• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

कमी पाण्यात सिताफळाचे उत्पादन

Team Agroworld by Team Agroworld
May 13, 2019
in यशोगाथा
0
कमी पाण्यात सिताफळाचे उत्पादन
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT


वाणेवाडीतील गरदडे बंधूचा सिताफळ उत्पादनात हातखंडा

स्टोरी आऊटलाईन…

  • कमी पाण्यात हमखास उत्पादन देणारे सुपर गोल्डन सिताफळ वाण.
  • एकरी 400 झाडापासून दोन लाखा पेक्षा अधिक उत्पन्न देते.
  • लागवडीपासून तिसर्‍याच वर्षी उत्पादन सुरू.
  • उत्पादन खर्चाच्या तुलनेत सर्वाधिक किफायतशीर फळपीक.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालूक्यातील काही भाग मध्यम ते हलक्या मुरमाड प्रतीचा आहे. या भागातील अनेक शेतकरी कमी पाण्यावर येणार्‍या सिताफळ लागवडीकडे वळाले आहेत. थोड्या पाण्यात सिताफळ बागेचे संगोपन होवून ती हमखास आर्थिक उत्पन्न मिळवून देत आहे. परिसरात फळांनी लदबदलेल्या सिताफळ बागा वाणेवाडीच्या बापूराव आणि लक्ष्मण गरदडे या भावंडांना देखील खुणावू लागल्या. त्यांनी आपल्या शेतीतही 5 एकरात सिताफळ झाडे लागवड केली. गत 5 वर्षांपासून दर्जेदार सिताफळाचे विक्रमी उत्पादन घेवू लागले आहेत.

वाणेवाडी शिवारात बापूराव गरदड यांची 10 एकर जमीन आहे. कृषी पदवीकेचे शिक्षण त्यांची घेतले आहे. या गावातील जमीन हलकी मुरमाड आहे. यामुळे सिताफळ पिकासाठी अनुकुल अशी येथील जमीन आहे. गरदड यांनी पारंपरिक पिकाला फाटा देत 7 एकरावर टप्याटप्याने सिताफळ बाग उभी केली आहे. यापूर्वी ते आपल्या शेतीत तूर, मूग, उडिद, ज्वारी, सोयाबीन ही पीके घ्यायचे. पण या पिकांच्या उत्पादनातून खर्च जाता फारसे काही उत्पन्न शिल्लक राहत नव्हते. पश्चिम महाराष्ट्रातील शेतशिवारात नव्याने विकसित झालेली सुपर गोल्डन ही सिताफळाची बाग हजारो एकरावरवर उभी असलेली पाहून गरदडे यांनी देखील सिताफळ लागवड करण्याचे ठरवले.

सिताफळ लागवड
सुरवातीला वर्ष 2010 मध्ये 5 एकरात 14 फूट रुंद आणि 8 फूट लांबी अंतरावर लागवडी केली. यातील काही रोपे हनुमान वाणाची आहेत. यानंतर वर्ष 2016 ला 14 बाय 4 फूट अंतरावर 5 एकरात लागवड करण्यात आली. काही सिताफळ रोपे इस्त्राईल पद्धतीले लावली आहेत. या बागेला सिंचनासाठी शेतीत बोअरवेल, विहीर व एक 30 बाय 30 मीटर आकाराचे शेततळे केले आहे. या शेततळ्यात ते बोअरवेल व विहिरीचे पाणी साठवून टंचाईच्या काळात ठिबकद्वारे झाडांना देतात.

सिताफळ बागेचे संगोपन
सिताफळ बागेच्या झाडांची चांगली वाढ होण्यासाठी झाडाच्या बुंध्याजवळ मुळाशी दरवर्षी खड्डे खोदून काही प्रमाणात शेणखत भरतात. यामुळे झाडांची चांगली वाढ होते. झाडे तीन वर्षाची होईपर्यंत चार दिवसाआड ठिबकने पाणी दिले. फळावर मिलीबगचा पादुर्भाव रोखण्यासाठी 100 गॅ्रम डेन्टसू हे किटनाशक औषध 300 लिटर पाण्यात द्रावण करून फळावर फवारले जाते. वेळोवेळी झाडाच्या खालच्या फांद्यांची छाटणी करतात. बागेत अंतरमशागत करून तृणमुक्ती केली जाते. झाडांना मृग नक्षत्राच्या पहिल्या पाऊस पडल्यानंतर बहार धरण्याकरीता फेब्रुवारी महिन्यानंतर पाणी देणे बंद करतात. एप्रील नंतर झाडांची पूर्ण पानगळ होवून मे मध्ये झाडे वाळल्यासारखी होत केवळ फांद्या काड्याच दिसतात. झाड वाळल्यासारखेच दिसते परंतू मृग नक्षत्राचा पहिला पाऊस पडताच ते हिरवे होवून कोवळ्या पानाच्या अंकूरासहच फुले लगडतात. सिताफळ हे अतिशय कमी पाण्यावर हमखास येणारे फळ पीक आहे.

तिसर्‍या वर्षीच उत्पादन
सुपर गोल्डन या सिताफळ वाणाच्या झाडांना लागवडीपासून तिसर्‍या वर्षीच फळे लगडण्यास सुरुवात होते. या वाणाची सिताफळे जवळपास सव्वा किलो वजनाची होतात. दिसायला आकर्षक, बिया कमी, गर अधिक, चवीला अतिशय गोड, टिकावू दर्जा, प्रक्रियेसाठी अति उत्तम, तोडणीपासून पाच सहा दिवसाला पिकणारे फळ, पिकल्यानंतरही कातडे जाड असल्याने तीन ते चार दिवस फळ न फुटता टिकून राहते. यामुळे निर्याती योग्य फळे आहेत. झाडाच्या व फांद्यांच्या विस्तारानुसार अधिक उत्पादन देणारे वाण आहे. गरदडे यांना लागवडीनंतर तिसर्‍याच वर्षी (2013) 5 एकरातील बागेपासून 10 टन उत्पादन झाले. झाडे लहान असल्यामुळे उत्पादन कमी आले. यानंतर झाडांचा आणि फांद्यांचा विस्तार वाढल्याने फळांचे उत्पादन वाढत गेले. 2013 ते 2018 या 6 वर्षाच्या कालावधीत त्यांना भरघोस उत्पादन मिळाले. या काळात खर्च जाता सिताफळांच्या विक्रीतून जवळपास 12 लाख रुपये निव्वळ आर्थिक उत्पन्न मिळाल्याचे ते सांगतात. या पूढे नवीन बागेपासून देखील उत्पादन सुरू होणार आहे.

फळांची काढणी
सिताफळ झाडांना जून महिन्यातील मृग नक्षत्राच्या मोठ्या पावसानंतर काही दिवसात नवीन पालवीने ते हिरवेगर्द होते. त्याच वेळी फुलेही लगडतात. पुढे योग्य व्यस्थापनानंतर ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात फळे परिपक्व झाल्यानंतर फळांची डोळा सांधे लालसर होवू लागताच फळांच्या काढणीस सुरवात केली जाते. ही फळे ते घरच्या सदस्यासह काही मजूराकरवी दररोज तोडणी करून काढली जातात. त्यानंतर फळांची प्रतवारी करून ती कागदी जाड पुठ्याच्या बॉक्समध्ये पॅक करतात. सर्व पॅकिंग सिताफळ बॉक्स विक्रीसाठी पाठवले जातात. फळ काढणीचे काम सतत महिनाभर चालते.

विक्रीचे व्यवस्थापन
सुरवातीच्या वर्षी त्यांनी काढणी केलेली परिपक्व सिताफळे बार्शी येथील बाजारात विकले. त्यावेळी दर कमी मिळाला. सुरवात असल्याने बाजारपेठेची माहिती नव्हती. हळूहळू अनुभव वाढल्यामुळे दुसर्‍या वर्षापासून उत्पादित फळे त्यांनी मुंबई येथील वाशी मार्केटमध्ये नेवून विक्री करण्यास सुरवात केली. वाशी येथील फळबाजारात सिताफळाला चांगली मागणी असल्यामुळे तिथे फळाच्या दर्जानूसार दर मिळतो. यामुळे अधिक करून ते वाशी येथेच दरवर्षी फळांची विक्री करतात. कधी थेट बागेतून व्यापारीही खरेदी करतात.

रोपवाटिकेची निर्मिती
सिताफळ बागेच्या उत्पादनाबरोबरच त्यांच्याकडे रोपाविषयी शेतकर्‍याकडून विचारणा होवू लागली. त्यांनी रोपे निर्मिती सबंधीची परिपूर्ण माहिती घेत आपल्या शेतीत फळबागे लगतच सिताफळ रोपवाटिका (वर्ष 2015) सुरू केली. शेती कामात त्यांना पत्नी वर्षाताई, वडील मारुती गरदडे, बंधू लक्ष्मणे, भावजी सुधीर गायकवाड, विक्रम यादव हे मदत करतात. त्यांच्या रोपावाटिकेत सिताफळाचे सुपर गोल्डन व हनुमान या वाणाच्या रोपांची निर्मिती केली जाते. याशिवाय केशर आणि हापूस आंबा, सरदार, थाई, व्हीएनआर ही पेरू रोपे, अ‍ॅपल बोर, नारळ बाणवली, चिकू, लिंबू इत्यादी रोपेही तयार करतात. ही रोपे ते शेतकर्‍यांना ऑर्डर प्रमाणे पुरवतात. ठिकठिकाणच्या कृषी प्रर्दशनात स्टॉल लावून रोपांची विक्री करतात. बापूराव आणि लक्ष्मण गरदडे हे दोघे भावंडं सिताफळ उत्पादक शेतकर्‍यांना वेळोवेळी मार्गदर्शनही करतात.

मिळालेले पुरस्कार
गरदडे बंधूची सिताफळ बाग आणि दर्जेदार रोपे निर्मितीची प्रेरणादायी फळबाग शेती पाहून त्यांना महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय नागरी कृषीरत्न पुरस्कार (वर्ष 2017) मिळाला आहे. ‘अ‍ॅग्रोवर्ल्ड’तर्फे (वर्ष 2018) धुळे येथील कृषी प्रर्दशनात राज्यस्तरीय कृषी गौरव पूरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.


प्रतिक्रिया
अल्पशा पाण्यावर येणारे फळपीक
सिताफळ हे फळपीक कमी पाण्यात, कमी खर्चात, कमी मनुष्यबळ लागणारे आणि हमखास उत्पादन देणारे पीक आहे. फळाच्या विक्रीतून लक्षावधी रुपये मिळतात. हे हे पीक अल्पशा पाण्यावर तग धरुन राहते. यास खर्चही अल्पच आहे. शेतकर्‍यांनी एक एकर तरी सिताफळ बाग लागवड करून उत्पादनाचा अनुभव घेवून पहावा. बापूराव मारुती गरदडे लक्ष्मण मारुती गरदडे
रा. वाणेवाडी, ता.बार्शी, जि.सोलापूर मो.नं. 9922044946.

10 एकरात 11 टन उत्पादन
मी वर्ष 2015 ला 3 हजार 200 सुपर गोल्डन वाणाचे सिताफळ रोपे खरेदी करून ती 12 बाय 10 फूट अंतरावर 10 एकरात लागवड केली. संपूर्ण 10 एकर बागेला ठिबक सिंचन संच बसवल्याने पाणी कमी लागते. झाडाच्या वाढीकरीता शेणखत, डिएपी, सुपर फॉस्फेट ही खतमात्रा योग्य त्या प्रमाणात दिली जाते. फळावरील मिलीबगच्या नियंत्रणासाठी नूऑन व अ‍ॅपलाड हे किटनाशक औषध फवारतो. यंदाच्या हंगामात पहिल्याच वर्षी 10 एकरातील सिताफळ झांडांना भरपूर फळे लगडली होती. त्याच्या तोडणीतून 11 टनाचे उत्पादन झाले.


राजेंद्र निंबाजी भामरे,
रा. काळगाव, ता.साक्री,जि धुळे.
मो.नं. 9834145625, 9923042765.

सिताफळाची 14 एकरात लागवड
आज घडीला माझ्या शेतीत 14 एकर सिताफळ बाग उभी आहे. वर्ष 2016 ला गरदडेंच्या रोपवाटिकेतून सुपर गोल्डन सिताफळाची रोपे आणून ती 16 बाय 8 फूटावर 6 एकरावर लागवड केली. त्यानंतर 2017 ला 6 एकर आणि या वर्षी 2018 साली 2 एकर अशी 14 एकरावर लागवड आहे. संपूर्ण बागेला ठिबक केले असून विहीर व बोअरवेलचे पाणी देतो. झाडांच्या व्यवस्थापनासाठी माजलगावचे सिताफळ उत्पादक धैर्यशील सोळंके, बापूराव गरदडे यांचे नेहमी मार्गदर्शन मिळते.
अर्जून पांडुरंग शिंदे,
रा. भेंडटाकळी, ता.गेवराई, जि.बीड.
मो.नं. 7499989124

बालानगर सिताफळ लागवड
वर्ष 2016 ला 3 एकर सिताफळ लागवड केले आहेत. पाणी देण्यासाठी 30 बाय 30 मीटर अकाराचे शेततळे खोदले आहे. तळ्यातील पाणी ठिबकने झाडास दिले जाते. बाळानगर सिताळची पूर्वी लागवड आहे. त्याचे चांगले उत्पादन होवून एकरी अडीच लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. त्याच बरोबर माझ्या शेतीत पेरु, डळिंबाचीही बाग आहे. त्यापासून भरघोष उत्पादन होत लक्षावधी रुपये उत्पन्न येते. सुपर गोल्डन सिताफळ पुढील हंगामात फळे देईल.

  • काकासाहेब वाघ,
    रा. पिंपळगाव उजैनी, जि.अ.नगर. मो.नं. 9960989196.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: बार्शीसिताफळसुपर गोल्डन सिताफळ वाणहनुमान वाण
Previous Post

शेततळ्यामुळे बहरल्या फळबागा

Next Post

निर्यातक्षम बटेरपालनाचा व्यवसाय

Next Post
निर्यातक्षम बटेरपालनाचा व्यवसाय

निर्यातक्षम बटेरपालनाचा व्यवसाय

ताज्या बातम्या

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा 2)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

आज 20 ऑगस्ट 2025

आज 20 ऑगस्ट 2025 : जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अकोला, बुलढाणा, छ. संभाजीनगर, जालनाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

आज 20 ऑगस्ट 2025 : महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास...??

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास…??

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

दुग्धव्यवसायासाठी अनुदान

दुग्धव्यवसायासाठी अनुदान… वैयक्तिक ₹ 10 लाख तर सामूहिक ₹ 3 कोटींपर्यंत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 19, 2025
0

बंगालच्या उपसागरात

बंगालच्या उपसागरात दोन कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रभर कोसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 18, 2025
0

पहा राज्यातील जिल्हानिहाय पावसाची स्थिती

पहा राज्यातील जिल्हानिहाय पावसाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा 2)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.