पुणे : सध्या कापसाच्या भावाने उच्चांक गाठला आहे. हंगामाच्या सुरवातीपासूनच कापसाला सरासरीपेक्षा अधिकचा दर मिळाला. दरवर्षी हंगामाच्या शेवटी कापसाच्या दरात घसरण होते. यंदा मात्र, वाढीव दर कायम राहिले आहेत. हंगामाच्या अंतिम टप्प्यात तर कापसाला विक्रमी दर मिळत असून दिवसाकाठी दरात होत असलेली वाढ सुरुच आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू बाजार समितीने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. सेलू बाजार समितीत कापसाला सोन्याप्रमाणे दर मिळाला आहे. तब्बल एक हजार क्विंटल कापसाला १३ हजार ४५० असा विक्रमी दर मिळाला आहे.
🥭 आपल्याला अस्सल देवगड हापूस उपलब्ध करून देण्यासाठी अॅग्रोवर्ल्डची टीम निघाली कोकणच्या दिशेने..
गेल्या काही दिवसांपासून कापसाला दहा ते अकरा हजारांचा भाव मिळत होता. आता आवक कमी होताच पुन्हा दरात वाढ झाली आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू या उपबाजारात गेल्या चार दिवसांपासून दिवसाला ३०० ते ४०० रुपयांची वाढ होत आहे. हंगामात हे प्रथमच घडत असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. एकीकडे कापसाला चांगला भाव मिळत असला तरी सध्या शेतशिवारामध्ये कापूस राहिलेला नाही. मात्र, ज्या शेतकरी व व्यापाऱ्यांनी कापसाची साठवणूक करुन ठेवली आहे, त्याचा त्यांना चांगलाच फायदा होत आहे. मागील आठवड्यापासून दरवाढ सुरुच असल्याचे दिसून येत आहे.
व्यापार्याना अधिक फायदा
कापसाचा हंगाम अंतिम टप्प्यात असला तरी आता वाढीव दरामुळे साठवणुकीतला कापूस बाजारपेठेत दाखल होत आहे. मात्र, हा कापूस शेतकर्यांपेक्षा व्यापार्यांचा असल्याचे दिसून येत आहे. जेव्हा शेतकऱ्यांकडे साठवणूकीतला कापूस होता, तेव्हा त्याची कमी दराने विक्री करावी लागली होती. आता हंगाम अंतिम टप्प्यात असताना कापसाने दहा हजार प्रती क्विंटलचा टप्पा पार केला आहे. मात्र, याचा अधिकचा फायदा हा व्यापाऱ्यांना होत आहे. अशा प्रतिकूल परस्थितीमध्येही ज्या शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक केली आहे, त्यांची चांदी आहे. मात्र, असे शेतकरी बोटावर मोजण्याइतपतच आहेत. दरम्यान, बाजारात शेतीमालाची आवक सुरु झाल्यानंतर बर्याचदा त्यात शासनाचा हस्तक्षेप होते. त्यामुळे शेतीमालाच्या दरात घट होते. यंदा मात्र शासनाने कोणताही हस्तक्षेप केलेला नाही. परिणामी, सोयाबीन, कापूस, हरभरा, तूर या शेतीमालाचे दर अद्यापही टिकून आहेत.
हापूसच्या नावाने विक्रेते करताहेत ग्राहकांची फसवणूक..