1901 नंतर देशभरात यंदाचा ऑगस्ट महिना ठरला सर्वात कोरडा महिना, याचे कारण जाणून घ्या.
- भारतात पाऊस 13 टक्के पावसाची तूट असलेल्या या वर्षीचा मान्सून 2015 नंतरचा सर्वात कोरडा पावसाळा.
- मान्सूनचा नवा टप्पा देशभर प्रवास करण्याऐवजी मध्य भारतातच संपण्याची शक्यता.
भारतीय हवामान खात्याच्या (IMD) आकडेवारीनुसार, यंदाचा ऑगस्ट हा देशातील 1901 नंतरचा सर्वात कोरडा ऑगस्ट महिना ठरणार आहे. एल-निनोच्या प्रतिकूल परिस्थितीच्या तीव्रतेचा हा परिणाम आहे. याशिवाय, या वर्षीचा मान्सून 2015 नंतरचा सर्वात कोरडा पावसाळा हंगाम ठरू शकतो. देशात आतापर्यंत सुमारे 13 टक्के पावसाची तूट नोंदवली गेली आहे, असे वरिष्ठ हवामानशास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
FPC (फार्मर प्रोड्युसर कंपनी) ला ₹ 10 कोटींपर्यंतचे कर्ज.. 3 कोटींपासून 6 कोटींपर्यंत अनुदानाच्या योजना
https://eagroworld.in/loan-up-to-%e2%82%b9-10-crore-to-fpc-farmer-producer-company/
ऑगस्टमध्ये आतापर्यंत 32 टक्के पावसाची तूट आहे. आता आजच्या दिवसांत देशातील बहुतांश भागात फारशा पावसाची शक्यता नाही, असे हवामान खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. देशात ऑगस्टमध्ये सरासरी 254.9 मिमी पाऊस पडतो. हा पाऊस एकूण पावसाळ्यातील पावसाच्या सुमारे 30 टक्के इतका असतो.
काय आहे नेमके कारण?
हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, भारतात ऑगस्ट 2005 मध्ये 25 टक्के, 1965 मध्ये 24.6 टक्के, 1920 मध्ये 24.4 टक्के, 2009 मध्ये 24.1 टक्के आणि 1913 मध्ये 24 टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. IMD चे प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचे मुख्य कारण म्हणजे अल निनो आहे. दक्षिण अमेरिकेजवळील पॅसिफिक महासागरात पाण्याचे तापमान वाढल्याने हे घडत आहे. याशिवाय, मॅडेन ज्युलियन ऑसिलेशनचा प्रतिकूल टप्पाही आहे. एल-निनोमुळे भारतात सामान्यत: मान्सूनचे वारे कमकुवत होतात आणि हवामान कोरडे राहते.
सप्टेंबरमध्ये चांगल्या मान्सूनची शक्यता
केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव एम. राजीवन यांनी सांगितले की, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कमी दाबाची प्रणाली तयार होऊ शकते असे हंगामी मॉडेल सूचित करत आहे. मात्र, मान्सूनचा नव्या टप्प्यातील हा पाऊस देशभर प्रवास करण्याऐवजी मध्य भारतातच संपण्याची शक्यता आहे. अर्थात हाच देशातील मान्सूनचा आणि शेतीचा कोअर झोन आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये एकंदरीत मान्सून चांगला होण्याची शक्यता आहे.