मुंबई : सध्याच्या काळातील मोबाईल फोनचा वाढता वापर, सहज इंटरनेट उपलब्धता आणि तांत्रिक कौशल्ये यामुळे तंत्रज्ञान-सक्षम शेती आणि क्रिएटिव्ह ॲग्रीटेक सोल्यूशन्सचा फायदा छोट्या शेतकऱ्यांपर्यंतही सहज पोहोचत आहे. कमी क्षेत्राच्या शेतीतही आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात अनेक संस्था लक्षणीय प्रगती करत आहेत. पुरवठा शृंखला अडचणींवर मात करण्यासाठी तसेच उत्पन्न, महसूल आणि स्थिरता वाढवण्याच्या दृष्टीने, तंत्रज्ञान हा एक विलक्षण सक्षम पर्याय असल्याचे दिसून आले आहे. तंत्रज्ञानाच्या वापराने शेतकरी बाजारपेठ, निविष्ठा, डेटा, शेती सल्लागार, कर्जे आणि विमा याचा सहज अभ्यास करू शकतात, ज्यामुळे त्यांना अधिक फायदेशीर कृषी निर्णय घेता येतात.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि मशीन लर्निंग (एमएल) सारख्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे भारतीय शेतीचा कायापालट होत आहे. ॲग्रीटेक कंपन्यांची वाढती संख्या क्रांतिकारी आणि दीर्घकालीन एआय-सक्षम समाधाने तयार आणि वितरित करत आहेत. कृषी प्रक्रिया स्वयंचलित करून आणि मर्यादित संसाधनांचा वापर करून अधिक पीक उत्पादन आणि गुणवत्तेसाठी अचूक लागवडीला चालना देऊन, नवीन तंत्रज्ञान भारतीय शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याची क्षमता प्रदान करत आहेत. शिवाय, तंत्रज्ञान पूर्वीपेक्षा ग्राहकांच्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकते. भारतीय शेतीचा चेहरामोहरा, भवितव्य बदलून टाकतील असे 5 कृषी तंत्रज्ञान स्टार्ट-अप्स आपण पाहूया. हे स्टार्ट-अप्स शेती पद्धतींमध्ये क्रांती आणण्यासाठी भारतातील शेतकऱ्यांना अतिशय उपयुक्त आणि सहाय्यक ठरणार आहेत.
1. देहात
देहात (DeHaat) ही भारतातील सर्वात वेगाने वाढणारी ॲग्रीटेक फर्म आहे. ही संस्था देशातील अशा काही मोजक्या संस्थांपैकी एक आहे, ज्या एंड-टू-एंड कृषी समाधान आणि सेवा पुरवितात. कृषी क्षेत्रातील पुरवठा साखळी आणि उत्पादन कार्यक्षमता सुधारण्यासाठी देहात एआय-सक्षम तंत्रज्ञानावर काम करत आहे. बिहार, उत्तर प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये, देहातच्या सेवा नेटवर्कमध्ये 6,50,000 शेतकरी जोडले गेले आहेत. 2024 पर्यंत, कंपनीला 50 लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याची आशा आहे.
2. फसल
शैलेंद्र तिवारी आणि आनंदा वर्मा यांनी हे स्टार्ट-अप स्थापन केलेले आहे. शेतकऱ्यांना एआय प्लॅटफॉर्मसह फसल मदत करते, जे ऑन-फार्म सेन्सर्सवरून वाढीच्या स्थितीचा डेटा रिअल-टाइममध्ये गोळा करते. त्याआधारे शेत-विशिष्ट आणि पीक-विशिष्ट सूचना शेतकऱ्यांना त्यांच्या स्थानिक भाषेत मोबाईलद्वारे पाठवते. फसल हा नावीन्यपूर्ण व्यवसाय आहे. परिपूर्ण शेती तंत्रज्ञानात सुधारण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.
बटाट्याचे 90 दिवसात तयार होणारे वाण विकसित; गहू-तांदूळ हंगामादरम्यान घेता येईल तिसरे पीक
3. संहिता क्रॉप केअर क्लिनिक्स
संहिता क्रॉप केअर क्लिनिक हे शेतकर्यांना पीक उत्पादन आणि नफा वाढवणाऱ्या शाश्वत तंत्रांचा अवलंब करण्यास सक्षम बनवण्याच्या उद्देशाने अचूक शेती सल्ला देते. 2021 मध्ये जगन चिटिप्रोलु, डॉ. श्यामसुदर रेड्डी आणि कल्याण एन्जामूरी यांनी याची सुरुवात केली. हे स्टार्टअप शेतकऱ्यांना डेटा, तंत्रज्ञान आणि पीक कौशल्याच्या अनोख्या मिश्रणाद्वारे अतिरिक्त आणि निरोगी उत्पादन वाढविण्यात मदत करते. संहितामुळे डेटा, तंत्रज्ञान आणि पीक तज्ञांच्या एकत्रित संरचनेचा फायदा घेऊन पीक गुणवत्ता आणि उत्पादकतेला प्रोत्साहन मिळते. संहिताचे क्रॉप डॉक्टर हे डिजिटली-टॅग केलेल्या झाडांपासून मिळवलेले डेटा पॉइंट्स, ड्रोन, टेलीमेट्री उपकरणे वापरून एरियल स्कॅन्स आणि वैयक्तिक वृक्ष स्तरावर नियमित अचूक सल्ला देतात. त्यासाठी सातत्याने शेतीक्षेत्रात निगराणी केली जाते.
4. क्रॉपिन
क्रॉपिन हे कृषी इकोसिस्टम इंटेलिजन्सचे जागतिक प्रदाता आहेत. क्रॉपिनचा सोल्यूशन पोर्टफोलिओ कृषी-इकोसिस्टम भागधारकांना, जसे की वित्तीय सेवा पुरवठादारांना, त्यांच्या कृषी व्यवसायांमध्ये डिजिटल धोरण स्वीकारण्यास आणि चालविण्यास सक्षम करते. क्रॉपिन कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग आणि रिमोट सेन्सिंग यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एक बुद्धिमान, परस्पर जोडलेले डेटा प्लॅटफॉर्म तयार करते. क्रॉपिन व्यवसायांना त्यांच्या ऑपरेशन्सपासून ते विक्रीपर्यंतचे डिजिटायझेशन करण्यात मदत करते, ज्यामुळे त्यांना रीअल-टाइम फार्म डेटा मिळतो. यामुळे नेमके चांगले निर्णय घेऊन उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांना मदत होते. 56 देशांमधील 400 पेक्षा जास्त पीके आणि 10,000 पीक वाणांसाठी क्रॉपिनने कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित केल्या आहेत त्यासाठी क्रॉपिनने 16 दशलक्ष एकरपेक्षा जास्त शेतजमीन डिजिटायझेशन करून 7 दशलक्ष शेतकऱ्यांचे जीवन सुधारण्यास सहकार्य केले आहे. त्यासाठी जगभरातील 250 हून अधिक संस्थांसोबत क्रॉपिनने सहकार्य केले आहे. भौगोलिक-स्थानानुसार क्रॉपिनचे पीक उपाय आहेत आणि ते प्लग-अँड-प्ले फॉरमॅटमध्ये सहज वापरण्याजोग्या पद्धतीत येतात.
5. भारतॲग्री
भारतॲग्री हे कृषी तंत्रज्ञानाचे व्यासपीठ आहे जे थेट शेतकऱ्यांसोबत काम करते. हे भारतातील तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्र यातील अंतर भरून काढण्यासाठी समर्पित आहे. शक्य तितक्या भारतीय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे कंपनीचे उद्दीष्ट आहे. भारतॲग्री प्रत्येक शेतकऱ्याच्या गरजा ओळखते आणि प्रत्येक शेतकऱ्याला तंत्रज्ञानासह उज्ज्वल भविष्यासाठी संधी मिळायला हवी, यासाठी प्रयत्नशील आहे.
5 Startups using technology to revolutionise agriculture in India – Samhitha Crop Care Clinics, Dehaat, Cropin, Fasal, BharatAgri
pls join me