अमूल आता देशात प्रथमच 5 पट अधिक प्रोटीन्स (प्रथिने) असलेले ‘सुपर मिल्क’ बनवणार आहे. या ‘सुपर मिल्क’च्या 200 मिलीच्या पाऊचमध्ये 30 ग्रॅम प्रोटीन असेल. एखाद्या मांस-मटण, चिकन, अंडी, मासे, टोफू वगेरेच्या प्लेटमधून मिळणारे प्रोटीन्स अमूलचे ‘सुपर मिल्क’ देईल. त्यामुळे ते शाकाहारी मंडळींना वरदान ठरेल.
सध्या अमूलचे व्हे प्रोटीन ऑनलाईन साधारण 2,000 रुपये किलो या दराने ऑनलाईन विकले जाते. मुख्यतः मसल बिल्डिंगसाठी ते वापरले जाते. ‘सुपर मिल्क’ही अमूलच्या ई-कॉमर्स पोर्टलवर विकले जाईल, असे गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडचे (GCMMF) प्रभारी व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी सांगितले.
ॲग्रोवर्ल्डचे 2024 मधील पहिले कृषी प्रदर्शन पिंपळगाव नगरीत.. । Agroworld Expo 2024।
हाय प्रोटीन दहीही लाँच करणार
“आम्ही लवकरच हाय प्रोटीन फ्रेश दूध आणि दही लाँच करणार आहोत. या सुपर दुधाच्या 200 मिलीच्या पाऊचमध्ये 30 ग्रॅम प्रोटीन असतील. सध्या बाजारात विकल्या जाणाऱ्या 200 मिली दुधात फक्त 6 ग्रॅम प्रोटीन असतात. म्हणजेच दुधातील प्रोटीन पातळी पाच पट वाढवली जाईल,” असे अमूलचे प्रभारी एमडी जयेन मेहता यांनी सांगितले.
ई-कॉमर्स पोर्टलद्वारे विक्रीवर भर
“सुपर मिल्क पीईटी बाटल्या किंवा कार्टनमधून म्हणून लाँच केले जाईल आणि अमूलच्या ई-कॉमर्स पोर्टलद्वारेच उपलब्ध केले जाईल. अमूल उत्पादने ई-कॉमर्स वितरणाद्वारे अहमदाबाद, दिल्ली, चंदीगड, मुंबई, पुणे, बेंगळुरू आणि कोलकाता येथे ग्राहकांपर्यंत थेट पोहोचत आहेत.”
शाकाहारी मंडळींना प्रोटीन्स स्त्रोत मर्यादित
अहमदाबादमध्ये पार पडलेल्या द इंडस एंटरप्रेन्योर्स (TiE) च्या फ्लॅगशिप वार्षिक परिषदेला संबोधित करताना मेहता म्हणाले, “आपल्या सर्वांना दररोज आपल्या शरीराच्या वजनाच्या प्रति किलो 1 ग्रॅम प्रोटीनची आवश्यकता असते. सध्या शाकाहारी मंडळींना प्रोटीन्स स्त्रोत मर्यादित आहेत. त्यांना योग्य मार्गाने आपल्या शरीरासाठी आवश्यक प्रोटीन्स मिळविणे कठीण होते.”
हाय-प्रोटीन लस्सी, मिल्कशेक, बटरमिल्क
अमूलने आधीच हाय-प्रोटीन लस्सी, मिल्कशेक आणि बटरमिल्क लाँच केले आहे, जे ग्राहकांना थेट ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे विकले जाते. तथापि, या उत्पादनांमध्ये 15-20 ग्रॅम प्रोटीन्स असतात. अमूल सध्या जे “व्हे प्रोटीन” विकते, त्याची किंमत 960 ग्रॅमसाठी 2,000 रुपये आहे.
काय आहे मसलमॅन बनवणारे व्हे प्रोटीन
व्हे प्रोटीन हे दुधापासून बनवले जाते. त्याला ‘कंप्लीट प्रोटिन’ असेही म्हणतात. यात सर्व 9 अमीनो ॲसिड मिळतात आणि लॅक्टोसची मात्राही कमी असते. दुधापासून पनीर बनवताना जे पाणी उरते, तेच असते व्हे प्रोटीन! सध्या मसल्स (स्नायू) बनवणारे, जिममध्ये जाणारे तरुण व्यायाम केल्यानंतर शेकर किंवा बाटलीमध्ये जी पावडर पितात, ती काळ्या डब्यातून विकली जाणारी प्रोटीन पावडर म्हणजे हेच व्हे प्रोटीन असते. हे व्हे प्रोटीन अनेक सिंगल पसली, दुबळ्या-पतळ्यांना मसलमॅन बनवत आहे.