नवी दिल्ली : Animal Insurance… पशुधन विमा योजना केंद्र सरकारतर्फे राबवली जाते. या योजनेअंतर्गत देशातील काही निवडक जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेचा देशातील 300 जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या पशुपालकांना फायदा होत आहे. कोणत्याही कारणाने जनावरे दगावल्यास होणाऱ्या नुकसानापासून शेतकर्यांना, पशुपालकांना वाचवण्याच्या मुख्य उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
पशुधन विम्याच्या फायद्यांबाबत लोकांना जागरुक करणे आवश्यक आहे. पशुधन उत्पादनांचा दर्जेदार विकास करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. तुम्हीही जनावरे पाळत असाल आणि तुम्हाला तुमच्या जनावरांचा विमा काढायचा असेल, तर तुम्हाला पशु विमा योजना काय आहे, याची माहिती यातून मिळू शकेल. मराठीमध्ये पशुधन विमा योजना, ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया, सर्व माहिती या पोस्टमध्ये दिली आहे.
पशुधन विमा म्हणजे काय
जे शेतकरी पशुपालन करून आपला उदरनिर्वाह करतात, अशा पशु मालकांना त्यांच्या नुकसानीपासून संरक्षण प्रदान करणे, हा पशुधन विमा योजनेचा मुख्य उद्देश आहे. एखाद्या पाळीव प्राण्याचा नैसर्गिक घटनेमुळे, एखाद्या रोगामुळे किंवा अपघाताने मृत्यू झाल्यास पशुपालकाचे मोठे नुकसान होते. हे लक्षात घेऊन ही योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत देशी/संकरीत दुभती जनावरे ठेवण्यात आली आहेत. या जनावरांच्या बाजारातील प्रचलित किमतीच्या आधारावर विमा उतरवला जातो. विम्याचा हप्ता फक्त 50% पर्यंत मंजूर आहे. संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलते. योजनेच्या अनुदानाचा लाभ तीन वर्षांच्या पॉलिसीसह प्रति लाभार्थी फक्त दोन जनावरांना उपलब्ध होईल.
पशुधन, लाभार्थ्यांची निवड
• या योजनेत देशी/संकरीत दुधाळ जनावरे व म्हशी यांसारख्या जनावरांना लाभ दिला जातो. दूध देणारे, दूध न देणारे जनावरे तसेच वासराला जन्म दिलेल्या गाभण गुरांचा समावेश योजनेत करण्यात आला आहे.
• जी जनावरे याआधीच शासनाने राबविलेल्या इतर कोणत्याही योजनेचे लाभार्थी आहेत, त्यांना या योजनेचे लाभ मिळू शकणार नाहीत.
• योजनेचा लाभ फक्त दोन जनावरे असलेल्या पशुपालकांनाच मिळणार असून एका जनावराचा विमा जास्तीत जास्त 3 वर्षांपर्यंत असू शकतो.
• दुष्काळ, पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी शेतकऱ्यांना तीन वर्षांच्या कालावधीसाठी विमा घेण्यास प्रोत्साहन दिले जाईल. जेणेकरून त्यांना विम्याचा प्रत्यक्ष लाभ मिळू शकेल.
• याशिवाय, जर एखाद्या शेतकऱ्याला तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीची पॉलिसी घ्यायची असेल, तर तोही घेऊ शकतो आणि पुढच्या वर्षी विमा उतरवला तर विम्याच्या हप्त्यात सवलतही मिळेल.
• जनावरांचा विमा त्याला बाजारात मिळू शकणार्या सर्वोच्च किंमतीवर आधारित असेल. लाभार्थी, अधिकृत पशुवैद्यक आणि विमा एजंटद्वारे त्याची निश्चिती केली जाईल.
• योजनेंतर्गत विमा संरक्षित गुरांचा मृत्यू झाल्यास, योजनेची रक्कम विमा कंपनीकडून पशुमालकाला प्रदान केली जाईल.
• या योजनेंतर्गत नुकसान भरपाईची रक्कम पशुपालकांना जनावरांच्या मृत्यूनंतर 15 दिवसांच्या आत देण्यात येईल.
• या योजनेमुळे जनावर दगावल्यास पशु मालकाचे फारसे नुकसान होणार नाही.
• जनावरांच्या सध्याच्या बाजारमूल्यावर भरपाई दिली जाईल.
विमा उतरवलेल्या प्राण्याची ओळख
योजनेंतर्गत विमा उतरवलेल्या प्राण्यांना वेगळी ओळख दिली जाते, जेणेकरून विम्याच्या रकमेवर दावा करताना त्यांना सहज ओळखता येईल. या ओळखीसाठी, प्राण्यांच्या कानावर चिन्हांकन केले जाते, ते सर्व प्रकारे सुरक्षित ठेवले पाहिजे. पॉलिसी घेताना कानात मार्किंग किंवा मायक्रोचिप लावली जाते.
हे ओळखचिन्ह लावण्याचा खर्च विमा कंपनी उचलेल आणि देखभालीची जबाबदारी लाभार्थी पशुपालकांची असेल. गुरांच्या कानात केलेले मार्किंग आणि वापरलेल्या साहित्याची निवड विमा कंपनी आणि लाभार्थी या दोघांच्या संमतीने होते.
पशु विमा योजना नोंदणी प्रक्रिया
• सर्वप्रथम तुम्हाला केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाइट http://dahd.nic.in वर जावे लागेल.
• वेबसाईटचे होम पेज तुमच्या समोर ओपन होईल.
• यानंतर विमा योजना अर्ज लिंकवर क्लिक करा आणि फॉर्म उघडा.
• फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती योग्यरित्या भरा.
• फॉर्म भरल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करून सबमिट करा.
• अशा प्रकारे तुमचा फॉर्म यशस्वीरित्या सबमिट होईल.
तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
जनावरांमध्ये लम्पी स्कीन व्हायरसची साथ; पशुधनाच्या मृत्यूमुळे शेतकरी अस्वस्थ
Comments 1