नंदुरबार : CMV Disease.. यंदाच्या वर्षी केळीला चांगला भाव मिळत देखील असून एका शेतकऱ्याला आपल्या तब्बल 5 एकर केळीच्या बागेवर रोटाव्हेटर फिरवण्याची नामुष्की आली आहे. होय.. ! नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील केळी पिकावर सीएमव्ही रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांवर कष्टाने जोपासलेल्या केळीच्या बागा नष्ट करण्याची वेळ आली आहे. तर काही शेतकऱ्यांनी आपल्या केळीच्या बागांमध्ये जनावरे चारण्यासाठी सोडली आहेत. खेडदिगर परिसरात याचा सर्वाधिक प्रादुर्भाव देखील दिसून येत आहे.
5 एकर केळीच्या बागेवर फिरवला रोटाव्हेटर
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचा तालुका म्हणून ओळखला जातो. यावर्षी केळी पिकांवर सीएमव्ही रोगाचा प्रादुर्भाव झाला असून केळीच्या बागा काढण्याशिवाय दुसरा पर्याय शेतकऱ्यांसमोर नसून खेडदिगर येथील शेतकरी सुनिल पाटील यांनी आपल्या पाच एकर क्षेत्रावरील केळीच्या बागेवर रोटाव्हेटर फिरवला आहे. त्यांनी केळीच्या बागेसाठी आतापर्यंत केलेला साडेपाच लाखांचा खर्च वाया गेल्यानं ते कर्जबाजारी झाले आहेत. शासनानं केळी उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
एकात्मिक फलोत्पादन अभियान : वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण योजनेसाठी 50% अनुदान ; असा घ्या लाभ
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/vniBFTSBoj4
केळीच्या बागांमध्ये जनावरं चारण्यासाठी सोडल्याचं भीषण वास्तव
शहादा तालुक्याच्या आसपासच्या परिसरातील काही शेतकऱ्यांनी आपल्या केळीच्या बागांमध्ये जनावरं चारण्यासाठी सोडल्याचं भीषण वास्तव दिसून येत आहे. संबंधित रोप पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी, सरकारच्या कृषी विभागनं या रोगावर संशोधन करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून पीक वाचवण्यासाठी पुढे यावं, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शासकीय संशोधन केंद्र सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी
राज्यातील एकूण क्षेत्राच्या 80 टक्के केळी उत्पादन खानदेशात घेतलं जातं. केळींवर दरवर्षी विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असल्यानं द्राक्ष, हळद या पिकांप्रमाणे केळी पिकासाठीही शासकीय संशोधन केंद्र सुरू करण्याची मागणीही यावेळी एका वृत्तसंस्थेशी बोलताना शेतकऱ्यांनी केली आहे. तर सीएमव्हींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनानं आर्थिक सहाय्य करण्याची गरज असल्याचंही मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलं आहे.
सीएमव्ही (CMV Disease) रोगाची लक्षणं काय?
हरित द्रव्य (इन्फेक्शियस क्लोरोसिस) लोप पावणं हे मुख्य लक्षणं आहे.
पानांवर पिवळसर रेषा, सोनेरी पट्टे किंवा अनियमित पट्टे दिसून येतात.
पोंगे किंवा पोंग्याच्या जवळील पानं कुजतात.
झाडांची वाढ खुंटून कालांतरानं झाड मरतं
या रोगाचा प्राथमिक प्रादुर्भाव कंदामार्फत तर दुय्यम प्रादुर्भाव मावा किडीमार्फत होतो.
रोगाच्या प्रादुर्भावाची कारणे
-CMV रोग ऍफिड्स, थ्रिप्स, व्हाईटफ्लाय, माश्या इत्यादींमुळे होणा-या कीटकांद्वारे गवत / वनस्पतीपासून रोपापर्यंत पसरतो.
– सीएमव्ही रोगाच्या नियंत्रणासाठी सर्वप्रथम रोगग्रस्त केळीचे झाड खोदून नष्ट करावे.
– केळीची बाग तणमुक्त ठेवावी – बागेतील किंवा शेतातील बांधातील सर्व तण / तण काढून टाका.
– मिरची यांसारखी पिके/भाजीपाला यांसारखी पिके केळीच्या बागेत किंवा फळबागांमध्ये कोणत्याही वेलीच्या पिकासह लावू नका (काकडी, वाल, दोडकी, दुधीभोळा गंगाफळ, चवळी, कारले इ.).
कसे कराल नियंत्रण ?
या रोगाच्या नियंत्रणासाठी केळीच्या झाडावर ६-७ दिवसांच्या अंतराने अशा प्रकारे फवारणी करावी, बागेच्या कुंपणावरही फवारणी करावी. (शोषक कीटकांच्या नियंत्रणासाठी उपलब्ध कीटकनाशके, कीटकनाशक + एसीफेट + कडुनिंब तेल वापरा)
उदाहरणार्थ 1) Imidacloprid (Imida / Confidor) 15 ml किंवा
2 – Acetamiprid (Tatamanic) 8 ग्रॅम – किंवा
3- थिओमेथॉक्सम 25% (ऑक्टो. रा) 10 ग्रॅम – किंवा
4- प्रोफेनोफॉस 20 मि.ली.
5 – Imidacloprid-70wg (Admir) – 5 g किंवा
6 Fluonicamide (Ulala) – 8 g (किंवा बाजारात उपलब्ध अनेक कंपाऊंड – कीटकनाशके).
यामध्ये एसीफेट – १५ ग्रॅम + निंबोळी तेल ३० मिली प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- Medicinal Plants Nursery : शेतकऱ्यांना पूरक उत्पन्नासाठी फायदेशीर औषधी वनस्पती नर्सरी
- पाण्यात बुडणारी शहरे : आयएमडीची अत्याधुनिक फोरकास्ट यंत्रणा लवकरच! A1 Solution
Comments 1