Home हॅपनिंग पशुधनासाठी स्वतंत्र ॲप : फुले अमृतकाळ मोबाईल प्रणालीचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या...

पशुधनासाठी स्वतंत्र ॲप : फुले अमृतकाळ मोबाईल प्रणालीचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण

पशुधनासाठी स्वतंत्र ॲप

मुंबई (मंत्रालय प्रतिनिधी) : बदलत्या वातावरणात पशुधनाच्या काळजीसाठी पशुधनासाठी स्वतंत्र ॲप विकसित करण्यात आले आहे.  महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र अंतर्गत पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या देशातल्या पहिल्या ‘फुले अमृतकाळ’ या पशुसल्ला मोबाईल प्रणालीचे (ॲप) लोकार्पण आज कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, वातावरणीय बदलामुळे पावसाने दिलेली ओढ, अतिवृष्टी, ढगफुटी, वाढते तापमान, उष्माघात व पावसाचा अकल्पित लहरीपणा अशा गोष्टी वारंवार घडत आहेत. त्यामुळे पशुधनास चारा व पाणी पुरविण्यावर तर परिणाम होतच आहे, पण पशुधनाच्या आरोग्यावर देखील गंभीर परिणाम होत आहे. या आव्हानांवर मात करण्यासाठी हे ॲप महत्वाची भूमिका पार पाडेल.

ॲपद्वारे मिळतील वेळोवेळी सूचना

या ॲपद्वारे शेतकऱ्यांना जनावरांचा उष्णतेमुळे निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी गोठ्यातील तापमान घटविण्याकरिता व योग्य आर्द्रता राखण्याकरिता सावलीची सोय करणे, योग्य वायु विजन राखणे, पिण्याकरिता थंड पाणी उपलब्ध करून देणे, फॅन किंवा फॉगर यंत्रणा स्वयंचलित पद्धतीने सुरू करणे तसेच संतुलित आहार नियोजन इत्यादी उपाय योजना करण्यासाठी वेळोवेळी सूचना दिल्या जातील.

Nirmal Seeds

ॲपचा वापर असा करावा

या ॲपपचा वापर करण्यासाठी गुगल प्ले स्टोअर वरून Phule Amrutkal हे ॲप डाऊनलोड करावे. (लिंक: https://play.google.com/store/apps/details?id=com.dairy.thi) त्यानंतर आपण नोंदणी करून आपला मोबाईल नंबर टाकावा. ओटीपी मिळाल्यानंतर आपला पत्ता व लोकेशन टाकून ॲप चालू करावे. आपणास हव्या असलेल्या गाईंच्या गोठ्याचे किंवा स्थळाचे लोकेशन घेऊन त्या ठिकाणीचे तपमान आद्रता निर्देशांक मिळतो. त्याद्वारे गाईंचा ताण ओळखून सल्ला मिळू शकतो. हे ॲप ओपन सोर्स हवामान माहितीच्या बरोबरीनेच तापमान व आर्द्रतेचे सेन्सर्स वापरून मिळणाऱ्या प्रत्यक्ष माहितीच्या माध्यमातून तापमान आर्द्रता निर्देशांकाच्या आधारे शेतकऱ्यांना व्यक्तिगत सल्ला व सूचना पुरवते.

 

Shree Sairam Plastic & Drip Irrigation

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇