मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राजभवनावर पदाची शपथ घेतल्यानंतर लगेच मंत्रालयात घेऊन खरीप आढावा बैठक घेतली. या बैठकीत खरीप हंगामाबाबतही गांभीर्याने आढावा घेण्यात आला. राज्यातील पेरण्याची स्थिती समाधानकारक नसल्याची माहिती यावेळी देण्यात आली. दरम्यान, मुंबई आणि राज्याच्या इतरही भागात आता दमदार पाऊस सुरू झाल्याने पावसाची तूट भरून निघेल, अशी आशाही व्यक्त करण्यात आली. जुलैमध्ये सरासरीइतका पाऊस पडणार असल्याच्या हवामान अंदाजांची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. यावेळी राज्यात पुरेशी खते आणि बियाणे उपलब्ध राहतील, याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिली. पीक कर्ज वाटप स्थितीचाही लवकरच एका बैठकीत आढावा घेतला जाणार आहे.
गेल्यावर्षी राज्यात आजच्या घडीला सरासरी 270 मिलीमीटर पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा मात्र केवळ 144 मिमी. पाऊस झाला आहे. गतवर्षी आजच्या दिवशी पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. यंदा मात्र खरीपाखालील क्षेत्रापैकी केवळ 13 टक्के (20.30 लाख हेक्टर) क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.
नंदुरबार, चोपडा, शिरपूरमधील खालावलेल्या भूजल पातळीची धोक्याची घंटा !
शहरातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेणार
कमी पावसामुळे शहरांमध्ये देखील पाणीपुरवठा कमी होऊ शकतो. त्यामुळे लवकरच संबंधित नवे मंत्री सर्व पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधून पाणी पुरवठ्याचे नियोजन कसे केले जाणार आहे याबाबत आढावा घेणार आहेत.
राज्यात 496 टँकर्सने पाणीपुरवठा
राज्यात 27 जूनअखेर 610 गावे आणि 1266 वाड्यांना 496 टॅंकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये शासकीय टँकर्सची संख्या 66 तर खाजगी टँकर्सची संख्या 430 इतकी आहे. पावसाला सुरुवात झाल्यामुळे मागील आठवड्याच्या तुलनेत टँकर्सची संख्येत 31 ने तर टचाईग्रस्त गावांच्या संख्येत 24 ने आणि वाड्यावस्त्यांच्या संख्येत 130 ने घट झालेली आहे.
शेतीत रासानिक, सेंद्रियचा समन्वय… प्रयोगशील शेतकरी उमेश बंग यांचा शेतीचा यशस्वी मंत्र
राज्यातील पाणीसाठा
राज्यातील धरणातील एकूण पाणीसाठा 28 जूनअखेर 21.82 टक्के इतका आहे. विभागवार पाणीसाठ्यामध्ये अमरावती विभागातील प्रकल्पात 33.80 टक्के, मराठवाडा विभागात 27.10 टक्के, कोकण विभागात 34.43 टक्के, नागपूर विभागात 26.81 टक्के, नाशिक विभागात 20.02 टक्के, पुणे विभागात 12.35 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
Comments 1