थंडीमुळे नवीन लागवड केलेल्या रोपांच्या वाढीवर परिणाम होतो. काहीवेळा पाने उमलण्यास वेळ लागतो. पाने पिवळी पडतात. जमिनीतून अन्नद्रव्य उचलण्याचा वेग मंदावून झाडाच्या वाढीवर परिणाम होतो.
उपाययोजना
• 19-19-19 हे विद्राव्य खत 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. यामुळे अन्नद्रव्यांचा पुरवठा होण्यास वेग वाढतो. त्याचा झाडांच्या वाढीसाठी चांगला परिणाम होतो.
• बागेत पहाटे किंवा रात्रीच्या वेळेस पाणी द्यावे.
• तीन ते चार महिने वयाच्या झाडाला 200 ग्रॅम आणि सहा महिने वयाच्या पुढील झाडाला अर्धा किलो निंबोळी पेंड आळ्यात मिसळून द्यावी. यामुळे मुळांच्या कार्यक्षेत्रात उबदारपणा वाढतो.
• पहाटेच्या वेळेस बागेत शेकोटी करून धूर करावा. यामुळे बागेतील तापमान वाढण्यास मदत होते.
• बागेच्या कडेने शेडनेट लावल्याने थंड वारे शिरण्यास अडथळा तयार होतो.
केळीचे प्रमुख वाण
श्रीमंती : या वाणाच्या घडात 11 ते 13 फण्या असतात. घडाचे सरासरी वजन 29 ते 25 कि.ग्रॅ. पर्यंत असते. उत्तम व्यवस्थापन असल्यास या वाणाचा खोडवा चांगला येतो.
ग्रँड नैन : परदेशातून आणलेला वाण असून निर्यातीस योग्य असा हा वाण आहे. घडाचा आकार दंडगोलाकृती असून घडाचे वजन 25 ते 30 कि.ग्रॅ. दरम्यान असते. कमी कालावधीत (12 ते 13 महिने) येणारा हा वाण आहे. हा वाण सिगाटोका (पिवळी), इर्विनिया रॉट (खोड सड) आणि विषाणूजन्य रोगास मोठ्या प्रमाणावर बळी पडतो. या वाणास आधाराची गरज भासते. या वाणाचा खोडवा उत्तम येतो.
फुले प्राईड : फुले प्राईड हा केळीचा बुटका वाण असून 150 सें.मी. उंच वाढतो. या वाणाची झाडे बुटकी असल्याने झाडे उन्मळून पडणे व खोड मोडणे यास प्रतिकारक आहे. या वाणाची घडाची सरासरी वजन 22 किलो आहे.
(कंटेंट सौजन्य : ADT/KVK, बारामती & रेनट्री)
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- कृषी सल्ला : डाळिंब – विश्रांती अवस्थेतील मृग बहार बागेची मशागत व्यवस्थापन
- कृषी सल्ला : निर्यातक्षम द्राक्षांसाठी रासायनिक अंशाचे नियंत्रण