मुंबई : पुणे, सातारा, रायगड, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांच्या काही भागात गेल्या काही दिवसांत ढगफुटीसदृश्य पाऊस (Cloud Burst) झाला आहे. यात नुकसान झालेल्या नागरिकांना आवश्यक ती मदत तातडीने पुरविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, रायगड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाला आहे. मुख्य सचिवांसह पुणे, सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांनी या अतिवृष्टीची माहिती घेतली असून या पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने आवश्यक ती मदत पुरविण्याच्या सूचनाही शिंदे यांनी दिल्या आहेत.
ढगफुटी सदृश्य पाऊस झालेल्या गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत पोहोचविण्याच्या सूचना देतानाच मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून नुकसानीची आणि मदतकार्याची माहिती घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
‘तण देई धन’ नेमकी संकल्पना काय ?
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/RFlShtyef_4
राज्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस Cloud Burst
राज्यात गेल्या 24 तासात अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला आहे. पुढील शहर, तालुक्यात कमी कालावधीत तुफान पाऊस नोंदविला गेला आहे –
1. नाशिक
2. निफाड
3. सिन्नर
4. येवला
5. बागलाण
6. मालेगाव
7. इगतपुरी
8. राहाता (नगर)
9. पुणे
10. शिरूर
11. सातारा
12. बारामती
13. कोल्हापूर
14. करवीर
15. पन्हाळा
16. आष्टा (सांगली)
17. खानापूर
18. पेण (रायगड)
ढगफुटी होते म्हणजे आभाळ फाटते की नेमके काय होते?
पाण्याचे जेव्हा बाष्पीभवन होते, तेव्हा आकाशात ढगांची निर्मिती होते. हवा गरम झाली आणि आर्द्रता वाढली की या ढगामधील पाण्याचे प्रमाणही वाढते.असे अब्जावधी पाण्याचे थेंब जेव्हा ढगांमध्ये एकत्रित होतात, तेव्हा तुफानी पाऊस कोसळतो. ढगात जमा झालेला हा असा पाऊस अगदी कमी वेळेत बदा-बदा कोसळतो, तेव्हा त्याला ढगफुटी म्हटले जाते. इंग्रजीत याला क्लाऊड बर्स्ट (Cloud Burst) निकषानुसार, ढगफुटी जाहीर करण्यासाठी एका मिनिटात किमान दोन इंचाहून अधिक पाऊस व्हायला हवा असतो.
एका खूप मोठ्या टाकीत आपण पाणी साठवले आहे आणि ती टाकी फुटली, कोसळली किंवा तिचा तळाचा भाग काढून घेतला तर आत साठवलेले सर्व पाणी एकदम खाली रिकामे होईल, तसेच ढगफुटीत होते. हवेतील पाण्याची टाकी जणू फुटून क्षणार्धात भस्सकन खाली जमिनीवर इतकी जाते. हे असे होते म्हणजे आभाळ फाटते आणि लाखो लिटर पाणी खाली कोसळते. बरे हे काही साधे-सुधे नसते तर कित्येक मैल पसरलेल्या ढगातील पाणी एकदम खाली ओतले जाते. त्यात संपूर्ण गाव, शहर उद्ध्वस्त करण्याची ताकद असते.
ढगफुटीचा अंगावर काटा उभा करणारा हा व्हिडिओ पाहा
हा सोबतचा ढगफुटीचा अंगावर काटा उभा करणारा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला त्याच्या तीव्रतेची कल्पना येईल. मैलभर पसरलेल्या आक्राळ-विक्राळ ढगाचा जर बेस काढून घेतला तर खालच्या बाजूच्या भगदाडातून अक्षारश: अब्जावधी गॅलन पाणी क्षणार्धात जमिनीच्या दिशेने कोसळते. आकाशात असलेला पाण्याचा ढग फाटतो आणि क्षणार्धात हा पाण्याचा स्तंभच जमिनीवर आढळतो. त्याचे आकारमान कल्पनेपेक्षा कितीतरी मोठे असू शकते. ढगफुटी होते तेव्हा कोसळणारे पावसाचे थेंब साधे नसतात. नेहमीच्या पाण्याच्या थेंबापेक्षा चार-पाच पट मोठे, किमान 3.5 मिमीहून मोठे असे हे पाण्याचे थेंब असू शकतात.
आकाशात तयार होते चक्रीय स्थिती
कधीकधी ढगांमध्ये वेगाने वर चढणारा हवेचा स्तंभ निर्माण होतो. हा स्तंभ पाण्याच्या थेंबांना घेऊन वरच्या दिशेने जातो. यामुळे आकाशात चक्रीय स्थिती तयार होऊन अनेक ढग एकत्र येतात. अनेक ढग एकत्र आल्यानंतर हवेचा स्तंभ जितक्या वेगाने वरच्या दिशेला गेलेला त्याच्यापेक्षा अधिक वेगान जमिनीच्या दिशेने झेपावतो.
हवामान खात्याच्या स्वयंपूर्णतेवर भर हवा
अलीकडे हवामानात बदल होत आहेत, पावसाचा पॅटर्न बदलत आहे. त्यामुळे वारंवार ढगफुटीसारख्या नैसर्गिक आपत्ती कोसळताना दिसतात. ते टाळण्यासाठी हवामान खात्याच्या स्वयंपूर्ण करण्यावर भर द्यायला हवा. दुसरीकडे, शहरीकरणाच्या नादात सर्रासपणे पाणी निचरा करणाऱ्या नदी-नाले, ओढ्यांवर अतिक्रमण होत आहे. ड्रेनेजची योग्य व्यवस्थाच त्यामुळे उरलेली नाही. निसर्गाचा गळा आवळला जात आहे. डोंगर ओरबाडून नैसर्गिक खनिजसंपदेचा समतोल बिघडवला जात आहे. प्लास्टिकसह इतर कचऱ्याचा अतिरेक, अनधिकृत बांधकाम यामुळे जैवविविधता धोक्यात आली आहे. जोडीला प्रदूषणवाढ, तापमान वाढ होत आहे. निसर्गाचे चक्र बिघडून त्यामुळे अशी संकटे वारंवार येत आहेत आणि भविष्यातही येत राहतील.
जागोजागी डॉप्लर रडार यंत्रणा आवश्यक
नैसर्गिक आपत्तीच्या मुकाबल्यासाठी सरकारी पातळीवर पूर्ण उदासीनता आहे. दिखाव्याचे कार्यक्रम केले जातात. मात्र, डॉप्लर रडारसारखी किमान काही तास आधी, ढगांचा अचूक वेध घेऊन संभाव्य नैसर्गिक संकटाचा अंदाज देणारी यंत्रणा जागोजागी उभारणे आवश्यक आहे. सध्या राज्यात फक्त महाबळेश्वर, मुंबई, नागपूर आणि सोलापूरमध्ये ही यंत्रणा आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातून त्याची सातत्याने मागणी केली जाते. आजवर त्याकडे सर्वच सरकारांनी दुर्लक्ष केले. मात्र, गेल्या काही वर्षातील थोड्या वेळात धबाबा विक्रमी पाऊस होण्याच्या सातत्याने घडणाऱ्या ढगफुटीसारख्या घटना पाहता आता अशा यंत्रणेची तात्काळ आवश्यकता आहे.
उत्तर महाराष्ट्रात चांदवडसारख्या घाटमाथा ठिकाणी डॉप्लर रडार यंत्रणा उभारली गेली, तर नाशिकसह औरंगाबाद आणि नगर जिल्ह्यांना लाभ मिळेल. नंदुरबार, धुळे आणि जळगाव या खानदेश विभागालाही त्यामुळे दिलासा मिळू शकेल. परदेशात दर तासाला शेतकरी व हवामान बुलेटिन जारी केले जाते. तशी धोक्याची पूर्वसूचना देणे अशा यंत्रणांमुळे शक्य होऊ शकते. सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि प्रशासन त्यामुळे आपत्तींचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहू शकाते.
आपणास या बातम्याही वाचायला नक्की आवडेल 👇👇
2. पाऊस दाटलेला; जोरदार पावलांनी; IMD Alert : आणखी 3-4 दिवस राज्यभर मुसळधार
Comments 4