• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

नैसर्गिक नदी नसलेल्या जगातील 2 सर्वात कोरड्या देशातील शेतीची कथा

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 30, 2023
in यशोगाथा
0
नैसर्गिक नदी नसलेल्या जगातील 2 सर्वात कोरड्या देशातील शेतीची कथा
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

ही कथा आहे लिबिया आणि जॉर्डन या नैसर्गिक नदी नसलेल्या जगातील दोन सर्वात कोरड्या देशांमधील शेतीची. पर्यावरणदृष्ट्या लिबिया हा जगातील सर्वात असुरक्षित देशांपैकी एक आहे. तेथे पावसाच्या पाण्यावर देशातील फक्त 2 टक्के जमिनीवर पारंपारिक शेती होऊ शकते. दुसरीकडे, जॉर्डन हा मध्य पूर्वेतील एक असा देश आहे, जो पाण्याचे सर्वाधिक दुर्भिक्ष्य असलेल्या जगातील 25 देशांपैकी एक आहे. या देशांना नवा मार्ग दाखवला आहे तो हायड्रोपोनिक्स शेतीने!

लिबिया आणि जॉर्डनमध्ये नेहमीच उष्णतेच्या लाटेमुळे पिके नष्ट होतात. त्यामुळे शेतकरी आणि निर्वासितांना हायड्रोपोनिक्स सारख्या नवीन शेती तंत्रातून मोठी आशा आहे. हायड्रोपोनिक्स शेती ही एक अशी पद्धत आहे, ज्यात मातीऐवजी म्हणजे जमिनीऐवजी थेट पाण्यात आणि पॉलीहाऊसारख्या तापमान-नियंत्रित वातावरणात पिकांची लागवड करते. जॉर्डनमधील पॅलेस्टिनी निर्वासित मोहम्मद सियाम सहकारी निर्वासितांना हायड्रोपोनिक्स शेतीचे तंत्र शिकवत आहे, ज्यामुळे त्यांना स्वयंपूर्ण जीवन जगता येते.

 

 

तापमान 50 अंश सेल्सिअसच्या वर

लिबियातील त्रिपोलीच्या दक्षिणेस एक हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या उबारी या ओएसिस शहरामध्ये उन्हाळ्यातील उष्णता प्राणघातक ठरू शकते. तिथे आता तापमान वारंवार 50 अंश सेल्सिअसच्या वर जाते. या भयंकर उष्णतेमुळे सार्वजनिक सुरक्षिततेसाठी शाळा आणि कार्यालये वारंवार बंद करावी लागत आहेत.

फळे आणि भाज्यांसाठी कडाक्याचा उष्मा घातक

35 वर्षीय उबारी शेतकरी खलिफा मोहम्मद यांच्यासाठी हा कडाक्याचा उष्मा अत्यंत घातक ठरतो. अशा वातावरणात फळे आणि भाज्यांचा साठवणुकीचा प्रश्न फार मोठा आहे. मुहम्मद सांगतात, “अलीकडील पाच वर्षांत वाढत्या तापमानामुळे आमच्या पिकांच्या कापणीवर वाईट परिणाम होत आहे.”

 

जगातील सर्वात असुरक्षित देशांपैकी एक

लिबिया हा हवामान बदलासाठी जगातील सर्वात असुरक्षित देशांपैकी एक आहे. या उत्तर आफ्रिकन राष्ट्राला दीर्घकाळचा दुष्काळ, वाढलेली वाळूची वादळे, वाढते बाष्पीभवन आणि वाळवंटीकरणाचा मोठा फटका बसत आहे. या अतिरेकांमुळे पीक उत्पादन कमी होऊन लिबियाच्या अन्न सुरक्षेला मोठा धोका निर्माण होत आहे.

 

भविष्यात वनस्पती-आधारित मांस हेच मुख्य सुपरफूड

अब्जाधीश बिल गेट्स यांनी यापूर्वीच दावा केला आहे, की भविष्यात वनस्पती-आधारित मांस हेच मुख्य सुपरफूड राहील. त्यासाठी शेती तंत्र बदलावे लागेल. युगांडातील शेतकरीही हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर जगण्यासाठी लढा देत आहेत. त्यांनी आधुनिक तंत्राने कॉफी आणि केळी पिकवायाला सुरुवात केली आहे. तोच आदर्श घेऊन, अशा कठीण परिस्थितीत अन्न पिकवण्यासाठी, मोहम्मदसारखे लिबियाचे शेतकरी हायड्रोपोनिक शेतीकडे वळत आहेत.

 

लिबियात हायड्रोपोनिक्स ठरतेय ईश्वरी देणगी

हायड्रोपोनिक्समुळे आता लिबियात दर्जेदार भाज्यांचे उत्पादन करण्यात मदत झाली आहे. त्या जलद वाढतात, त्यांचा रंग अधिक शुद्ध असतो आणि पारंपारिक पद्धतींनी वाढवलेल्यापेक्षा त्यांची चव चांगली असते. वर्षानुवर्षे निसर्गाचा फटका बसून घटलेल्या उत्पादनानंतर हायड्रोपोनिक्स ही जणू एक ईश्वरी देणगी ठरत आहे, असे तरुण शेतकरी खलिफा मोहम्मद सांगतात. त्यांनी स्वतः त्यांच्या पॉलीहाऊसमध्ये हायड्रोपोनिक तंत्राने सुमारे 900 रोपांची लागवड केली आहे.

 

ॲग्रोवर्ल्डचे 2024 मधील पहिले कृषी प्रदर्शन पिंपळगाव नगरीत.. । Agroworld Expo 2024।

 

‘ग्रीन पॅराडाईज’च्या पुढाकाराने बदलतेय चित्र

2020 मध्ये लाँच झाल्यापासून, ‘ग्रीन पॅराडाईज’ने लिबियातील 120 हून अधिक शेतकऱ्यांना हायड्रोपोनिक्सचे प्रशिक्षण दिले आहे. ते उदाहरण डोळ्यासमोर ठेवून आता जॉर्डनमधील शेतकरीही हायड्रोपोनिक्सकडे वळत आहेत. जॉर्डनची राजधानी अम्मानमध्ये, 48 वर्षीय नजवा अल-कादी यांनी या तंत्राने त्यांच्या घराच्या गच्चीवर टोमॅटो आणि लाल लेट्यूसची चांगली लागवड केली आहे.

वृद्ध महिलांची होतेय घरबसल्या कमाई

त्या सांगतात, “टेरेस गार्डनवर, ग्रीन हाऊसमध्ये हायड्रोपोनिक तंत्राने पिकवलेली पिके माझ्या मुलांच्या उच्च शिक्षणाचा खर्च भागवण्यास मदत करतात.” पाच मुलांची आई आणि आता दोन मुलांची आजी असलेल्या या महिलेचा आता शेतीत उत्साह वाढला आहे. टेरेस गार्डनमधून त्या दरमहा सुमारे 130 युरो म्हणजे साधारणतः साडे अकरा हजार भारतीय रुपये इतके कमावतात.

जॉर्डनच्या वाळवंटात हायड्रोपोनिक्स ठरतेय मृगजळ

लिबियाप्रमाणे, जॉर्डन हा मध्य पूर्वेतील 15 देशांपैकी एक आहे, जो पाण्याची सर्वाधिक टंचाई असलेल्या जगातील 25 देशांपैकी एक आहे. या देशांतील लोकसंख्या सध्या पिण्यासाठी उपलब्ध संपूर्ण पाणीसाठ्याचा वापर करते. त्यामुळे इथले शेती क्षेत्र आहे पाण्याच्या कमतरतेने ग्रासलेले आहे.

पारंपारिक शेतीपेक्षा लागते 28 ते 60 पट कमी पाणी

अशा वाळवंटात हायड्रोपोनिक्स मृगजळ ठरत आहे. अम्मान येथील शेती सल्लागार अला ओबेदत यांच्या मते, “या शेतीच्या पद्धतीत नेमके लक्ष्यित सिंचन होते. त्याने पारंपारिक शेतीपेक्षा 28 ते 60 पट कमी पाणी वापरले जाते. शिवाय, पाणी पुन्हा-पुन्हा वापरले जाऊ शकते.”

लिबियात पावसाच्या पाण्यावर केवळ 2 टक्के जमिनीवर पारंपारिक शेती केली जाऊ शकते. पाण्याअभावी बहुतांश जमीन पडीक राहते. त्यामुळे इथे हायड्रोपोनिक शेती हा एक आदर्श पर्याय बनतो. पाण्याची अत्यंत कमी गरज लक्षात घेता, हायड्रोपोनिक शेतीसाठी शेतीयोग्य जमिनीची गरज नाही.

 

हायड्रोपोनिक्स कसे कार्य करते?

कैरोतील ‘अर्बन ग्रीन्स इजिप्त’चे सह-संस्थापक अब्दुल्ला तौफिक स्पष्ट करतात, की “हायड्रोपोनिक्स शेतीत वनस्पती जमिनीपासून अधिक उंचीवर विशेष सब्सट्रेटमध्ये वाढतात. त्या द्रव स्वरूपात पोषण मिळवतात.”

लीबियासाठी लागवड करण्याची ही पद्धत आदर्श ठरत आहे. तिथे देशाचा सुमारे 95 टक्के वाळवंट आहे आणि देशाच्या दोन टक्क्यांपेक्षा कमी जमिनीवर पारंपारिक शेतीला आधार देण्यासाठी पुरेसा पाऊस पडतो. नैसर्गिक नद्या नसल्यामुळे, सिंचनासाठी जवळजवळ सर्व ताजे पाणी भूगर्भातील स्त्रोतातून मिळते. ते मुख्यत: पिण्यासाठी वापरले जाते.

धरणे पडली कोरडीठाक

2020 आणि 2021 मध्ये लिबियात नेहमीच्या उष्णतेची भयंकर लाट होती. शिवाय, पाऊसही सामान्यपेक्षा कमी झाला. 30 दशलक्ष घनमीटर क्षमता असलेले लिबियातील सर्वात मोठे धरण वाडीकम हे सलग 3 वर्षे पूर्णतः कोरडेठाक राहिले. तसेच दक्षिण आणि पश्चिम लिबियातील इतर अनेक धरणेही कोरडीच राहिली.

प्रतिकूल परिस्थितीत जिद्दी शेतकऱ्यांचा संघर्ष

40 लाखांहून अधिक लिबियन नागरिकांना भयंकर पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा युनिसेफने 2021 मध्येच दिला होता. देशाच्या 70 लाख लोकसंख्येपैकी हे प्रमाण निम्म्याहून अधिक आहे. अशा भयंकर परिस्थितीतही लिबियन शेतकरी नवनवे मार्ग शोधून काढत आहेत. तिथे शेतीसाठी कुठलीही सरकारी मदत, योजना पुरविली जात नाही.

लिबियाच्या संकटग्रस्त शेतकर्‍यांना या अशा भयंकर वातावरणात पिके वाढण्यास मदत करण्यासाठी, 2020 मध्ये सेराज बिशेया आणि मौनियर बनोट यांनी ग्रीन पॅराडाईझ ही एनजीओ सुरू केली. ही संस्था शेतकर्‍यांना हायड्रोपोनिक तंत्रांचे प्रशिक्षण देते आणि त्यांना उपलब्ध पाण्यात, उपलब्ध जागेत शेती करायला प्रोत्साहित करते.

टोमॅटो, काकडी, झुचीनीसारख्या पिकांची लागवड

एनजीओने खलिफा मोहम्मदसारख्या 120 हून अधिक शेतकर्‍यांना लिबियातील सभा, घाट, ओवैनत, वाडी अटाबा आणि उबारी यांसह काही उष्ण शहरांमध्ये प्रशिक्षण दिले आहे आणि त्यांना हवामानास अनुकूल शेत तयार करण्यात मदत केली आहे.

हायड्रोपोनिक्समुळे अनेक शेतकरी आता टोमॅटो, काकडी आणि झुचीनी यांसारख्या उष्णतेमुळे अशक्य असलेल्या पिकांची लागवड करत आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण आकार, रंग आणि चवीमुळे ते स्थानिक ग्राहकांमध्ये लोकप्रिय झाले आहेत.

2022 मधील सर्वात वाईट हंगामानंतर उबारीतील शेतकरी खालेद इब्राहिम यांनी ग्रीन पॅराडाईजची मदत मागितली. इब्राहिमसह परिसरातील इतर अनेक शेतकऱ्यांनी 2020-2021 मध्ये त्यांची निम्म्याहून अधिक उभी पिके उष्णतेच्या लाटेत गमावली होती.

 

निर्वासितांसाठी जीवनरेखा

जॉर्डनमध्ये तीव्र पाणीटंचाई आणि कमी होत चाललेली शेतीयोग्य जमीन यांच्याशी झुंज देत, शेतकऱ्यांना जगणे कठीण होत आहे.

जागतिक बँकेच्या अहवालानुसार, जॉर्डनमध्ये दरडोई प्रतिवर्षी केवळ 97 घनमीटर पाणी उपलब्ध आहे. जागतिक प्रति वर्ष प्रति व्यक्ती पाण्याची सरासरी 500 घनमीटर इतकी आहे. त्या तुलनेत इथल्या नागरिकांना केवळ 20% पाण्यात भगवावे लागते. त्यात शेतीसाठी पाणी आणणार कुठून? लोकसंख्या वाढ आणि निर्वासितांचा ओघ यामुळे हा तुटपुंजा पाणीपुरवठा गेल्या दशकभरात वाढला आहे. जॉर्डनच्या काही भागांना दोन आठवड्यांत एकदा, तेही अपुरे पाणी मिळते.

जॉर्डनच्या सुमारे 1 कोटी 10 लाख लोकसंख्येपैकी एक तृतीयांश भाग निर्वासित छावण्यांचा आहे. त्यांना उत्पन्नासाठी शेती हाच एकमेव पर्याय शिल्लक राहिला आहे.

 

पॅलेस्टिनी निर्वासित तरुणाची धडपड

पॅलेस्टिनी निर्वासित मोहम्मद सियाम हा नर्सिंगची पदवी असूनही व्हिसा मिळत नसल्याने जॉर्डनमधील एका अत्यंत खस्ताहालत, खचाखच निर्वासित शिबिरात राहतो. दुसऱ्या एका निर्वासित शिबिरातील रहिवाशांकडून त्याने हायड्रोपोनिक शेतीबाबत ऐकले. नंतर युट्यूब व्हिडिओंद्वारे स्वतःला शिक्षित करून त्याने 2020 मध्ये सेनेरा ही संस्था लाँच केली. ती संस्था आता निर्वासितांना हायड्रोपोनिक शेतीचे प्रशिक्षण देते.

सियामकडून हायड्रोपोनिक गार्डन्स चालवण्याचे प्रशिक्षण घेतलेल्या 49 निर्वासितांपैकी एक अल-कादी आहेत. सेनेरा संस्थेने 34 निर्वासितांना हायड्रोपोनिक सिस्टीम कशी तयार करावी, याचे प्रशिक्षण दिले. त्यातून 164 रूफटॉप सिस्टीम स्थापित करण्यात मदत केली, त्यापैकी बहुतेक गर्दीच्या निर्वासित शिबिरांमध्ये आहेत, जेथे पारंपारिक शेती पद्धती अशक्य होत्या.

सहा मुलांचा पिता असलेला सुभी शेहाब हा 45 वर्षीय सीरियन निर्वासित आजारपणामुळे नोकरी गमावून बसला. खायचे वांदे झाले. हिंमत न हारता त्याने हायड्रोपोनिक्स प्रशिक्षण घेतले. त्यातून तो मिरपूड आणि टोमॅटो वाढविण्यात यशस्वी झाला आहे, गेल्या चार महिन्यांत त्याने 913 युरो म्हणजे सुमारे 80 हजार भारतीय रुपये कमावले आहेत.

Aanand Agro Care

हायड्रोपोनिक शेती खूप महाग आहे का?

हायड्रोपोनिक शेतीसाठी पॉलीहाऊस उभारायला लागणारा सुरुवातीचा मोठा खर्च हा या शेती पद्धतीच्या प्रसारातील एक मुख्य अडथळा आहे. एक सर्वसाधारण हायड्रोपोनिक सेट अप बांधण्यासाठी सुमारे 7,000 लिबियन दिनार (सुमारे 1,344 युरो) म्हणजेच तब्बल सव्वा लाख भारतीय रुपये इतका खर्च येतो. त्यासाठीचे बरेच घटक आयात केले जातात. शिवाय, वनस्पती वाढण्यासाठी, पाणी पुरेसे थंड ठेवण्यासाठी रेफ्रिजरंट्सची आवश्यकता असते.

“दक्षिण लिबियातील हायड्रोपोनिक घरांमध्ये रेफ्रिजरंट्स जोडावे लागतात. तापमान खूप जास्त असल्याने त्यांना खूप पैसे द्यावे लागतात,” असे ग्रीन पॅराडाईजचे बिशेया सांगातात.

रेफ्रिजरंट परवडत नसलेल्या अल-कादी यांनी तापमान नियंत्रित करण्यासाठी पंखा लावला, परंतु त्याचा परिणाम मर्यादित राहतो. उत्पादन क्षमता आणि गुणवत्तेवर परिणाम होतो.

तुलनेने जास्त खर्चामुळे, हा सेट अप मुख्यत्वे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम, जागतिक अन्न कार्यक्रम आणि इतर यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या अनुदानावर अवलंबून राहतो. तरीही, हायड्रोपोनिक्स MENA [मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका] प्रदेशात लोकप्रियता मिळवत आहे.

 

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • ड्रॉपआउट विद्यार्थी तेलंगणात शेती व्यवसायातून झाला करोडपती
  • जपानी जुळ्या भगिनींनी भारतात सुरू केला विषमुक्त सेंद्रिय कृषिमाल व्यवसाय

 

Share this:

  • Facebook
  • X
Tags: ग्रीन पॅराडाईजजॉर्डनलिबियाहायड्रोपोनिक्स
Previous Post

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे ७ डिसेंबरपासून

Next Post

कृषी सल्ला : टोमॅटो पीक – मर व इतर रोग व्यवस्थापन

Next Post
कृषी सल्ला : टोमॅटो पीक - मर व इतर रोग व्यवस्थापन

कृषी सल्ला : टोमॅटो पीक - मर व इतर रोग व्यवस्थापन

ताज्या बातम्या

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.