रब्बी हरभराची जिरायत शेतकऱ्यांची पेरणी आतापर्यंत पूर्ण झालेली असेल. बागायती क्षेत्रात मात्र पाणी देण्याची सोय असल्यामुळे हरभऱ्याची पेरणी 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरच्या दरम्यान करता येऊ शकते.
जिरायत क्षेत्रात जमिनीत पुरेसा ओलावा असताना हरभऱ्याची पेरणी केलेली योग्य राहते. हरभरा पेरणीनंतर सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या सुरूवातीस पडलेल्या पावसाचा जिरायत हरभऱ्याच्या उगवण आणि वाढीसाठी चांगला उपयोग होतो.
चार शेतमजुरांचे काम आता एकचजण करणार… इलेक्ट्रिक बुल। Electric bull।
10 नोव्हेंबरनंतर पेरणी योग्य
बागायत क्षेत्रात कमी खोलीवर (5 सें.मी.) हरभरा पेरणी केली तरी चालते. पेरणीस जास्त उशीर झाल्यास किमान तपमान खूपच कमी होऊन उगवण उशीरा आणि कमी होते. पिकाची वाढ कमी होऊन फांद्या, फुले, घाटे कमी लागतात. 10 नोव्हेंबरनंतर पेरणी योग्य राहते. त्यानंतर 15 दिवसांनी व 30 दिवसांनी उशीरा पेरणी केल्यास उत्पादनात अनुक्रमे 27 ते 40 टक्के घट येते. हरभऱ्याच्या विविध वाणांच्या दाण्यांच्या आकारमानानुसार बियाण्याचे प्रमाण वापरावे लागते. म्हणजे एकरी रोपांची अपेक्षित संख्या मिळते.
पेरणीचे अंतर आणि बियाणे प्रमाण
देशी वाण पेरणीचे अंतर
जिरायत – 30 x 10 सें.मी.
बागायती – सरी वरंबा/ रुंद सरी वरंबा (बीबीएफ)- 45 x 10 सें.मी.
बियाणे प्रमाण : विजय, जाकी 9218, फुले विक्रांत, फुले विक्रम, फुले विश्वराज – 30 किलो/ एकर,
दिग्विजय – 36 किलो/ एकर,
विशाल – 40 किलो/ एकर
झटका मशीनचा वापर करा व वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करा ।Jhataka Machine।
काबुली वाण पेरणीचे अंतर
45 x 10 सें.मी.
बियाणे प्रमाण- विराट, काक , बीडीएनजी 798 – 50 किलो/ एकर,
पीकेव्ही 4-1, कृपा – ६० किलो/ एकर
आंतरपीक पद्धती
1. हरभरा पिकाचे मोहरी, करडई, ज्वारी, ऊस या पिकांबरोबर आंतरपीक घेता येते.
2. हरभऱ्याच्या दोन ओळी आणि मोहरी अथवा करडईची एक ओळीप्रमाणे आंतरपीक घ्यावे.
3. हरभऱ्याच्या सहा ओळी आणि रब्बी ज्वारीच्या दोन ओळींप्रमाणे आंतरपीक फायदेशीर आहे.
4. उसामध्ये सरीच्या दोन्ही बाजूंस किंवा वरंब्याच्या टोकावर 10 सें.मी. अंतरावर हरभऱ्याची एक ओळ टोकण केल्यास हरभऱ्याचे अतिशय चांगले उत्पादन मिळते. त्याचबरोबर हरभऱ्याच्या बेवड उसाला उपयोगी ठरून उसाच्या उत्पादनात वाढ होते.
(कंटेंट सौजन्य : ADT/KVK, बारामती & रेनट्री)
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.
- कांद्यावरील निर्यात शुल्क रद्दनंतर दरावर झाला हा परिणाम
- सावधान! शेतात पिकांच्या अवशेषांचा कचरा जाळल्यास डीबीटी, हमी खरेदीसह शेतकरी सुविधांचा लाभ बंद