच्या सुधारित जातींची ते लागवड करतात. तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळेच त्यांचा उत्पादनाचा आलेख उंचीवर आहे. युरोपियन महासंघातील काही देशांनी आपल्याकडील गाय तिकडे नेऊन संशोधन केले. आपल्याकडे 10 ते 12 लीटर दूध देणारी गाय तिकडे 30 ते 35 लीटर दूध देते. हे संशोधनातून शक्य झाले आहे. ही बाब विचारात घेऊन आपल्याकडेही संशोधन वाढले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
जुन्या आठवणीत रमले नाथाभाऊ!
शेतीचे किस्से सांगताना ते जुन्या आठवणींमध्ये रमले होते. ते म्हणाले की, आमच्याकडे वडिलोपार्जित 180 एकर शेती होती. आजोबांना 3 भाऊ होते. त्यामुळे प्रत्येकाच्या वाट्याला 60 एकर शेती आली. आमच्या हिश्श्याची शेती आधी वडील, नंतर मी स्वत: करायला लागलो. पूर्वी म्हणजे 1960 च्या काळात मुक्ताईनगर परिसरात अती पाऊस व्हायचा. त्यामुळे खरीप हंगाम जवळपास नसायचा. रब्बीत संपूर्ण शेतातील गवत काढून सरबती-गावरान गहू किंवा हरभर्‍याची पेरणी केली जायची. तेव्हा विहिरींना चांगले पाणी असायचे. मोजक्या लोकांकडे डिझेल इंजिन होते. त्यामुळे पाण्याचा वारेमाप उपसा होत नव्हता. मात्र, हळूहळू परिस्थिती बदलत गेली. अनेकांकडे डिझेल इंजिन, इलेक्ट्रिक मोटारी आल्या. दुसरीकडे पाऊस कमी होऊ लागला. परिणामी जमिनीतील पाणी पातळी खोलवर गेली. म्हणून आता स्प्रिंक्लर, सूक्ष्मसिंचन तंत्रज्ञानाचा वापर करावा लागत आहे. आमच्याकडेही त्याकाळी रस्टन कंपनीचे डिझेल इंजिन होते. हे इंजिन कधी नादुरुस्त झाले तर मी स्वत: दुरुस्त करायचो. त्याचे एकेक पार्ट मोकळे करून परत जोडायचो. इंजिन दुरुस्त झाल्यावर पाईपलाईनमध्ये शेणाचे पाणी करून टाकणे, इंजिन सुरू करण्यासाठी हँडल मारणे, अशी कामे मी केली आहेत. दिवसातून 5-5 वेळा विहिरीत उतरलो आहे. एवढेच नाही तर जंगली प्राण्यांपासून संरक्षण व्हावे म्हणून एका हातात बंदूक आणि दुसर्‍या हातात बॅटरी घेऊन रात्री अपरात्री शेतातील पिकांना पाणी देण्यासाठीही गेलो आहे. आमच्याकडे फर्ग्यूसन आणि इंटरनॅशनल कंपनीचे दोन ट्रॅक्टर होते. हे ट्रॅक्टर मी खूप वर्ष चालवले. या ट्रॅक्टर्सच्या मदतीने शेती केली. ट्रॅक्टरची दुरुस्ती, ऑईल बदलणे अशी कामेही केली आहेत, असे त्यांनी सांगितले.

अबब… 5 फुटी दुधी भोपळा
एकनाथराव खडसे यांनी आपल्या शेतात ठिकठिकाणी बांधांवर दुधी भोपळ्याची लागवड केली आहे. या भोपळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो चक्क 5 फुटांपर्यंत वाढतो आणि संपूर्ण भोपळा कोवळा असतो. कोथळीत असलेल्या श्री संत मुक्ताई मंदिर परिसरातील वारकरी वाड्यातील एका झाडावर भोपळ्याचा वेल होता. त्यावर 4 ते 5 फुटाचे भोपळे लागलेले होते. हा वेल पाहताच त्यांच्यातील उपक्रमशील शेतकरी जागा झाला. तेथून बिया आणत त्यांची आपल्या शेतात लागवड केली. शेतांच्या बांधांवर लावलेल्या भोपळ्याच्या वेलींवरील भोपळे कोरडे झाल्यावर त्यातील बिया जमिनीवर पडून आपोआप वेल वाढले. शेतांमध्ये निघणारे भोपळे गावातील लोक तसेच त्यांच्या फार्म हाऊसवरील पोलीस कर्मचारी, भेटी देणारे नागरिक आवर्जून घरी नेतात. भोपळ्यासह निरनिराळ्या प्रकारच्या भाजीपाल्याची देखील त्यांनी शेतात लागवड केली आहे.

Share this:

  • Facebook
  • X
Tags: 5 फुटी दुधी भोपळाएकनाथराव गणपतराव खडसेखजूर लागवडनाथाभाऊ!राहुरी कृषी विद्यापीठ
Previous Post

कृषी पर्यटन वाढीसाठी शासन प्रयत्नशील-पर्यटन मंत्री जयकुमार रावल

Next Post

‘परीस’ रुपी अनिल भोकरे

Next Post
‘परीस’ रुपी अनिल भोकरे

'परीस' रुपी अनिल भोकरे

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025 मध्ये ‘कॅन बायोसिस’ ला ज्युरी विशेष पुरस्कार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 30, 2025
0

तांत्रिक

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 25, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.