थंडीमुळे जेथे पीक फुलोरा, दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे, तेथे पिकाची शारीरिक क्रिया मंदावून फुलगळ होण्याची शक्यता आहे. तसेच पेशीतील पाणी थंडीमुळे आकसून पेशींना हानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे दाणे आकसणे तसेच तडकण्याची शक्यता आहे.
यासाठी शेताच्या सभोवती ओला काडीकचरा व गवत जाळून धूर करावा. उपलब्धतेनुसार संरक्षित पाण्याची पाळी द्यावी. पिकावर पोटॅशियम नायट्रेट (13-0-45) 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
कीड, रोगांपासून पीक संरक्षण
शेंग माशी, शेंगा पोखरणारी अळी आणि पिसारी पतंग या किडींच्या नियंत्रणासाठी, इमामेक्टिन बेन्झोएट (5 एसजी) 0.4 ग्रॅम किंवा फ्ल्युबेंडायअमाईड (20 डब्ल्यूजी) 0.5 ग्रॅम किंवा क्लोर ॲण्ट्रानिलीप्रोल (18.5 एससी) 0.3 मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास पुढील फवारणी कीटकनाशक बदलून 15 दिवसांच्या अंतराने करावी.
मर आणि वांझ रोगग्रस्त झाडे आढळून आल्यास उपटून जाळून नष्ट करावी.
(कंटेंट सौजन्य : ADT/KVK, बारामती & रेनट्री)
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- “शरम” नाम की कोई “चीज” नहीं होती ! सोशल मीडियावरील व्हायरलनंतर ‘अमूल’चे स्पष्टीकरण
- काय आहे कांदा बँक ; शेतकऱ्यांना काय होणार फायदा ?