• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

65 वर्षांच्या प्रयोगशील शेतकरी; औषधी वनस्पतींच्या शेतीतून वर्षाला 50 लाखांची कमाई

निवृत्तीनंतर घरी न बसता, डॉक्टर पतीच्या काळजीतून सेंद्रिय शेतीतून नापीक जमीन बनवली सुपीक

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 3, 2023
in यशोगाथा
0
औषधी वनस्पतींच्या शेती
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

डॉक्टर पतीला कर्करोगाचे निदान झाल्यानंतर, निवृत्तीनंतर घरी न बसता एका जिद्दी महिलेने सारं काही शून्यातून शिकून घेत नवी इनिंग सुरू केली. त्यांनी सेंद्रिय शेतीतून नापीक जमीन सुपीक बनवली. या 65 वर्षांच्या प्रयोगशील शेतकरी महिलेने औषधी वनस्पतींच्या शेतीतून वर्षाला 50 लाखांची कमाई आता सुरू केली आहे. अनेकांना प्रेरणा देणारी ही अनोखी यशोगाथा आहे.

रीवा सूद असे या जिद्दी महिलेचे नाव आहे. 2016 मध्ये हिमाचल प्रदेशातील उना येथे त्यांनी सेंद्रिय शेती सुरू केली. पतीला कर्करोगाचे निदान झाल्यामुळे त्या हादरल्या होत्या. उपचारासाठी आवश्यक त्या औषधी वनस्पती स्वत:च उगवण्याचे त्यांनी ठरविले. औषधी आणि सुगंधी वनस्पतींव्यतिरिक्त, कृषी उद्योगही त्यांनी सुरू केला. आता फक्त ड्रॅगन फ्रूट फार्मिंगमधूच त्या 20 लाख रुपये कमावत आहेत. रीवा सूद आता ड्रॅगन फ्रूट ज्यूस प्लांट सुरू करण्याच्याही तयारीत आहेत.

 

ॲग्रोवर्ल्ड एक्स्पो (जळगाव, पिंपळगाव)

 

 

वयाच्या 65 व्या वर्षी, जेव्हा बहुतेक लोक सक्रिय नोकरी-व्यवसायातून निवृत्त होतात, त्या वयात रीवा सूद यांनी हिमाचल प्रदेशातील उना येथील 30 एकर नापीक जमीन औषधी वनस्पतींच्या हिरव्यागार शेतात बदलली आहे. भारतभरातील शेतकरी, औषध निर्माते आणि कृषी विद्यापीठांना त्या रोपटे, कोरडी मुळे, पावडर आणि अर्क पुरवतात. या औषधी वनस्पती विक्रीतून त्या दरवर्षी 50 लाख रुपये कमावत आहेत..

सामाजिक कार्य ते सेंद्रिय शेती आणि कृषी उद्योजकतेपर्यंतचा जा प्रवास काही एका रात्रीतला नाही. रीवा यांचे पती डॉ. राजीव सूद हे आरएमएल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असताना 2012 मध्ये कर्करोग झाल्याचे निदान झाले. या आजाराचे कारण रसायनयुक्त अन्न असल्याचे लक्षात आल्याने, रीवा यांनी स्वतः सेंद्रिय शेतीद्वारे निरोगी जीवनमान राखण्याचा निर्णय घेतला.

 

सर्पगंधा आणि मोरिंगा
सर्पगंधाची झाडे (डावीकडे) आणि मोरिंगा पाने (उजवीकडे) सुकविण्यासाठी गोळा केली आहेत.

 

70 एकर जमीन घेतली विकत

डॉ. राजीव यांची केमोथेरपी पूर्ण करत असताना, रीवा यांनी उना येथील बेहार जसवान पंचायतीमधील गुंघराळा, अक्रोट आणि बेहार बिथल या तीन गावांमध्ये पसरलेली 70 एकर जमीन विकत घेतली. नापीक आणि योग्य रस्ता नसलेली दुर्गम भागातील जमीन असल्यामुळे ती नाममात्र दरात उपलब्ध झाली. असमान, मुरमाड आणि कोरडवाहू जमिनीला स्थानिक भाषेत ‘खुद’ किंवा गुड फॉर नथिंग जमीन म्हटले जाते.

रीवा सूद यांना विश्वास होता, की कोणत्याही नापीक जमिनीला सेंद्रिय पद्धतींनी उत्पादनक्षम बनवता येऊ शकते. शेण, गोमूत्र आणि इतर नैसर्गिक सेंद्रिय खतांचा वापर करून आपण कोणत्याही जमिनीला उत्पादनक्षम करू शकतो, हे सूद यांनी दाखवून दिले. तीन दशकांहून अधिक काळ महिला सक्षमीकरणासाठी काम करताना त्यांना हिमाचलमधील शेती, भौगोलिक परिस्थिती याची चांगलीच जाण आली होती.

रीवा यांच्यासाठी त्या मुरमाड जमिनीचे दोन फायदे होते – एक, रसायनाचा एक थेंब देखील वापरला गेला नव्हता. आणि दोन, स्थानिक हवा, माती किंवा पाणी प्रदूषित करण्यासाठी आजूबाजूला कोणताही कारखाना नव्हता. हा परिसर जवळपास जंगली असल्याने तेथे प्लास्टिकचे प्रदूषणही नव्हते.

 

 

 

औषधी वनस्पतींसह ड्रॅगन फळाचे आंतरपीक

रीवा यांनी नापीक जमिनीचे सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांना काही औषधी वनस्पती जसे की सर्पगंधा (राऊवोल्फिया सर्पेन्टिना), शतावरी (शतावरी रेसमोसस), वासा (अधाटोडा वासिका) आणि वैजयंती (एक सुगंधी औषधी वनस्पती) शेतात आधीच उगवलेली दिसली. त्यामुळे त्यांना हे जाणवले, की त्या जमिनीत औषधी वनस्पतींची लागवड होऊ शकते. जवळजवळ जंगलातच ती जमीन असल्याने तेथे निवडुंगाची झाडेही भरपूर होती. त्यामुळे निवडुंग प्रकारातूनही काहीतरी लागवड होऊ शकते, हेही रीवा यांना जाणवले. त्यानंतर त्यांनी ड्रॅगन फ्रूटच्या शेतीचा अभ्यास सुरू केला. तेही कॅक्टस वर्गीय फळ आहे. याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी रीवा सूद यांनी महाराष्ट्रात अनेक शेतांना भेटी दिल्या, त्यांनी अनेक शेतकऱ्यांशी चर्चा केली.

रीवा सांगतात, “तो महाराष्ट्र प्रवास हा टर्निंग पॉइंट ठरला आणि मी ड्रॅगन फळांसह औषधी वनस्पतींचे आंतरपीक घेण्याचे फायनल केले.”

 

नापीक जमीन शेतीयोग्य बनवली

जमीन लागवडीसाठी योग्य बनवणे, हे पहिले आव्हान होते. नैसर्गिक स्थिती टिकवून ठेवावी म्हणून रीवा यांनी जमिनीचा ग्रेडियंट बदलण्याचा आजिबात प्रयत्न केला नाही. त्या सध्या सेंद्रिय शेतीसाठी 30 एकर जमीन वापरत आहेत. त्या सांगतात, “नैसर्गिक वनस्पती, जीवजंतू आणि जमिनीच्या संरचनेला त्रास न देणे हे माझे उद्दिष्ट होते. आम्ही शेतजमीन सपाटही केली नाही. आम्ही काही पगडंड्या (पायवाटा) आणि काही मोटारीयोग्य रस्ते आणि लहान सपाट जागा बनवल्या.”

 

हमीरपूर येथे एका कार्यक्रमात रीवा सूद.

 

जमीन सुपीक करण्यासाठी शेण, मूत्राचा वापर

डोंगराळ, खडकाळ, नापीक जमीन सुपीक करण्यासाठी शेण, आणि मूत्र यांचा वापर करणे आवश्यक होते. रीवा सूद यांनी त्यासाठी भाकड गायी दत्तक घेतल्या. दूध देणे बंद केल्यानंतर या गायींना रानात सोडून दिले गेले होते. त्यांनी या गायींसाठी शेड बनवले, त्यांना नैसर्गिकरीत्या उगवलेले गवत खायला दिले. तिथल्या मजुरांना शेण व मूत्र गोळा करून खत तयार करण्याचे प्रशिक्षण दिले गेले. ते हे सेंद्रिय खत जमिनीत टाकत राहिले आणि लवकरच शेतजमीन लागवडीसाठी उत्पादक बनली.

रीवा यांनी सर्पगंधा, ड्रमस्टिक (मोरिंगा), अश्वगंधा (विथानिया सोम्निफेरा), स्टीव्हिया, कलमेघ (अँड्रोग्राफिस पॅनिक्युलाटा), व्हेटिव्हर गवत, हळद, तुळशी आणि इतर औषधी वनस्पतींचे उत्तम दर्जाचे बियाणे भारतातील सर्वोत्तम कृषी विद्यापीठांकडून खरेदी केले. या उत्तम बियाण्याची त्यांनी आपल्या शेतात लागवड केली 2018-19 मध्ये पिकांची पहिली खेप कापणीसाठी तयार झाली होती.

 

औषधी वनस्पतींचा व्यवसाय

बहुतेक औषधी आणि सुगंधी वनस्पती (MAP) लागवडीनंतर सहा महिन्यांनी कापणीसाठी तयार असतात. सर्पगंधा आणि शतावरी सारख्या काही वनस्पती मात्र लागवड केल्यानंतर किमान अडीच वर्षांनंतर तयार होतात.

अश्वगंधा 160 ते 180 दिवसांत उत्पन्न देण्यास सुरुवात करते. पाने सुकल्यावर त्याची कापणी केली जाते. बेरी त्यांचा रंग लाल-नारिंगी रंगात बदलतात. मुळांना इजा न करता संपूर्ण झाड उपटून टाकले जाते. ते वेगवेगळे केले जाते, त्याचे लहान-लहान तुकडे केले जातात आणि वाळवले जातात. बिया मिळविण्यासाठी बेरी स्वतंत्रपणे वाळवल्या जातात.

शतावरीच्या बाबतीत, प्रत्यारोपणानंतर 25-30 महिन्यांनी मुळे परिपक्व होतात. बियाणे पिकल्यानंतर मार्च ते मे दरम्यान काढणी केली जाते. वाळलेली मुळे, पावडर आणि अर्क यांचा वैद्यकीय फॉर्म्युलेशनमध्ये मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो.

 

अन्य नेहमीच्या पिकांच्या तुलनेत चार पट उत्पन्न

औषधी वनस्पतींपासून मिळणारे उत्पन्न हे गव्हापासून शेतकऱ्याला मिळणाऱ्या कमाईच्या चारपट आहे. उदाहरणार्थ, अश्वगंधा लागवडीत 30,000 रुपये प्रति एकर गुंतवणूक केल्यास, एक शेतकरी सुमारे 3 लाख रुपये प्रति एकर कमवू शकतो.

 

शेतात ताकाची फवारणी

शेण आणि गोमूत्र-आधारित निविष्ठांव्यतिरिक्त, रीवा सूद यांच्या शेतात गांडूळ खत देखील तयार केले जाते. परिसरातील बरेचसे स्थानिक शेतकरी व दुग्ध उत्पादक ताक फेकून देतात. रीवा ते त्यांच्याकडून काही मोबदला देऊन विकत घेतात आणि शेतात फवारणीसाठी वापरतात. औषधी वनस्पतींचे फार्म असल्याने, नैसर्गिक कीटकनाशके तयार करण्यासाठी हळद, कडुलिंब आणि कढीपत्ता देखील वापरला जातो. बाहेरून काहीही विकत घेतले जात नाही आणि सर्व काही शेतात तयार केले जाते.

 

दीड एकरात औषधी वनस्पती नर्सरी

सध्या लागवडीखाली असलेल्या 30 एकरांपैकी पॉलिहाऊसमधील विविध भूभागांवर 1.5 एकरांवर सर्पगंधा, मोरिंगा (ड्रमस्टिक), अश्वगंधा आणि काळमेघ यांसारख्या औषधी वनस्पतींची रोपवाटिका उभारली आहे. “सुमारे आठ ते दहा मजूर या रोपवाटिकेत काम करतात, रोपे तयार करतात आणि त्यांची काळजी घेतात. राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ (NMPB), नाबार्ड आणि इतर सरकारी योजनांद्वारे नर्सरीशी संपर्क करणार्‍या शेतकर्‍यांना अनुदानित दराने रोपे विकली जातात.

नर्सरीतील रोपांचा मृत्यू दर 3 टक्क्यांपेक्षा कमी आहे, परिणामी शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत फायदेशीर व्यवसाय आहे. सर्पगंधाचे रोपटे 5 रुपये प्रति नग विकले जाते तर सरकारी योजनांद्वारे ड्रॅगन फ्रूटच्या रोपाची किंमत आकार आणि वयानुसार 47 ते 70 रुपये आहे. अनुदानाशिवाय व्यावसायिक वापरासाठी खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना रोपे 90 ते 180 रुपये प्रति नग या दराने विकली जातात.

या उच्च-मूल्याच्या औषधी आणि सुगंधी वनस्पतींना कमी खतांची आवश्यकता असते आणि परिणामी निसर्गाशी समतोल राखून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळते. रोपे, कोरडी मुळे, पावडर आणि अर्क विक्री असे गेल्या वर्षी औषधी वनस्पतींमधून 50 लाख रुपये उत्पन्न मिळाल्याचे रीवा सूद यांनी “ॲग्रोवर्ल्ड”ला सांगितले.

 

ड्रॅगन फ्रूट फ्लॉवर आणि तयार फळे
ड्रॅगन फळ फुलांच्या टप्प्यावर (डावीकडे) आणि फळधारणा (उजवीकडे).

 

 

हिमाचलमध्ये प्रथमच ड्रॅगन फ्रूटमध्ये आंतरपीक लागवड

रीवा सूद यांना ड्रॅगन फ्रूट आणि इतर लागवडीतून इतर आणखी 20 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यांनी थरांमध्ये वृक्षारोपण केले आहे. सीमेवर ड्रॅगन फ्रूट आणि मोरिंगा, त्यानंतर हळद आणि अंजीर, पेरू, कमरख आणि सफरचंद यांसारखी इतर फळझाडे आहेत. ड्रॅगन फ्रूटच्या दोन रोपांमध्ये 5 फूट अंतर आहे. त्यामुळे जमिनीचा सर्वोत्तम वापर करण्यासाठी इतर औषधी वनस्पतींची आंतर लागवड करण्याचा विचार केला गेला होता. तो चांगलाच यशस्वी झाला.

सूद यांच्या शेतात सध्या 30,000 ड्रॅगन फ्रूट रोपे आहेत आणि त्यापैकी काही फळधारणेच्या टप्प्यावर आहेत. त्यांना ड्रॅगन फ्रूटची एकूण एक लाख रोपे लावायची आहेत. निवडुंग वर्गातीलाच नीलगाय (ब्ल्यूबक) घेण्याचे त्यांनी टाळले, कारण त्यामुळे स्थानिक पिकांना नुकसान होते

दुसरा एक फायदा असा आहे, की ड्रॅगन फळाला उन्हाळ्यात आठवड्यातून दोनदा आणि हिवाळ्यात आठवड्यातून एकदा पाणी द्यावे लागते. रीवा सूद यांनी ड्रॅगन फ्रूटच्या अमेरिकन ब्युटी प्रकाराची लागवड केली आहे. ही फळे अधिक रसाळ आणि गोड असतात.

 

 

Nirmal Seeds

 

जागतिक बँकेने दिले अनुदान; 2 कोटींचा ड्रॅगन फ्रूट ज्यूस कारखाना

रीवा यांच्या शेताला भेट दिल्यानंतर जागतिक बँकेने उना येथे ड्रॅगन फ्रूट ज्यूस कारखाना उभारण्याच्या प्रकल्पासाठी अनुदान दिले आहे. आता 2 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने कारखाना सुरू करण्याचे काम सुरू झाले आहे. यातील 35 टक्के जागतिक बँक देत आहे तर बाकीचे त्यांचे स्वतःचे पैसे आणि बँकेचे कर्ज आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर, हा महिला उद्योजकाने स्थापन केलेली भारतातील पहिली ड्रॅगन फ्रूट ज्यूस कारखाना असेल.

एके काळी नापीक असलेली जमीन आज प्रमुख पर्यावरण पर्यटन स्थळ बनले आहे. देशभरातील विद्यार्थी, शेतकरी आणि शास्त्रज्ञ या ठिकाणी भेट देतात. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपासून ते विद्यापीठातील विद्यार्थ्यांपर्यंत, प्रत्येकाला सेंद्रिय आणि नैसर्गिक जीवनपद्धतीचा अवलंब करण्यास रीवा सूद सांगतात. प्रत्येक स्वरूपातील रसायनांचा वापर थांबवण्याचा त्या आग्रह धरतात.

 

 

Jain Irrigation

 

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • 65 वर्षांच्या प्रयोगशील शेतकरी; औषधी वनस्पतींच्या शेतीतून वर्षाला 50 लाखांची कमाई
  • टेरेस गार्डनिंगमधून सेंद्रिय भाजीपाल्याचे उत्पादन

 

 

Share this:

  • Facebook
  • X
Tags: औषधी वनस्पतीरीवा सूदसेंद्रिय शेतीहिमाचल प्रदेश
Previous Post

टेरेस गार्डनिंगमधून सेंद्रिय भाजीपाल्याचे उत्पादन

Next Post

सोयाबीनवर रोगाचा प्रादुर्भाव, तातडीने पिकांचे पंचनामे करा

Next Post
सोयाबीन

सोयाबीनवर रोगाचा प्रादुर्भाव, तातडीने पिकांचे पंचनामे करा

ताज्या बातम्या

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025 मध्ये ‘कॅन बायोसिस’ ला ज्युरी विशेष पुरस्कार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 30, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 25, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

AI

AI, ड्रोनचा शेतीत वापर काळाची गरज – अजित पवार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2025
0

मका एकरी 75 क्विंटल उत्पादन

खरीप मका एकरी 75 क्विंटल उत्पादनाचा फॉर्मुला जाणून घ्या अ‍ॅग्रोवर्ल्डच्या नाशकातील 03 मे (शनिवारी) च्या कार्यशाळेत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा

अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा 28 एप्रिल (सोमवारी) रोजी उपलब्ध…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2025
0

तांत्रिक

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 25, 2025
0

जगाच्या पाठीवर

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.