• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

जनावरांना पचनाचे होणारे महत्त्वाचे आजार आणि उपचार

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 16, 2022
in हॅपनिंग
0
जनावरांना पचनाचे होणारे महत्त्वाचे आजार आणि उपचार
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

डॉ. पंकज हास / डॉ. मंजुषा पाटील

भारतीय संस्कृतीमध्ये पशुधनाचे मोलाचे स्थान आहे. आपल्या संस्कृतीमध्ये गाईला मातेसमान मानले जाते. पशुधनांपासून आपल्याला दूध, मांस, लोकर आदींचे उत्पन्न मिळते. तसेच शेतीतील कामे, वाहतूक, अवजड कामे यासाठी जनावरांचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. पशुधनाकडून मिळणारे उत्पन्न तेव्हाच जास्त प्रमाणात मिळेल जेव्हा त्यांचे आरोग्य सुदृढ असेल आणि सुदृढ आरोग्यासाठी त्यांची चयापचनाची क्रिया सुरळीत राहणे आवश्यक आहे. त्यांची ही चयापचनाची क्रिया अन्न, पाणी आणि निवारा यावर अवलंबून असते.

अ‍ॅग्रोवर्ल्डची टीम आपल्यासाठी थेट कोकणातील हापूस बागेतून…🥭 

खालील व्हिडिओ पहा..

https://fb.watch/cakdUNv3cy/

 

जनावरांच्या शरीरातील बरेच आजार हे चयापचनाच्या क्रियेवर अवलंबून असतात. ही क्रिया सुरळीत राहण्यासाठी त्यांना दिल्या जाणार्‍या खाद्याची गुणवत्ता आणि त्याचे प्रमाण योग्य असणे अत्यंत आवश्यक आसते. जर या चयापचनाच्या क्रियेमध्ये व्यत्यय आल्यास त्याचा सरळ परिणाम जनावरांचे आरोग्य व त्यांच्याकडून मिळणार्‍या उत्पादनावर होतो.

जनावरांच्या शरीरातील जठराच्या रचनेप्रमाणे त्यांच्या पचनसंस्थेमध्ये दोन प्रकार पडतात, सामान्य पचनसंस्था आणि रुमिनंट स्टमक. सामान्य पचनसंस्था ही मानवाप्रमाणेच एक जठरी असते, तर रुमिनंट स्टमकची रचना ही क्लिष्ट असून ते चार कप्प्यांमध्ये विभागले गेलेले असते. सामान्य पचनसंस्था ही मानव, घोडे, श्वान, मांजर, डुक्कर यामध्ये आढळते तर रुमिनंट स्टमक प्रामुख्याने गाय, मेंढी, शेळी यांच्यामध्ये पहावयास मिळते.

 

अपचन हे सर्वसाधारणपणे तीन प्रकारचे असते

1) साधे अपचन ः साधे अपचन हे जनावरांच्या अन्ननलिकेमध्ये होणारा एक व्यत्यय आहे. हा प्रामुख्याने गाई व म्हशींमध्ये आढळतो, यांच्या तुलनेत शेळी आणि मेंढीमध्ये याचे प्रमाण कमी असते. साधे अपचन हे विशेषतः आहारामध्ये होणारा अचानक बदल व त्याची गुणवत्ता आणि प्रमाण यांच्याशी संलग्न असतो.

कारणे

1) आहारात होणारा अचानक बदल (प्रमाण व गुणवत्ता). 2) अशुद्ध किंवा सांडपाण्याचे सेवन. 3) धान्य, हिरवा चारा, डाळवर्गीय पिके, प्रथिनेयुक्त चारा यांचे आहारामधील अति प्रमाण. 4) सडलेले अन्न, भाज्या, फळे उदा. आंबा, बटाटे, कांदा इत्यादी खाल्ल्यामुळे. 5) टाकाऊ कडबा अधिक प्रमाणात खाल्ल्यास. 6) आंबोन किंवा पेंड जास्त प्रमाणात खाल्ल्यास. 7) अखाद्य वस्तू खाणे, वयस्करपणा किंवा अशक्तपणा यामुळेही जनावरांमध्ये साधे अपचन होते. 8) अति परिश्रमानंतर दिलेला चारा वेगाने किंवा हावरटपणे खाल्याने देखील साधे अपचन होते. 9) जनावरांना पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासल्यास देखील साधे अपचन होऊ शकते.

लक्षणे

1) भूक मंदावणे. 2) दूध उत्पादनात घट होणे. 3) गुंगून बसणे. 4) रवंथ न करणे. 5) दुर्गंधीयुक्त शेण टाकणे. 6) दात खाणे. 7) कातडी निस्तेज होणे व डोळे खोल जाणे. 8) शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे. 9) डावी भकाळी दाबून पाहिल्यास ती घट्ट लागणे. 10) पोटाच्या हालचाली मंदावणे. 11) कोरडी व श्लेष्म युक्त विष्ठा. यामध्ये शरीराचे तापमान आणि श्वसनाचा दर हा सामान्य असतो. 12) रुमिनंट स्टमक असणार्‍या प्राण्यांमध्ये पोटातील द्रवाचा कि असामान्य होतो व त्यातील खाद्य / चारा पचन करण्यास मदत करणार्‍या सूक्ष्मजीवांची संख्या कमी होती.

 

आम्लधर्मी अपचन

जनावरांच्या आहारामध्ये जास्त प्रमाणात पिष्टमय पदार्थ जसे की ज्वारी, मका, गहू, तांदूळ, बटाटे इत्यादींचा समावेश जास्त प्रमाणात झाल्यास आम्लधर्मी अपचन होते.

 

कारणे

1) खाद्यातील धान्यामध्ये अचानक केलेला बदल. 2) शिळे अन्न जसे की भात, चपाती, भाकरी जनावरांना खाऊ घातल्यास. 3) उसाचा पाक किंवा मळी जास्त प्रमाणात खाऊ घातल्यास.

 

लक्षणे

1) पोटातील द्रवाचा कि 6 पेक्षा कमी आढळतो व त्याचा रंग दुधा-राखाडी असून त्याचा वास आंबट येतो. त्यातील खाद्य /चारा पचन करण्यास मदत करणार्‍या सूक्ष्मजीवांची संख्या कमी होती. 2) भूक मंदावणे, रवंथ न करणे, पोटदुखी. 3) पोटाची हालचाल बंद होणे. 4) विष्ठा कठोर, श्लेष्म युक्त व काळसर होणे. 5) शरीरात पाण्याची कमतरता. 6) हृदयांच्या ठोक्यांचा दर वाढतो (70 ते 130 प्रति मिनिटे). 7) उथळ व जलद श्वसन आढळते तसेच श्वसनाचा दर वाढतो (60 ते 90 प्रति मिनिटे).

अल्कलीजन्य अपचन

जनावरांच्या आहारामध्ये प्रथिने युक्त खुराकाचा किंवा चार्‍याचा जास्त प्रमाणात वापर केल्यास अल्कलीजन्य अपचनाचा त्रास उद्भवतो. (उदा. पेंड, सोयाबीन, इत्यादी)

 

कारणे

1) डाळवर्गीय चारा उदा. बरसीम, लसूणघास यांचा आहारात अधिक वापर. 2) युरिया चे अतिप्रमाणात सेवन. 3) पोटातील प्रथिने व कार्बोदके यांचे प्रमाण बदलणे. 4) दीर्घकाळासाठी भाताच्या पेंडी चे सेवन.

 

लक्षणे

1) अन्नपाणी न घेणे, पोटदुखी, रवंथ न करणे 2) पोटातील द्रवाचाकि 7.5 पेक्षा जास्त असून त्याचा रंग गडद विटकरी व अमोनिक गंध असतो. त्यातील खाद्य/चारा पचन करण्यास मदत करणार्‍या सूक्ष्मजीवांची संख्या कमी होती. 3) पोटाच्या हालचाली मंदावणे.

4) पातळ हगवण होणे. 5) लाळ गळणे. 6) थरथर कापणे. 7) श्वसनाचा दर तसेच हृदयांच्या ठोक्यात लक्षणीय वाढ.

 

प्रतिबंधात्मक उपाय

1) जनावरांच्या खाद्यात हळूहळू बदल करावा. 2) अति परिश्रम झाल्यानंतर जनावरांना एकदम चारा देणे टाळावे. 3) शिळे अन्न, सडलेले फळे, भाज्या देणे टाळावे. 4) प्रथिनेयुक्त चारा व कार्बोदकेयुक्त चारा यांच्यात समन्वय साधावा. 5) जनावरांसाठी तयार करावयाच्या खाद्यात प्रथिनेयुक्त धान्य व कार्बोदकेयुक्त धान्य यांचा योग्य प्रमाणात वापर करण्यासाठी पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. 6) अति थंड किंवा गरम खाद्य देणे टाळावे.

 

उपचार

1) पशुवैद्यकाच्या साह्याने जनावरांच्या पोटातील द्रवाचा कि6 ते 7.5 च्या दरम्यान आणावा. 2) जर पोटातील द्रवाचा कि6 पेक्षा कमी म्हणजेच अल्कधर्मी असेल तर खाण्याच्या सोड्याचे प्रमाण पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जनावरास खावयास द्यावे. 3) जर पोटातील द्रवाचाकि 7 पेक्षा जास्त म्हणजेच अल्कलीजन्य असेल तर जनावराला 5% ऍसिटिक ऍसिड (विनेगार) पशुवैद्यकाच्या सल्ल्याने पाजावे. 4) पशुवैद्यकाच्या सल्ल्या शिवाय कोणताही अघोरी उपचार करू नये कारण तो जनावरासाठी अपायकारक ठरू शकतो.

पोटशूळ आजार

जनावरांमध्ये जिवाणूमुळे आंत्रविषार, ई कोलाय, साल्मोनेला, क्षयरोग, विषाणू बाधा, विषारी पदार्थांमुळे पोटशूळ आजार आढळतो. जंत कृमींमुळे देखील पोटशूळ दिसते. ज्यात जनावरांना झालेल्या पचन संस्थेच्या सांसर्गिक आजारांमध्ये शरीराचे तापमान वाढलेले आढळते.

 

लक्षणे

पोटशूळ झालेले जनावर अस्वस्थ होते, उठ-बैस करते, वेदनेने विव्हाळते, पाय पोट ताणते. शेण, लघवी होत नाही, चारापाणी खाणे बंद होते. नंतर जुलाब होऊन पातळ शेणामधून शेम आणि रक्त देखील पडते. डोळे खोल जातात, त्वचा निस्तेज कोरडी सुरकुतलेली दिसते आणि बर्‍याचदा जनावराचा मृत्यू देखील होतो.

 

उपचार

आजाराची लक्षणे दिसून येणार्‍या जनावरांवर तातडीने पशुवैद्यकांकडून उपचार करावेत. आंत्रविषार किंवा जुलाब असलेल्या जनावरांच्या शरीरात पाणी आणि क्षार कमी पडतात, त्यामुळे तत्काळ औषधोपचार करून शरीरातील पाणी आणि आवश्यक क्षार आणि शर्करा सलाइनमधून देऊन प्राण वाचवावे लागतात.

Share this:

  • Facebook
  • X
Tags: अपचनअल्कलीजन्य अपचनआम्लधर्मी अपचनउपचारऔषधोपचारगाईपशुधनपोटशूळप्रतिबंधात्मक उपायमेंढीलक्षणेशेळी
Previous Post

चारा टंचाईवर कमी खर्चाचे निर्मिती तंत्र – मुरघास

Next Post

अक्षयतृतीया… अ‍ॅग्रोवर्ल्ड व देवगड हापूस.. विश्वास आमचा.. चव तुमची.. आरोग्याशी खेळ नाही..🌱

Next Post
अक्षयतृतीया… अ‍ॅग्रोवर्ल्ड व देवगड हापूस.. विश्वास आमचा.. चव तुमची.. आरोग्याशी खेळ नाही..🌱

अक्षयतृतीया... अ‍ॅग्रोवर्ल्ड व देवगड हापूस.. विश्वास आमचा.. चव तुमची.. आरोग्याशी खेळ नाही..🌱

ताज्या बातम्या

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.