नाशिक – मल्चिंग म्हणजे काय, त्याचा वापर कसा होतो, पाणी बचत होऊन पिकांच्या उत्पादनात किती वाढ होते, त्याचे प्रकार काय आहेत हे आपण समजून घेऊ… महाराष्ट्रात मल्चिंगचा वापरही वाढतच आहे.
१) मल्चिंग म्हणजे काय..?
* जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी, तण वाढ रोखण्यासाठी , जमिनीची धूप रोखण्यासाठी आणि मातीची गुणवत्ता टिकवून राहण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी मातीच्या वर जे आच्छादन केले जाते त्यास मल्चिंग असे म्हणतात.
२) मल्चिंग चे फायदे कोणते..?
* मल्चिंग मुळे बीज उगवण क्षमता वाढते.
* पिकाचे उत्पादन २० ते ३० टक्क्याने वाढते.
* जमिनीची धूप रोखली जाते.
* जमिनीमध्ये ओलावा टिकून राहतो.
* उत्पादनाची गुणवत्ता चांगली राहते.
* तण नियंत्रणास मदद होऊन तण नियंत्रणासाठीच्या खर्चात मोठी बचत होते.
* जमिनीच्या तापमानाचा समतोल राहण्यास मदत करते.
* मुसळधार पाऊस झाल्यास जमीन कडक होण्यापासून वाचवते.
प्लास्टिक मल्चिंग –
राज्यातील भरपूर शेतकरी प्लास्टिक मल्चिंग पेपर वापरून मल्चिंग करतात.
अ) मल्चिंग पेपरची निवड कशी करायची..?
हे मल्चिंग पेपर वेगवेगळ्या जाडीचे असतात, वेगवेगळ्या रंगाचे असतात, वेगवेगळ्या आकाराचे असतात. पिकांच्या गरजेनुसार तसेच पिकांच्या कालावधी या पेपरची निवड करावी.
ब) मल्चिंग पेपर वापरण्यासाठी जमीन कशी तयार करावी..?
जमिनीतील मोठे दगड, धोंडे कचरा काडी साफ करून घेणे. नाहीतर पेपर फाटू शकतो. नंतर बेड / सरी तयार करून घ्याव्यात. सरी / बेड तयार करून झाल्यानंतर त्यांना ओले करून घ्यावे नंतर त्याचा वापसा आल्यावर तो मल्चिंग पेपर व्यवस्थित त्यावर अंथरून घ्यावा. नंतर बाजूने माती लावून घ्यावी. (आता बाजारामध्ये मल्चिंग पेपर अंथरण्यासाठी विविध साधनेही उपलब्ध आहेत) हे अंथरण्याचे काम सकाळी किंवा संध्याकाळी करावे. त्यावेळी जास्त ऊन नसते कारण उन्हामध्ये पेपर फाटू शकतो. जे पीक लावायचे आहे त्याच्या अंतरा नुसार मल्चिंग पेपर टोचणीच्या साहाय्याने फाडा दुसरी कडे कुठे फाटणार नाही याची काळजी घेणे.
मल्चिंग पेपरच्या अधिक माहितीसाठी – श्री. कोमलसिंग पवार – 9619811146