पूर्वजा कुमावत
भारतातील महत्त्वाचे व बहुउपयोगी मसाला पीक म्हणजेच हळद. हळदीचा उपयोग आपण औषधी, सौंदर्य आणि जैविक कीटकनाशकांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. यामध्ये रसायन व अँटिऑक्सिडन्स आहे. हळदीचा पीक हे साधारण 8 ते 9 महिन्याचे असते. तसेच हळव्या जातींना तयार होण्यासाठी 6 ते 7 महिने लागतात व निमगरव्या जाती या 7 ते 8 महिन्यात तयार होतात.
हळद काढणी
हलक्या जमिनीतील पिकाच्या कालावधी हा पूर्ण होत्या वेळी 80 ते 90 टक्के पाणी वाळलेले असतात व मध्यम व भारी जमिनीमध्ये 60 ते 70 टक्के पाणी वाढलेले असतात. हे या पिकाचे परिपक्व होण्याचे मुख्य लक्ष आहेत. हळद काढणीच्या अगोदर 15 ते 30 दिवस पाणी देणे बंद करावे व हे पाणी थोड्या थोड्या प्रमाणात बंद करावे. पाणी बंद केल्यामुळे पानांमधील अन्नरस कंदामध्ये लवकर उतरतो त्यामुळे हळकुंडाला वजन, गोलाई, चकाकी मिळते. पाला वाळल्यानंतर एक इंच जमिनीवर खोड ठेवून विळ्याने तो पाला कापून घ्यावा. पाला कापल्यानंतर चार ते पाच दिवस शेत चांगले तापू द्यावे. यामुळे हळदीच्या कंदामध्ये असलेल्या पाण्याच्या अंशामुळे जमीन भेगाळली जाते. यामुळे काढणी करणे सोपे जाते.
हळद लागवड ज्याप्रमाणे केलेली असेल त्याचप्रमाणे त्याची काढण्याची पद्धत अवलंबून असते. सरी वरंबा पद्धतीत कुदळीच्या साह्याने हळद खांदणी करावी. तर गादी वाफा पद्धतीने ट्रॅक्टरच्या साह्याने हळद काढणी करावी. खंडणी करून काढलेले कंद दोन ते तीन दिवस उन्हामध्ये चांगले तापू द्यावे ज्यामुळे कंदास चिकटलेली माती निघण्यास मदत होते. यानंतर सोरा गड्डा (लागवडीसाठी वापरलेले कंद 50 ते 60 टक्के कुजून जातात, तर 40 ते 50 टक्के राहिलेल्या कंदास सोरा गड्ड म्हणतात). कुचकी, जेठे गड्डे (मुख्य रोपाखालीचे कंद वाढतात त्यांना जेठा कंद म्हणतात हे कंद पुढच्या वर्षी लागवडीसाठी वापरले जातात). सडलेली हळदकुंडे या कच्चामाची परतावणी करावी. परतावणी केल्यानंतर मालाची वेगवेगळ्या ठिकाणी साठवणूक करावी.
हळद काढून झाल्यानंतर लवकरात लवकर हळदीवर प्रक्रिया करावी व ही प्रक्रिया साधारण पंधरा दिवसाच्या आत करणे आवश्यक आहे. जेणेकरून हळदीची प्रत व दर्जा चांगला राहतो. जाती परत वेळ साधारणपणे एकरी 120 ते 180 क्विंटल ओल्या हळदीचे उत्पादन मिळते, तर प्रक्रिया केल्यानंतर 30 ते 40 क्विंटल उत्पादन मिळते.

पारंपारिक पद्धतीने हळद काढणी
आपण जर पारंपरिक पद्धतीने हळद काढली तर ते कंद पूर्णपणे निघत नाही. पंधरा ते वीस टक्के कंद जमिनीत तसेच राहतात. सरी किंवा गादीवाफा पद्धतीने लागवड केलेले ठिकाणी या पद्धतीचा वापर केला जातो. या पद्धतीने काढणी करण्यासाठी 18 ते 20 मजूर लागतात व कंदास इजा होण्याची शक्यता असते.
यंत्राद्वारे हळद काढणी
हळद काढणी यंत्राच्या मदतीने कंद वर उचलून घेत असतात. त्यामुळे 2 ते 3% कंद जमिनीमध्येच राहतात. हळद काढणी यंत्राचा वापर हा गादीवाफा पद्धतीने लागवड केलेल्या पिकामध्येच केला जातो. पारंपारिक पद्धतीच्या तुलनेने मजूर संख्या ही जास्त लागत नाही. यंत्राद्वारे कंद जमिनीतून अलगद उचलल्याने कंदास इजा होत नाही.
