मिधिली’ चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर बंगालच्या उपसागरात आणखी एक चक्रीवादळ तयार होत आहे. या नव्या चक्रीवादळाला म्यानमारने सुचविलेले नाव असेल – सायक्लोन मिचौंग! या नव्या हवामान प्रणालीमुळे देशाच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविली आहे.
बंगालच्या उपसागरातील सध्याची परिस्थिती पाहता, या आठवड्याच्या शेवटी हे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. IMDच्या ताज्या अपडेटनुसार, शनिवारी, 25 नोव्हेंबर रोजी दक्षिण अंदमान समुद्रावर चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे रविवारी, 26 नोव्हेंबर रोजी त्या प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल.
अंदमान समुद्रावर सोमवारी होणार तीव्र
कमी दाबाचे हे क्षेत्र पश्चिम-वायव्य दिशेकडे सरकून आग्नेय बंगालच्या उपसागरात आणि लगतच्या अंदमान समुद्रावर सोमवारी, 27 नोव्हेंबरच्या सुमारास अती तीव्र दाबाच्या पट्ट्यात रुपांतरीत होण्याचा अंदाज आहे. त्याच्या तीव्रतेचे आणि त्यानंतरच्या मार्गाचे तपशील पुढील आठवड्यात अधिक स्पष्ट होतील. सध्या, या प्रणालीला पूर्ण चक्रीवादळात रूपांतरित करण्यासाठी पुरेसे सामर्थ्य मिळेल की नाही हे अनिश्चित आहे. परंतु असे झाल्यास, म्यानमारने सुचविलेल्या नावानुसार चक्री वादळाचे नाव सायक्लोन मिचौंग असे असेल.
64.5 मिमी ते 115.5 मिमी मुसळधार पावसाची शक्यता
कमी दाबाच्या यापूर्वीच्या क्षेत्राच्या परिणामाचा फटका या शनिवार, रविवारपासूनच अंदमान-निकोबारला बसेल. आयएमडीने त्यानुसार या रविवारी ते पुढील मंगळवारपर्यंत (26-28 नोव्हेंबर) या बेटांवर हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. देशाच्या काही भागात गडगडाटी वादळासह 64.5 मिमी ते 115.5 मिमी इतक्या मुसळधार पासाचा अंदाज आहे.
येत्या आठवड्यात 65 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ वारे
रविवारी दक्षिण अंदमान समुद्रावर 40-45 किमी प्रतितास, वेगाने वाव वाहतील, ते पुढे 55 किमी प्रतितास वेगाने वाहू शकतील. या वादळी हवामानाच्या दिवसात पुढील आठवड्याच्या 65 किमी प्रतितास पर्यंत वेगाने वारे वाहतील आणि लगतच्या आग्नेय बंगालच्या उपसागरालाही व्यापतील.
समुद्राच्या पृष्ठभागाच्या वाढलेल्या तापमानाचा परिणाम
बंगालच्या उपसागरातील सलग वादळे हे उत्तर हिंद महासागरात ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत सुरू असलेल्या मान्सूननंतरच्या चक्रीवादळाला कारणीभूत ठरू शकतात. वर्षाच्या या वेळी उबदार समुद्राचे पाणी आणि समुद्राच्या पृष्ठभागाचे उच्च तापमान सायक्लोजेनेसिससाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करतात.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- सावधान, महाराष्ट्रात आजपासून रविवारपर्यंत तीन दिवस पावसाचे; गुजरात, मध्य प्रदेशातही अवकाळी पावसाची शक्यता
- तुषार सिंचनचा लाभ घेतलेले शेतकरी तीन वर्षांनंतर ठिबकसाठी पात्र