फ्लोरिडा : चंद्रावरून आणलेल्या मातीत वनस्पती उगविण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. या यशामुळे एक दिवस चंद्रावर शेती करणे शक्य होईल, अशी आशा शास्त्रज्ञांच्या मनात निर्माण झाली आहे. कृषी शास्त्रज्ञांनी केलेला हा पराक्रम एक दिवस मानवजातीच्या भविष्याची दिशा बदलण्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरू शकतो. चंद्रावरून आणलेल्या मातीत रोपे वाढवण्यात मोठे यश आल्याची ही माहिती ‘कम्युनिकेशन्स बायोलॉजी’ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात देण्यात आली आहे. या प्रयोगामुळे चंद्रावर दीर्घकाळ राहणे सोपे होईल आणि तेथे पुन्हा पुन्हा जाण्याचा खर्चही वाचेल, असे अनुमान आहे.
अपोलो मोहिमेदरम्यान अंतराळवीरांनी चंद्रावरून काही माती आणली होती. अमेरिकेतील फ्लोरिडा विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी त्या मातीत विशेष पद्धतीने झाडे उगवली आहेत. त्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की हे संशोधन अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर आहे आणि त्याबद्दल अजून बराच अभ्यास व्हायचा आहे. मात्र, अमेरिकन अंतराळ संस्था (नासा) या शोधाबद्दल खूप उत्सुक आहे. “नासा”चे प्रमुख बिल नेल्सन म्हणाले, “नासाच्या दीर्घ कालावधीच्या मोहिमांसाठी हा शोध अत्यंत महत्त्वाचा आहे.”
कृषी मंत्रीपदाचा कारभार आता शंकरराव गडाख यांच्याकडे, फलोत्पादन खातेही सांभाळणार
अंतराळ मोहिमा होणार सोप्या
आपल्याला भविष्यातील अंतराळवीरांसाठी अन्न तयार करण्यासाठी, तेथे राहण्यासाठी आणि अंतराळातील खोली मोजण्यासाठी चंद्र आणि मंगळावर सापडलेल्या संसाधनांचा वापर करावा करता येऊ शकेल, असे शास्त्रज्ञांना वाटतेय. या प्रयोगासाठी फ्लोरिडा विद्यापीठातील संशोधकांनी चंद्रावरून आणलेली काही चमचे माती वापरली. ही माती अपोलो 11, 12 आणि 13 मोहिमेदरम्यान आणण्यात आली होती.
अशी वाढविली चंद्रावरील मातीत रोपे
अगदी छोटय़ा कुंडीत चंद्रावरील माती फक्त एक ग्रॅम टाकून त्यात पाणी आणि बिया टाकल्या. त्यात रोज रोपांना पोषक आहार दिला गेला. या प्रयोगासाठी, शास्त्रज्ञांनी हिरव्या मोहरीच्या जातकुळातील रोपांची निवड केली होती, कारण ती वाढण्यास अतिशय सहज-सोपी आहेत आणि त्याचा विस्तृत अभ्यास देखील केला गेला आहे. शास्त्रज्ञांना त्याच्या अनुवांशिक कोडबद्दल आणि प्रतिकूल परिस्थितींवरील प्रतिसादाबद्दल बरेच काही माहित आहे. या वनस्पतीवर अवकाशातही प्रयोग करण्यात आले आहेत.
आयात – निर्यात कंपनी सोडून शेती…; सावखेड्यातील तरूणाचे श्रम वाचविणारे हाय-टेक प्रयोग
मंगळावरील मातीतही केले गेले प्रयोग
प्रयोगाचा एक भाग म्हणून, पृथ्वी आणि मंगळाच्या मातीत हीच प्रक्रिया स्वतंत्रपणे केली गेली. दोन दिवसांनी चंद्राच्या मातीत अंकुर फुटले. “पहिले सहा दिवस, प्रत्येक वनस्पती, मग ती चंद्राच्या मातीत किंवा इतर मातीत अंकुरली असली तरी ती सारखीच दिसत होती,” असे प्रमुख संशोधक ॲना-लिझा पाल यांनी सांगितले. त्यानंतर फरक दिसू लागला. चंद्राच्या मातीत उगवलेली वनस्पती हळूहळू वाढत होती आणि त्यांची मुळे लहान होती.
चंद्रावरील मातीत प्रतिकूल परिस्थितीतही वाढतात रोपे
20 दिवसांनंतर, शास्त्रज्ञांनी सर्व वनस्पतींची कापणी केली आणि त्यांच्या डीएनएचा अभ्यास केला. विश्लेषणात असे आढळून आले, की चंद्राच्या मातीतील झाडे खराब परिस्थितीत वाढतात, जसे की उच्च क्षारयुक्त माती. आता शास्त्रज्ञ चंद्राची माती वनस्पतींसाठी अनुकूल कशी बनवता येईल, याचा अभ्यास करतील.
11 वर्षांच्या अथक मेहनतीला यश
ॲना-लिसा पॉल आणि प्रोफेसर रॉबर्ट फर्ल यांना 11 वर्षांच्या प्रयत्नानंतर या प्रयोगात यश आले आहे. या दोन्ही शास्त्रज्ञांना 12 ग्रॅम चंद्राचा रेगोलिथ सापडला, जो अपोलो 11, 12 आणि 17 च्या मोहिमेदरम्यान आणला गेला होता. पण इतक्या कमी मातीतही त्यांनी रोपे उगविली. प्रयोग करण्यासाठी चंद्राची पुरेशी माती नाही, हे संशोधकांसाठी एक आव्हान आहे.
Web Agroworld Exhibitions 2022_23
चंद्रावर वसाहती स्थापन करण्यास होणार मदत
1969 ते 1972 पर्यंत, नासाच्या अंतराळवीरांनी चंद्राच्या पृष्ठभागावरून 382 किलो माती आणली. फ्लोरिडा विद्यापीठातील टीमला या नमुन्यांमधून वापरण्यासाठी प्रत्येक रोपासाठी फक्त एक ग्रॅम माती देण्यात आली होती, जी अनेक दशकांपासून विशिष्ट स्थितीत जतन करून ठेवण्यात आली होती. “चंद्राच्या मातीत वनस्पती वाढतात, हा शोध प्रत्यक्षात चंद्र वसाहती स्थापित करण्यास सक्षम होण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे,” असे संशोधकांच्या टीमपैकी एक, रब फेरेल म्हणाले.
Scientists successfully grow plants in Moon Soil for first time. The Plant Species Arabidopsis Thaliana is sprouted at University of Florida Laboratory in a small amount of Lunar Regolith
Comments 1