शेतकरी बांधवांसह सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या हिताची ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ही बातमी थोडा वेळ काढून शेवटपर्यंत वाचा. स्वस्तात मिळतो, आकर्षक दिसतो, उग्र वास असतो म्हणून जर तुम्ही भल्या मोठ्ठया पाकळ्यांचा चायनीज लसूण विकत घेत असाल, तर सावधान!
चायनीज लसूण खाणं आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. सिनेटर रिक स्कॉट यांच्या तक्रारीवरून अमेरिकेतील जो बिडेन सरकारनं चीनमध्ये पिकवल्या जाणाऱ्या लसणाच्या अन्न सुरक्षिततेची गुप्त चौकशी केली होती. त्यात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या.
घाणेरड्या मलनिस्सारण सांडपाण्यात चीनी लसणाची लागवड केली जाते, ज्यामध्ये मानवी कचरा असतो. नंतर त्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी हानिकारक क्लोरीन वापरून ब्लीच केलं जातं. चिनी लसणावर मिथाइल ब्रोमाइड असलेल्या बुरशीनाशकानं उपचार केले जातात, ज्यामुळे बुरशीची वाढ सहा महिने थांबते.
नेहमीच्या लसणात असलेलं, रक्तदाब नियंत्रित करणारं, प्रतिकारशक्ती वाढवणारं, नैसर्गिक प्रतिजैविक एलिसिन नावाचं मूलभूत संयुग चायनीज लसणात नसतं. भारतीय लसणाची किंमत जास्त असल्यानं शेजारील नेपाळ आणि बांगलादेशमार्गे चिनी लसणाची भारतात तस्करी होते.
वास्तविक, चीन हा जगातील सर्वात मोठा लसूण उत्पादक देश आहे. तरीही अनेक देशात चिनी लसूण आयात व विक्रीवर बंदी आहे. विशेष म्हणजे भारतातही 2014 पूर्वी चिनी लसणाच्या विक्रीवर बंदी घातली गेली होती.
- शहरी जीवनात हरित सौंदर्य जपणाऱ्या जुईली कलभंडे
- Combine Harvester Subsidy : या योजनेअंतर्गत मिळणार 11 लाखांचे अनुदान !
- एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !
- आयुष्यातील अंधारातून प्रकाशाकडे ; संगीता पिंगळे यांच्या जिद्दीची कथा
- हळद साठवणूक प्रक्रिया
- हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !
- Farmer ID : फार्मर आयडी नसल्यास या योजनांचा मिळणार नाही लाभ
- काळी मिरी लागवड व्यवस्थापन
- या फुलशेतीची लागवड करा अन् मिळवा भरघोस उत्पादन
- तुम्हाला अझोला शेती माहितीये का ? ; वाचा अझोलाचे फायदे !