• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

शेतीच्या पाण्याचे वॉटर फिल्टर – मॅग्नेटिक, इलेक्ट्रॉनिक वाँटर कंडिशनर

Team Agroworld by Team Agroworld
July 10, 2019
in तांत्रिक, यशोगाथा
0
शेतीच्या पाण्याचे वॉटर फिल्टर – मॅग्नेटिक, इलेक्ट्रॉनिक वाँटर कंडिशनर
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

स्टोरी आउट लुक
क्षार नियंत्रणासाठी मॅग्नेटिक वाँटर कंडिशनर
झीरो बजेट नैसर्गिक शेतीसाठी गोपालन
मिश्र पिक पद्धती
क्षार नियंत्रणासाठी भारतीय व इस्राइल दोन्ही पद्धती चा शेतात वापर


झीरो बजेट नैसर्गिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत पुरी ता.रावेर जि.जळगांव येथील युवा प्रयोगशील शेतकरी श्री मनोहर लक्ष्मण पाटील यांनी पाण्यात असलेल्या क्षाराचे योग्य संतुलन राखून उत्पन्नात वाढ केली व मी भविष्यातील पिढीसाठी उत्पादक व कसदार अशी जमीन वारसा म्हणून माझ्या पिढीला देत आहे असे अभिमानाने सांगून इतरांनाही पाण्यात असलेल्या अतिरिक्त क्षाराचे काय दुष्परिणाम आहेत हे पोटतिडकीने सांगत असतात.
पुरी ता.रावेर जि.जळगांव हे जिल्ह्यात एका कोपर्यात असलेले गांव ,परंतु आपल्या शरीराप्रमाणेच जमिनीच्या आरोग्याचा विचार करणारे शेतकरी दिसतात तेव्हा खरंच भारतीय शेतकरी जागरूक झाला आहे हे जाणवते या शिवारातील शेतकर्‍यांच्या विहीर व कुपनलिका यानां क्षार युक्त पाणी आहे हि समस्या फार मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.नदीचे पाणी सोड्ले तर सर्वत्र हि समस्या जाणवते.त्यावर मनोहर पाटील यांनी द बेस्ट मॅग्नेटिक आणि इलेक्ट्रॉनिक वॉटर कंडिशनर हे उपकरण जय इंटरप्राइजेस चे सुशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बसवून या समस्येवर मात केली आहे.
सिंचनाच्या पाण्याच्या योग्य व्यवस्थापनामुळे जमिनीचे आरोग्य टिकवता येते. पाण्याचा कार्यक्षम वापर करून उत्पादनात वाढ मिळते व जमिनीची कार्यक्षमता टिकते हे बदल द बेस्ट यासारख्या उपकरणामुळे झालेले दिसून येतात.क्षार युक्त पाण्यामुळे खालील प्रमाणे समस्या जाणवतात
उष्ण हवामानाच्या प्रदेशात कमी पावसाच्या परिस्थितीत जमिनीतील क्षार धुऊन जाण्याचे प्रमाण कमी होऊन ते साचत जातात आणि परिणाम हळूहळू ही गंभीर समस्या उत्पन्न होते. क्षारयुक्त पाण्याचा सिंचनासाठी वापर केल्यास पाण्यातील विद्राव्य क्षार जमिनीत शोषले जाऊन त्यांचे प्रमाण वाढत जाते. अशा क्षारयुक्त जमिनीत पाणी आणि अन्नद्रव्ये यांचे पिकाकडून शोषण होत नाही. पीक वाढीसाठी आवश्यक अशा नत्र, जस्त, लोह यांची उपलब्धता कमी होते अश्या पाण्याचा दीर्घकाळ वापर केल्यास जमिनीत जडधातू साचून ते पिकांवाटे मानवी आहारातून प्रवेश करू शकतात, त्यामुळे या अश्या पाण्याचा वापर प्रक्रिया करूनच सुरक्षित पद्धतीने करायला हवा .
क्षारांचा मुळांवर विषारी परिणाम होतो. पिकांची वाढ खुंटते, बियाण्याची उगवण कमी होते, मुळांची टोके मरतात आणि त्याचा आतील परिणाम पिकांवर दिसून येतो. अशा जमिनीत अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी होऊन सुपीकता घटते. जमिनीच्या पृष्ठभागावर पाणी पिकांना प्राणवायू उपलब्ध होऊ देत नाही व जमिनीचा सामू वाढतच जातो.
क्षारयुक्त होण्याला कारण
जमिनी क्षारयुक्त होण्याला आपणच जबाबदार आहोत असे मनोहर पाटील यांना वाटते. एकेकाळी बळीराम नांगराच्या साह्याने नांगरली जाणारी जमीन आज 35,40,47,50,55आणि आता तर 60 अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने नांगरली जातेय याला कारणीभूत आहे जमिनीला आलेला टणकपणा आणि तो आला आहे आपण केलेल्या बेसुमार रासायनिक खत ,अनियंत्रित क्षारयुक्त पाणी पुरवठा ,आणि आपण रोटाव्हेटोरचा वापर करून एक प्रकारे या समस्येवर उपाय न शोधता एक प्रकारे जमिनीला तात्पुरती मलमपट्टी करून आजारावर पांघरून घालत आहेत. कारण ह्या क्षारयुक्त पाण्यामुळे ठिबक चे ड्रीपर चोकअप होतात त्याच प्रमाणे जमिनीवरही आपल्याला पांढरा थर पाहायला मिळतो पाणी दिल्या नंतर तसाच थर आपल्या पिकांवरती सुद्धा येतो आणि आपले पीक हे फुलोर्‍यात येईपर्यंत त्याची वाढ चांगली असते आणि त्यानंतर फलधारणेच्या काळात हेच पीक हलके पडते कारण त्याच्या मुळीना इजा झालेली असते आणि त्या मुळ्या जास्तीत जास्त मृत पावलेल्या असतात अशा वेळी आपण मुळीना बुरशी लागलेली आहे असा निष्कर्ष काढून आपण बुरशीनाशके वापरावीत आणि नवीन मुळी साठी हुमिक ऍसिड व इतर संजीवके वापरतो ,परंतु त्या मुळी मृत का पावतात याचे कारण स्पष्ट व्हायला पाहिजे मुळींची शेवटची ओपनिंग त्याला आपण तोंड म्हणतो ज्याचे वाटे ती जमिनीतुन ती पाणी आणि उपलब्ध खते घेते ती 4 मायक्रोन ची असते आणि आपण जे पाणी शेतीला वापरतोय त्या मध्ये असलेले कॅल्शिअम,क्लोरीन,मॅग्नेशियम,सोडियम, हे अणु पाण्यासोबत म्हणजे क2े सोबत जुडलेले असतात आणि त्यांचा आकार हा 40 मायक्रोनचा असतो म्हणजे मुळीच्या तोंडाच्या 10 पट मोठे असते आणि पिकच्या फुलोर्‍या नंतरच्या काळात मुळी कडून पाण्याचा पुरवठा वाढतो आणि अशा परिस्थितीत 4 ते 6 महिन्यापासून सारखा पाण्यावाटे बसणार क्षारांचा थर त्या मुळीना मृत करतो.अशी परिस्थिती दरवर्षी होते परंतु आपण मूळ समस्येवर लक्ष न देता निसर्गाला दोष देतो व वातावरणाला दोष देतो .
या समस्येवर मात करण्यासाठी दोन प्रकारे कार्य केले जाते

1) आच्छादन – जमिनीत दिलेल्या पाण्याचे उन्हामुळे जोरात बाष्पीभवन क्रिया घडून क्षार जमिनीच्या पृष्ठभागावर येतात.परंतु जमिनीवर आच्छादन केल्यास बाष्पीभवनाची हि प्रक्रिया मंदावते व क्षार जमा होण्याचे प्रमाण कमी होते. त्यासाठी मल्चिंग पेपर,शेतातील तण,शेतमालाचे निरुपयोगी घटक,उसाचे पाचट,भुसा इ. वापरले जातात
2) इस्राइल मध्ये चुंबकीय पाणी पद्धती विकसित केली आहे यामध्ये चुंबकीय ऊर्जेच्या माध्यमातून क्षार युक्त पाण्याच्या रेणूचे समान सहा भागात परावर्तीत करून पाणी पिकांना दिले जाते.

उपाय
मनोहर पाटील यांच्या मते पाणी दूषित करायला आपल्याला जर 40 वर्ष लागली आणि आता सुधारायला कमीत कमी 20 वर्ष तरी लागतील तेही सर्वांनी केले तर, त्यासाठी आपल्याला जमिनीत जाणार्‍या क्षारयुक्त पाण्याचे नियोजन करावे लागेल.नैसर्गिक शेतीकडे वळावे लागेल .व शेतीला देणार्‍या क्षारयुक्त पाण्यावर प्रक्रिया करून ते शेतात पोहोचवावे लागेल . आपण कधीपर्यंत ठिबक स्वच्छ करण्यासाठी ऍसिड वापराल,टणक जमीन आपण रोटाव्हेटोरचा वापर करून भूसभूसित करणार. काही तरी कायमचा उपाय हवा म्हणून त्यासाठी आपल्याला आपल्या जलस्रोतांवर इस्राइल पद्धती प्रमाणे एकदाच मॅग्नेटिक किंवा इलेक्ट्रॉनिक वाँटर कंडिशनर बसवून घेणे हाच पर्याय आहे. या मशीन मुळे पाण्याचे भौतिक गुणधर्म बदलतात आणि पाणी वापरायला हलके होते ,पाण्याची चव थोड्या प्रमाणात बदलते,पाण्यात डाळ शिजते,चहा व्यवस्तीत बनतो,शेतातील ठिबक चोकअप होत नाही,जमीन नरम होते, शेतातील सर्व पिके पूर्ण वाढ होई पर्यंत जोमाने जगतात,विशेष म्हणजे या उपकरणात कोणतीही रसायने वापरली जात नसल्याने ते पर्यावरणाच्या दृष्टीने पूर्णपणे सुरक्षित आहे.
एकूण 15 एकर जमीन असलेल्या मनोहर पाटील यांनी वरीलप्रमाणे भविष्यात शेतीत होणारा बदल लक्षात घेत पारंपारिक पिक पद्धतीत बदल करीत झीरो बजेट नैसर्गिक शेती सुरु केली व द बेस्ट मॅग्नेटिक आणि इलेक्ट्रॉनिक वॉटर कंडिशनर हे उपकरण आपल्या शेतात बसवून क्षारांचे प्रमाण इतर शेतकर्‍यांच्या तुलनेने संतुलित केले. शेतातील तणाचा वापर ते पिकांना आच्छादन म्हणून केला .त्यामुळे वर सांगितल्याप्रमाणे त्यांच्या शेतात इस्राइल व भारतीय दोन्ही पद्धतीमध्ये पाणी व जमीन दोन्ही प्रकारे क्षारांचे नियंत्रण केले जाते.
लागवडी खालील क्षेत्र

मनोहर पाटील यांनी बाजाराचा अंदाज घेत पिके निवड करत योग्य संतुलन राखत पीकपद्धती मध्ये बदल केला आहे.शक्यतो त्यांचा अंतर पिक पद्धतीवर विश्वास आहे.मुख्य पिकाचा खर्च हा आंतर पिकातून काढणे हे सूत्र त्यांनी अवलंबले.
सीडलेस लिंबू + आंतरपिक कांदा बी = 4 एकर
केळी = 3 एकर
मोसंबी + पपई = 4 एकर
स्ट्राबेरी बोर +हरभरा = 4 एकर
या सर्व पिकांना मनोहर पाटील हे देशी गाईचे जीवामृत मोठ्या प्रमाणात देतात व जास्तीत जास्त नैसर्गिकरीत्या पिक संगोपन करण्याचा प्रयत्न करतात. व संत तुकडोजी महाराज यांनी खाली सांगितलेला अभंग सार्थ ठरविताना दिसत आहे .

भारत कृषिप्रधान देश । शेतीसाठी हवा गोवंश । गोरसा इतुका नसे सत्वांश । अन्यत्र शुध्द ॥8॥
म्हणोनि गोवंश सुखी होता । तोंवरि नव्हती दरिद्रता । नव्हती ऐसी विपुलता । रोगराईची ॥9॥
गोमय गोमूत्र मिळोनि रात्रंदिस । कायम होता भूमीचा कस । पेवें भरती गांवागांवास । धान्याचीं तेव्हा ॥10॥
भूमि आणि जनावरें । हींच उत्पत्तीचीं कोठारें । एकाचीं अनेक होतीं खिल्लारें । जोडधंदा हा घरोघरीं ॥11॥

आज त्यांच्या शेतामध्ये माती हि भूसभूसित होऊन तिला नैसर्गिक सुगंध प्राप्त झाला आहे.कोठेही कठीणपणा दिसून येत नाही, कोठेही नवीन क्षार साचलेले दिसून येत नाही . नैसर्गिक व आधुनिकीकरण यांचा सुरेख संगम साधत त्यांना आर्थिकदृष्ट्या शेती मध्ये स्थिरता आली आहे. द बेस्ट मॅग्नेटिक आणि इलेक्ट्रॉनिक वॉटर कंडिशनर हे उपकरण बसवून त्यांनी शेतातील पाण्यात येणारे क्षार नियंत्रित केले आहे.याबरोबरच सामाजिकदृष्ट्या जागरूकता दाखवत इतरांना नको असलेल्या गाई स्वतःच्या मुक्त संचार गोशाळेत संगोपन करतात आज झीरो बजेट नैसर्गिक शेतीसाठी त्यांच्या कडे 5 गाई आहेत त्यासोबतच 1 अश्व ,1 रोक्व्हीलर जातीचा श्वान हे त्यांच्या गोशाळेच्या वैभवात भर घालतात.

प्रतिक्रिया
सिंचनाच्या पाण्याचे परीक्षण करून समस्येचे योग्य निदान करणे महत्त्वाचे आहे. पाण्याची गुणवत्ता सिंचनासाठी योग्य नसल्यास शास्त्रीय उपाययोजनांचा अवलंब करावा. सिंचनाच्या पाण्याच्या योग्य व्यवस्थापनामुळे जमिनीचे आरोग्य टिकवता येते. पाण्याचा कार्यक्षम वापर करून उत्पादनात वाढ मिळेल. असे अनेक चांगले फायदे या मशीन मुळे होतात.भविष्यातील धोका पाहून शेतकर्‍यांनी आपल्या जमिनीच्या आरोग्य विषयी जागृत व्हायला हवे.या उपकरणाची किंमत 2 ते 4 इंच पाईप याप्रमाणे वेगवेगळ्या आहे.
सुशील पाटील ,जय एन्टरप्राइजेस , रावेर, जि जळगाव 9049290028

जय एन्टरप्राइजेस चे सुशील पाटील सर यांनी मला या समस्याविषयी जागृत केले .आज मी माझ्या पुढील पिढीला समृद्ध व उत्पादक अशी जमीन हस्तांतरित करीत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे.आपली जमीन हाच आपल्या येणार्‍या पिढीसाठी एक प्रकारचा अनमोल असा ठेवा असणार आहे त्यामुळे आपण त्याची योग्य काळजी ह्यावी व पुढील पिढीला सशक्त व समृद्ध जमीन हस्तांतरित करावी यासाठी मी शक्य त्याप्रमाणात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. मनोहर लक्ष्मण पाटील शेतकरी पुरी ता. रावेर 8983334210

Share this:

  • Facebook
  • X
Tags: क्षार नियंत्रण मॅग्नेटिक वाँटर कंडिशनरजय इंटरप्राइजेसझीरो बजेट नैसर्गिक शेतीशेतीच्या पाण्याचे वॉटर फिल्टर
Previous Post

उत्तर महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज

Next Post

25 एकर पेक्षा जास्त क्षेत्रावर पसरलेले साम्राज्य ए -वन बायोटेक नर्सरी

Next Post
25 एकर पेक्षा जास्त क्षेत्रावर पसरलेले साम्राज्य                            ए -वन बायोटेक नर्सरी

25 एकर पेक्षा जास्त क्षेत्रावर पसरलेले साम्राज्य ए -वन बायोटेक नर्सरी

ताज्या बातम्या

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.